कधी काळी उपाशी पोटी रात्री काढणाऱ्या शारदा आज्जी, आज १० रुपयात पोटभर नाष्टा विकतायत

भारत कृषिप्रधान देश असला तरी आपल्या देशांत रोज कित्येक लोक भुखमारीने मरतात, ज्यांनी स्वताचा भुख काय आहे हे अनुभवले आहे, तेच लोक इतरांच्या भुखेला समजू शकतात. नागपुरच्या शारदा चौरगडे यांनी कित्येक दिवस आणि रात्री उपाशी पोटी काढल्या आहेत.

कधी काळी उपाशी पोटी राहिलेल्या शारदा चौरगडे आज नागपुरात डोसा आज्जी म्हणून फेमस आहेत. 

शारदा यांना त्यांच्या नावापेक्षा लोक त्यांना डोसा आज्जी म्हणून ओळखतात. त्यांना लहान मोठे प्रेमाने डोसा आज्जी म्हणतात. शारदा आज्जी नागपुरातील महाल परिसरात पाताळेश्वर रस्त्यावर अवघ्या १० रुपयांत चार इडली आणि दोन डोसे आणि चटणी देतात.

शारदा यांचे वय आज ६४ वर्ष आहे. शारदा त्यांच्या आयुष्याबद्दल सांगताना भावुक होतात. शारदा यांचे लवकर लग्न झाले, सासरी त्यांना प्रचंड सासरवास होता त्यामुळे शारदा यांनी सासर सोडून माहेरी परतल्या. 

शारदा यांच्या नवऱ्याला दारूचे व्यसन होते, तो शारदा यांना प्रचंड मारहाण करत. शेवटी त्या त्यांच्या नवऱ्याला सोडून माहेरी परतल्या होत्या तेव्हा त्यांच्या पदरी एक मुलगा होता. त्यांच्या आईकडे त्या राहू लागल्या. पण एक दिवस आईचे देखील निधन झाले. शारदा यांना तेव्हा खऱ्या अर्थाने पोरकेपणा काय असतो हे समजले. घरातील आर्थिकस्थिति अतिशय बिकट होती. एक वेळेचे जेवण देखील खूप मुश्कीलीने मिळत.

शारदा यांनी पडेल ते काम केले आणि जीवन जगणे सुरू केले.

मुलगा शिकला, शारदा यांची देखील कामाची घडी बसली, पण शारदा मात्र अन्नाविना काढलेल्या रात्री विसरल्या नव्हत्या. त्यांनी २००४ साली नागपुरात, कष्टकरी लोक, मजूर आणि शाळा कॉलेजात जाणाऱ्या मुलांसाठी त्यांनी डोसा आणि इडलीचा गाडा सुरू केला.

शारदा यांनी जेव्हा गाडा सुरू केला तेव्हा दोन डोसा आणि चार इडली अवघ्या दोन रुपयांत त्या देत. पुढे चार रुपये आणि आता महागाईमुळे दहा रुपयांत दोन डोसे आणि चार इडली देतात.

जेव्हा लोक पोटभरून खातात आणि मनांपासून आशीर्वाद देतात तेव्हा मला खूप आनंद होतो. मनाला एक वेगळे समाधान लाभते. डोसा आज्जीना महिन्यांकाठी दहा- बारा हजार रुपये मिळतात. त्या त्यातून लागणारे सर्व सामान आणतात.शारदा आज्जी म्हणतात एक वेळ अशी होती की माझ्या मुलाला आणि मला खायला अन्न मिळत नव्हते.

अन्न न खाल्ल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो ते आम्ही अनुभवले आहे. मला डोसा आणि इडली विकून महिन्यांकाठी दहा- बार हजार मिळतात. नफा आणि तोटा यांच्या गणिताचा मी कधीच विचार करत नाही. लोकांची पोटांची भूक मिटली पाहिजे हा माझा मुख्य हेतु असतो.

शाळेत जाणारी मुलं शारदा यांना प्रेमाने आज्जी म्हणतात.

शारदा या मोठ्या प्रेमाने प्रत्येकाला गरम डोसा आणि इडली देत असतात. डोसा आणि इडलीचे पीठ शारदा स्वता घरी बनवतात. आता त्यांचा मुलगा देखील शिकून नोकरी करत आहे. त्यांच्या मुलांचे लग्न देखील झाले आहे. शारदा यांना एक गोंडस नात देखील आहे. तरी देखील शारदा अजून देखील हा इटली, डोसा यांचा गाडा चलवितात.

वयाच्या ६० वर्षांपर्यंत नोकरी करून अनेकजण सेवानिवृत्ती घेतात, पण आयुष्यभर काबाडकष्ट करून आता सर्व उत्तम असताना देखील शारदा आज्जी कोणत्याही फळांची अपेक्षा न करता गोर-गरिबांसाठी डोसा आणि इटलीचा गाडा चालवत आहेत.

शारदा यांना अनेकांनी सल्ला दिला की तुम्ही तुमचे दर वाढवा, इतक्या कमी पैशांत विकू नका. पण शारदा यांचा हेतु स्पष्ट आहे. त्यांना गरीब लोकांची भूक भागवायची आहे, त्यांना त्यातून पैसे कमावचे नाहीत. कोरोना काळात शारदा यांच्या समोर अनेक अडचणी आल्या तरी देखील शारदा मागे हटल्या नाहीत.

शारदा यांच्या सूनबाई देखील त्यांच्या कामाचे कौतुक करतात, त्या म्हणतात शारदा यांचा हा व्यवसाय नाही, त्यांचा छंद आहे, लोकांना खाऊ घालणे त्यांना आवडते, मी जेव्हा-जेव्हा त्यांच्या स्टॉलवर जाते तेव्हा मला खूप सकारात्मक वाटते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.