जेव्हा नलगोंडा येथे नरबळीच्या घटनेत 75 किमी अंतरावरील मंदिरात सापडलं छिन्नविछिन्न शीर…

धार्मिक गोष्टी आणि त्या सोबतच जोडून येणाऱ्या काही कर्मकांडाच्या गोष्टी हे एक भयानक प्रकरण आहे. अशीच एक काळजात धडकी भरवणारी गोष्ट समोर आली आहे. हैदराबादजवळ एक हृदयद्रावक घटना समोर आली. पोलिसांना शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला. ज्याचे धड एका जिल्ह्यात सापडले तर शीर 75 किमी दूर दुसऱ्या जिल्ह्यात आणि तेही मंदिरात. ही हत्या वैमनस्यातून करण्यात आली की मानवी बलिदानासाठी ही हत्या करण्यात आली, या प्रश्नांमध्ये पोलीस आताखाली पुरलेला मृतदेह आढळून आला. डोके आणि धड 75 किमी दूर अस अंतर त्यात होतं.

मृतदेह आढळून आल्यावर पोलिसांना कळलं की मृत व्यक्ती हि पुरुष आहे आणि त्याची हत्या केल्यानंतर मृतदेह विटांच्या खाली दाबून लपवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले. मात्र मृतदेहामधून डोके गायब असल्याने त्याची ओळख कशी करायची, हे पोलिसांसाठी सर्वात मोठ टास्क होत. म्हणजे मृतदेह पोलिसांना सापडला परंतु मृतदेहाच्या ठिकाणापासून सुमारे 75 किमी अंतरावर तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यातील एका मंदिरातून एक शीर सापडल्याने पोलिसांचा शोध सोपा झाला.

मंदिराच्या पुजार्‍याने प्रथम महाकालीच्या चरणी ठेवलेले तोडलेले मस्तक पाहिले. छिन्नविछिन्न शीर मिळाल्यानंतर पोलीस त्याचा मृतदेह आणि त्याची ओळख शोधण्यासाठी घरोघरी भटकत होते, तेव्हा वनस्थलीपुरममधून एका शिरच्छेद केलेल्या मृतदेहाची माहिती पोलिसांना मिळाली. फॉरेन्सिक तपासणीत हे स्पष्ट झाले की विटांमध्ये दफन केलेले मुंडके आणि मृतदेह एकाच व्यक्तीचे आहेत. पोलिसांना लवकरच त्या व्यक्तीचीही ओळख पटली. रामावथ जयहिंद अशी ओळख पटली, ज्याचे वय अंदाजे ३० वर्षे असून तो वनस्थलीपुरम भागातील सूर्यपेटचा रहिवासी होता.

पोलिसांना आता विकृत मृतदेहाचे दोन्ही भाग तसेच मृताची ओळखही सापडली होती. मात्र त्यानंतरही अचानक अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे ठाकले. अखेर रामावतला मारणारा कोण होता ? हत्येनंतर शिरच्छेद का करण्यात आला? मानवी बळी देण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती का? हा खून वैमनस्यातून झाला का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसंगापासून ७५ किमी अंतरावर नेऊन मंदिरातील महाकालीच्या मूर्तीखाली डोके काढून ठेवणारे कोण होते? महाकालीच्या मंदिरात डोकं ठेवायला गेलेल्या माणसाला तिथं कुणी दिसलं का?आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसंगापासून ७५ किमी अंतरावर नेऊन मंदिरातील महाकालीच्या मूर्तीखाली डोके काढून ठेवणारे कोण होते? महाकालीच्या मंदिरात डोकं ठेवायला गेलेल्या माणसाला तिथं कुणी दिसलं का?

या प्रश्नांनी आता हैदराबाद पोलिस हैराण झाले आहेत. पीडितेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी आठ टीम तयार केल्या होत्या, त्यापैकी एक टीम यशस्वी झाली जेव्हा नलगोंडा जिल्ह्यातील एका कुटुंबाने कापलेले डोके आणि त्याचे धड ओळखले. मानवी बळी देण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. त्यानंतर मारेकऱ्याने त्याचे शीर कापून देवीच्या चरणी अर्पण केले. पोलिसांची व तपासाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे दोन तुकडे करून डोके काढून मंदिरात फेकण्यात आल्याचे पोलिसांचे मत आहे.

खुनी कोण?

आता पोलीस घटनास्थळावरून पुरावे गोळा करून मृतदेहाचे दोन तुकडे करून एकमेकांपासून ७५ किमी अंतरावर फेकून देणाऱ्या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.