९० वर्षांचा स्वातंत्र्यसैनिक ७२ वर्षानंतर आपल्या पत्नीला भेटतो.. 

केरलच शेतकरी आंदोलन साल होतं. १९४६ चं. इंग्रजांच्या जुलमी राजवटीखाली कवुम्बई गावात शेतकऱ्यांचा लढा उभा राहतं होता. या लढ्यात केरळमधील हजारो शेतकरी सहभागी होत होते. याच आंदोलनात एक अठरा वर्षाचा तरुण सहभागी झालेला. त्याच नाव होतं नाम्बियार. नाब्मियारला क्रांन्तीच बाळकडू त्याच्या वडिलांकडून मिळालं होतं. त्याचे वडिल आणि तो दोघेही क्रांन्तीकारक. 

वयाच्या अठराव्या वर्षीच त्याचं लग्न शारदा नावाच्या मुलीबरोबर करून देण्यात आलं होतं. शारदा नव्या संसाराची स्वप्न पहात होती इतक्यातच कवुम्बई मधलं हे आंदोलन चिघळल होतं. नाम्बियार आणि त्याच्या वडिलांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. आंदोलन वाढलं, पुढे चिघळल. आदोलन करणाऱ्यांना आतमध्ये टाकून त्यांच्यावर अत्याचार करण्याचं धोरण ब्रिटीश शासकांनी राबवलं. 

नाम्बियार आणि त्याच्या वडिलांनी भूमिगत होण्याचा निर्णय घेतला. १८ वर्षाचा नाम्बियार आपल्या नव्या पत्नीचा, नव्या संसाराचा विचार न करता देशासाठी भूमिगत होवून क्रांन्तीकार्य करु लागला. 

हिकडे अवघ्या १४ वर्षाची त्याची बायको आणि आई एकटेच घरी असायचे. नाही म्हणायला आजूबाजूचे पाहूणे आणि इतर मंडळी असायचे पण रात्री अपरात्री इंग्रजांचे शिपायी घरात शिरून झडती घ्यायचे. अशा वेळी शारदाला आपल्या माहेरी पाठवणच योग्य आहे असा विचार झाला. तिला तीच्या माहेरी पाठवण्यात आलं. स्वातंत्र मिळालं, सगळं ठिक झालं की आपला नवरा पुन्हा येईल आणि आपल्याला घेवून जाईल अस स्वप्न माहेरी जाणाऱ्या शारदाचं होतं पण… 

शारदा माहेरी गेली, इकडे नाम्बियार आणि त्यांच्या वडिलांना अटक करण्यात आली. त्या दोघांना आठ वर्षांची शिक्षा ब्रिटीश शासनाने सुनावली. इंग्रजांच्या शिपायांनी त्याच राहत घर जाळून टाकलं. 

सालेम, कन्नूर, विय्यूर अशा वेगवेगळ्या जेलमध्ये नाम्बियार आणि त्याच्या वडिलांची रवानगी केली जायची. ११ फेब्रुवारी १९५० च्या रात्री नाम्बियारच्या वडिलांवर फायरिंग करण्यात आलं. ते का झालं हे आजही नाम्बियार यांना सांगता येत नाही पण त्या फायरिंगमध्ये त्यांना गोळ्या लागल्या.

या घटनांची माहिती शारदाच्या घरच्यांना मिळाली. अवघ्या १४ वर्षाच्या मुलीच्या वाट्याला आलेलं हे दुख: सहन न करण्यासारखं होतं. शारदाच्या घरातल्यांनी नाम्बियार आणि त्याचे वडिल गेले आहेत अशीच माहिती मिळाली होती. त्यांनी शारदाचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला. शारदाचं दूसरं लग्न लावण्यात आलं. पण इकडे नाम्बियार तीन गोळ्या झेलून देखील जिवंत होता. 

नाम्बियार जेलमधून सुटले तेव्हा त्यांनी शारदाची चौकशी केली. शारदाचं दूसरं लग्न झाल्याची माहिती त्यांना मिळाली. काही वर्ष तशीच गेली. स्वतंत्र भारतात आत्ता आपल्या कुटूंबाची चौकट पुन्हा बसवावी म्हणून ते कामाला लागले. काही वर्षात त्यांनी देखील दूसरं लग्न केलं. आत्ता शारदा आणि नाम्बियार यांच्याकडे फक्त एकमेकांच्या आठवणी होत्या. त्यापलीकडे दोघांच्या आयुष्यात वेगळ अस काहीच नव्हतं. 

साल २०१८, 

शारदाचा मुलगा भार्गवन सेंद्रिय शेती करण्याच्या विचारातून शोध घेत होता. भटकत असताना त्याला नाम्बियार यांच्या कुटूंबाचा पत्ता मिळतो. तो त्यांच्या शेतीत जातो, त्यांचे प्रयोग बघतो. हळुहळु चौकशी होते. मैत्री होते. आणि बोलता बोलता विषय निघतो. नाम्बियार यांच्या घरातले नाम्बियार याचं क्रांन्तीकार्य भार्गवनला सांगतात. भार्गवनला संदर्भ लागतो. तो चौकशी करतो तेव्हा समजत हे नाम्बियार दूसरे तिसरे कोणी नसून आपल्याच आईचे पहिले पती आहेत. ज्यांची ताटातूट झाली होती. 

भार्गवन घरी येवून आपल्या आईला शारदाला सगळ्या गोष्टी सांगतो, नाम्बियार जिवंत असल्याचं देखील सांगतो. नाही हो म्हणत शारदा नाम्बियारला भेटण्यासाठी तयार होते. 

नाम्बियार आणि शारदा एकमेकांना तब्बल ७२ वर्षांनंतर भेटतात. भारताच्या स्वातंत्र्यापुर्वी वेगळे झालेलं हे जोडपं २०१८ च्या शेवटी एकमेकांना भेटतं. या तासाभराच्या भेटीत ते एकमेकांसोबत काहीच बोलत नाहीत, त्यांना काय वाटतं हे जगाला सांगण्यासाठी त्यांच्या डोळ्यात अश्रूशिवाय दूसरं काहीच नसतं. 

हे ही वाचा. 

1 Comment
  1. sanket bhide says

    khup chan

Leave A Reply

Your email address will not be published.