एकटे शरद पोंक्षेच नाहीत तर नाना पाटेकरांनी देखील नथुराम गोडसेची भूमिका केली आहे

नाना पाटेकर हे भारतीय सिनेसृष्टीतलं एक वादळी व्यक्तिमत्व. आजवर मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नानांनी काम केले आहे.

नानांच्या अनेक भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. ‘अंकुश’ मधील समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा रविंद्र केळकर ते ‘नटसम्राट’ सिनेमातील आप्पासाहेब बेलवलकर पर्यंत चाळीसहून अधिक वर्ष नाना भारतीय सिनेसृष्टी गाजवत आहेत. 

नानांच्या अनेक भूमिकांबद्दल आजही भरभरुन बोललं जातं. त्यांचा ‘क्रांतीवीर’ मधला भ्रष्ट व्यवस्थेवर धारदार शब्दांनी आसुड ओढणारा प्रताप अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो तर ‘डाॅ. प्रकाश बाबा आमटे’ सिनेमातील त्यांनी साकारलेली प्रकाश आमटेंची लाघवी भूमिका नकळत समाजभान देऊन जाते.

नानांनी अनेक भूमिका साकारल्या पण नानांची एक दुर्लक्षित राहिलेली भूमिका म्हणजे नथुराम गोडसे. 

ब्रिटीश टी. व्ही. वर ‘लाॅर्ड माऊंटबॅटन- द लास्ट व्हाॅईसराॅय’ हि सिरीयल येणार होती. या सिरीयलमधील सेक्रेटरी मेनन या भूमिकेसाठी नानांना विचारणा झाली. भूमिका चांगली असुनही नानांनी याच सिरीयलमधील नथुराम गोडसेची व्यक्तिरेखा साकारण्याची इच्छा दिग्दर्शकांसमोर व्यक्त केली. टाॅम क्लेग हे सिरीयलचे दिग्दर्शक होते. 

टाॅमनी नानांना यामागचं कारण विचारलं.

आपली मतं स्पष्टपणे मांडण्याचा नानांचा स्वभाव. ‘माहित नाही, करायचंय!’

असं उत्तर नानांनी दिलं. टाॅमनी सिरीयलमध्ये नथुरामच्या भूमिकेची लांबी हि एक मिनीटापेक्षा कमी आहे, याची कल्पना नानांना दिली. या सर्व गोष्टींची आधीच जाणीव असली तरीही नानांनी हि भूमिका करायचं ठरवलं. 

1986 साली हि ब्रिटीश सिरीयल प्रसारीत झाली होती. गांधीजी अनुयायांसह चालत चालत येत आहेत आणि तिथे लोकांच्या गर्दीत नथुराम गांधींजींना नमस्कार करण्यासाठी पुढे येतो, असा एक प्रसंग या सिरीयलमध्ये आहे.

पांढरा सदरा, त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट, काळी टोपी अशा पोशाखात नथुराम गोडसेच्या भूमिकेत नाना पाटेकर पाहायला मिळतात. अगदी 30-40 सेकंदांच्या या सीनमध्ये नाना पाटेकर प्रभावी अभिनय करतात. हिंदी सिनेमांमधील ज्येष्ठ कलाकार ए. के. हंगल हे या सिरीयलमध्ये पटेलांच्या भूमिकेत झळकले होते.

View this post on Instagram

'Lord Mountbatten- The Last Viceroy' हि ब्रिटीश टी.व्ही. वरील एक मालिका. या मालिकेचे दिग्दर्शक दिग्दर्शक टाॅम क्लेग (Tom Clegg) यांनी सेक्रेटरी मेनन या भुमिकेसाठी नाना पाटेकरांना विचारले. परंतु नाना पाटेकर यांनी दिग्दर्शकांना नथुराम गोडसे हि भुमिका करायची इच्छा आहे असे सांगीतले. सिरीयलमध्ये या भुमिकेची लांबी फक्त एक मिनीट आहे, असे दिग्दर्शकांनी नानांना सांगीतले. भुमिकेच्या लांबीची कल्पना असुनही नाना पाटेकरांनी नथुराम गोडसेची व्यक्तिरेखा या सिरीयलमध्ये साकारली. नामवंत पत्रकार निखिल वागळे यांनी 'ग्रेट भेट' कार्यक्रमात या भुमिकेविषयी नानांना विचारले. त्यावर नाना म्हणाले,"एक शिक्षित माणुस असं कृत्य का करत असेल हे आजतागायत मला पडलेलं कोडं आहे." हि ब्रिटीश सिरीयल 1986 सालातली आहे. . . Follow : @cinema_lover96 Follow : @cinema_lover96 Follow : @cinema_lover96 . . #nanapatekar #gandhi #lordmountbatten #viceroy #tvserial #nathuramgodse #mahatmagandhi #mahatma #nanapatekarstyle #nanapatekarmemes #zeemarathi #starpravah #sonymarathi #coloursmarathi #zeeyuva #hollywood #tomclegg #akhangal #godse #aggabaisasubai #balumamachyanavanachangbhala #marathi #marathiactor #bollywood #nikhilwagle #greatbhet #india #partition #cinenalover #सिनेप्रेमी @nana.patekar @nikhil.wagle23

A post shared by सिनेप्रेमी ❤ (@cinema_lover96) on

एका मुलाखतीत नानांना या भूमिकेविषयी प्रश्न विचारला असता नानांनी उत्तर दिलं की,

‘एखादा शिक्षित माणूस असं कृत्य का करत असेल हे मला आजतागायत पडलेलं कोडं आहे.’

नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने नानांचा नथुराम गोडसेच्या पोशाखातला फोटो संग्रही ठेवला आहे. 

गेल्या दोन वर्षांपासुन नानांचा कोणताही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. 2018 साली ‘आपला माणूस’ आणि रजनीकांत सोबतचा ‘काला’ हे नानांचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. यानंतर नानांचे चाहते त्यांच्या नव्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

एका मुलाखतीत नानांनी ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘सखाराम बाइंडर’मधला विखार नानांना या नाटकाप्रती आकर्षित करतो. ‘सखाराम बाईंडर’च्या निमित्ताने नाना पुन्हा रंगभूमीवर आले तर त्यांचा दर्जेदार अभिनय पाहणं हि सर्वांसाठीच एक पर्वणी ठरेल. तसेच सध्याच्या सामाजिक व्यवस्थेवर भाष्य करणारा एक सिनेमा नाना दिग्दर्शित करणार आहेत, अशी सुद्धा मध्यंतरी चर्चा होती.

‘प्रहार’ नंतर नाना या नव्या सिनेमाच्या माध्यमातुन खुप वर्षांनी दिग्दर्शनाकडे वळणार होते. परंतु या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे नानांनाच ठाऊक! 

  •  भिडू देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.