नाना पटोले एअर फोर्समध्ये सिलेक्ट झाले होते पण….

शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरणारा नेता अशी ओळख असणारे नाना पटोले.  सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा कारभार संभाळत आहे. एक आक्रमक नेता म्हणून त्यांचं राजकारणात नाव घेतलं जात.

तसं पाहिलं तर नाना पटोले एक असे नेते ज्यांचं कोणतही बॅकग्राऊंड नव्हतं. पण लीडरशिप क्वालिटी त्यांच्यात नेहमीच होती. कॉलेजमध्ये शिकत असताना दिवसभर लोकांची वेगवेगळी काम करायची, त्यांना हवी ती मदत करणं गावाच्या सार्वजनिक कामात महत्वाची भूमिका पार पाडणं आणि त्यानंतर रात्री उशिरा घरी पोहोचणं. त्यांच्या या कामामुळेचं गावकरी त्यांना मानायची.

जवळपास ७०० लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यातील सुकळी हे त्यांचं गाव. गावकऱ्यांनी त्यांना निवडणुकीत उभं राहण्याचा आग्रह धरला. गावकऱ्यांच्या या आग्रहाखातर १९९२ मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत उभा राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांना त्यांनी तिकीट मागितली परंतु तिकीट दिली नाही. पण तरीसुद्धा नाना पटोले उभं राहिले आणि जिंकूनही आले.

आता नाना पटोलेंच्या राजकीय कारकिर्दीचा थोडा आढावा घ्यायचा झाला तर ते आधी काँग्रेसमध्येच होते, नंतर ते भाजपमध्ये गेले. पण भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, हे समजताच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. मोदी सरकारविरोधात नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार आहेत. 

ते ४ वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिले आहेत. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली होती. पण नंतर त्यांनी राजीनामा दिला.

तर आपल्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी नाना पटोलेंना गावकऱ्यांचा पाठिंबा होता पण घरातून निवडणुकीत कोणत्याचं प्रकारची मदत झाली नाही. एकच कुर्ता पायजमा असताना निवडणूक जिंकलो अशी आठवण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगितात.

नाना पटोले या निवडणुकीचा किस्सा सांगताना की, निवडणुकीची मतमोजणी सुरु होती. त्यांच्या विरुद्धचा उमेदवार पहिल्या राऊंडमध्ये १२०० मतांनी पुढे होते. हे घरच्यांना समजल्यावर सगळ्यांनाच टेन्शन आलं. एकतर शेतकरी कुटुंबातील पोरानं राजकारणात जात काही त्यांना पटतं नव्हतं.

त्यात नाना पाटोळे यांचे वडील फाल्गुनराव कडक शिस्तीचे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाचा पहिल्या राउंडचा निकाल पाहता त्यांच्या वडिलांनी हरला तर त्यांना बायकोसोबत घरातून बाहेर काढतो, असं ठणकावून सांगितलं होत. 

पण त्यावेळी पारडं फिरलं आणि दुसऱ्या राउंडमध्ये नाना पटोले पुढे गेले आणि नुसते पुढे गेले नाही तर ५ हजार मतांनी जिंकले सुद्धा.

निवडणुकीत जिंकल्यावर सुद्धा नानांच्या वडिलांनी त्यांना भ्रष्टाचाराविरोधात काम कर,अशी तंबी दिलेली. एवढंच नाही तर संस्था, कारखाने काढायचे नाहीत, जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणानं पार पडायची.

नाना पटोले आणि त्यांच्या वडिलांचं नातं फार घट्ट होत. नाना पटोलेंनी एका वृत्तसंस्थेला सांगिलते कि, वडिलांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ते पाळायचे. वडिलांना दिलेला मंत्र आज माझ्या कामाला आला.

आपल्या वडिलांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या पण एक गोष्ट नानांना नेहमी खटकते कि, वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो याची. नाना पाटोले सांगतात ते  आमदार असताना त्यांच्या वडिलांना कॅन्सरने ग्रासलं. त्यांच्या कॅन्सर पार तिसऱ्या स्टेजला गेलेला, त्यामुले वाचण्याची काही शक्यता डॉक्टरांनी दिली नव्हती. 

ऑपरेशन करुन वडिलांच्या कॅन्सरची गाठ काढली. त्यानंतर फाल्गुनरावांना घरी जायचं होत.  पण नाना पटोले डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाण वागत होते. म्ह्णून फाल्गुनरावांनी त्यांना आपल्या बाकीच्या मुलांना सांगितले कि,नानाला सांगा मला घरी न्यायला. फाल्गुनरावांना आपला शेवटचा श्वास आपल्या मातीत आपल्या गावात घ्यायचा होता. पण नानांनी डॉक्टरांच्या सांगण्यावरुन त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवले. पुढे वडिलांचा तिथेच मृत्यू झाला. त्यामुळे वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही याची खंत नाना पटोलेंना आजही आहे.

अशीच आपल्या शाळेची आठवण नाना पटोले एका वृत्तसंस्थेला सांगतात. त्यांचं चौथीपर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषेदेत झालेलं. पुढे ते चंद्रपूर आणि त्यानंतर उच्च शिक्षणासाठी गोंदियाला गेले. नाना पाटोलेंनी मिलिट्रीच्या परीक्षा देखील दिल्या. ज्यात एअरफोर्सच्या परीक्षेत त्यांनी बाजी मारली होती. पास झाल्यानंतर नानांना चांगली सरकारी नोकरी मिळाली म्हणून सगळे खुश होते. पण एअरफोर्स म्हंटल कि, घरापासून लांब राहणं.

परीक्षेत पास झाल्यावर नोकरीसाठी फॉर्म आला, त्यावर पालकांची सही घ्यायची होती. फाल्गुनरावांना नानांची ही नोकरी पलटी नव्हती किंवा त्यांना नानांना लांब पाठवायचं नव्हतं. म्हणून  फाल्गुनराव नानांना जरा टोचूनच बोलेल कि, एक पोरगा आधीच कन्याकुमारीला, त्यात तू पण काश्मीरला जा. आणि आम्ही जातो काशीला.

वडिलांचे हे बोलणं नानांच्या मनाला लागलं त्यांनी तिथंच तो एअर फोर्स भरतीचा फॉर्म फाडून टाकला आणि आईवडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

आता नानांना सरकारी नोकरी तर नाकारावी लागली, पण फाल्गुनरावांना बहुधा आधीच कळालं असावं कि आपला पोरगा पुढं जाऊन सरकार चालवण्यात महत्वाची भूमिका पाडेल.

हे ही वाचं  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.