इन्फोसिसच्या चेअरमनने कंपनी सोडली आणि संपूर्ण देशासाठी आधार कार्ड बनवलं….

आता भारतात आजच्या घडीला अशी एकही योजना नसेल का जिच्यात आधारकार्ड गरजेचं नाही. प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड गरजेचं आहे. तीच आपलीओळख म्हणून सगळीकडे मिरवावी लागते. पण या आधारकार्डचा शोध इन्फोसिसच्या मालकाने लावलाय यावर आपला कोणाचाच विश्वास बसणार नाही.

आता इन्फोसिस आणि आधारकार्ड यांचा काय संबंध तर सगळ्यात आधी आपण इन्फोसिसचे मालक कोण आहेत ते जाणून घेऊ, इन्फोसिसचे स्थापना कशी झाली आणि मग आधारकार्ड प्रकरणाकडे वळू.

नंदन निलकेणी

आजच्या काळात सगळ्यात प्रयोगशील व्यक्ती म्हणून नंदन निलकेणी यांचं नाव घेतलं जातं. २ जून १९५५ साली कर्नाटकमध्ये त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधन असल्याने आणि त्याबरोबरच अभ्यासात हुशार असल्याने त्यांनी एव्हरग्रीन ब्रांच म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. आयआयटी मुंबई मध्ये त्यांनी शिक्षण घेतलं.

१९७८ साली शिक्षणाबरोबरच त्यांनी पटनी कॉम्प्युटर सिस्टीममध्ये काम सुरु केलं. तिथे त्यांची मुलाखत घेतली ती एन. आर. नारायण मूर्ती यांनी. नारायण मूर्ती हे इन्फोसिस उभा करण्यामागचे मोठे आधारस्तंभ आहेत. नंदन निलकेणी यांच्यात त्यांना विशेष काहीतरी जाणवलं आणि त्यांना आपल्या टीममध्ये त्यांनी सामील करून घेतलं.

१९८१ साली निलकेणी , नारायण मूर्ती आणि अजून पाच सदस्यांनी मिळून स्वतःची नवीन कंपनी उभारली. ती कंपनी होती इन्फोसिस.

इन्फोसिस हि आयटी क्षेत्रातली आजवरची सगळ्यात मोठी कंपनी आहे. आज घडीला अनेक लोकांना इन्फोसिस रोजगार उपलब्ध करून देत आहे.

या इन्फोसिसचे प्रमुख होते नंदन निलकेणी.

ज्यावेळी नंदन निलकेणी इन्फोसिसचे सीईओ होते त्या काळात इन्फोसिसचा दर्जा वाढत गेला. पुढे ते इन्फोसिसचे चेअरमन सुद्धा झाले. त्यांची ओळख आणि सामान्य माणसांसोबत असणारे संबंध हे पुढे त्यांना राजकारणात घेऊन आले. भारतभरात इन्फोसिसचा बोलबाला तेव्हाही होतंआणि आजही आहेच.

तत्कालीन भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी नंदन निलकेणी यांना खास बोलावून घेत त्यांना सांगितलं कि तुमच्या बुद्धिमत्तेचा उपयोग भारताला व्हावा. भारतासाठी काहीतरी भरीव काम तुम्ही करायला हवं. इथून सुरु झालं ते आधार कार्ड प्रकरण. २०१० साली आधाराची आयडिया नंदन निलकेणी यांच्या डोक्यात आली.

भारतीय नागरिकांची काहीतरी विशिष्ठ ओळख असावी म्हणून आधार कार्डची सुरवात झाली. युनिक आयडेंटिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणून आधार कार्ड सुरु झालं. हा सगळ्यात महत्वाचा शोध भारतासाठी मानला गेला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आधार कार्ड सुरु झालं ते तिथून पुढे आधार कार्डशिवाय प्रवेश ग्राह्य धरले गेले नाही.

बँकेतून पैसे ट्रान्सफर करणे असो किंवा ऑनलाईन पेमेंट करणं असो युपीआयचं संशोधन श्रेय नंदन निलकेणी यांनाच जातं.

सगळ्याच क्षेत्रात आधार कार्डची सक्ती केली गेली कारण ज्यावेळी आपण आधार कार्डला जी माहिती दिली होती ती आपली ओळख आणि खाजगी माहिती होती, तीच पुढे आपल्या कागदपत्रांना उपयोगी पडू लागली.

मनमोहन सिंग नंदन निलकेणींवर प्रचंड खुश होते. देशाचं कॅबिनेट हे हुशार माणसांनी चालवावं असं मनमोहनसिंग यांचं मत होतं.

२०१४ साली त्यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीचं तिकीट भेटलं खरं पण ते लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. अडीच लाखांहून अधिक मतांनी ते पराभूत झाले होते. पुढे आपल्या अनेक भाषणामध्ये ते सांगत राहिले कि,

शिकलेल्या लोकांना राजकारणात किंमत नाही आणि निवडणूक लढणे हि माझी आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती.

२०१४ सालच्या सगळ्यात श्रीमंत उमदेवारांपैकी ते एक होते. त्यांच्याकडे तब्बल ७, ७१० करोड रुपयांची संपत्ती होती. अर्थातच इन्फोसिस सारखी कंपनी त्यांची होती त्यामुळे त्यात काही आक्षेप नव्हता. केवळ इन्फोसिस नाही तर इतर छोट्यामोठ्या १२ कंपन्यांचे ते मालक आहेत.

अनेक स्टार्ट अप नंदन निलकेणी चालवतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते मोठ्या प्रमाणावर चॅरिटी करतात. २०१७ साली नंदन निलकेणी आणि त्यांच्या पत्नीने आपल्या एकूण संपत्तीपैकी ५०% संपत्ती हि बिल गेट्सच्या एका सामाजिक संस्थेला दिली होती.

आयटी क्षेत्रातील सगळ्यांच्या ओळखीचा चेहरा म्हणजे नंदन निलकेणी अशी त्यांची ओळख आहे. प्रॅक्टिकल नॉलेज आणि त्यावर व्यापक स्वरूपात काम करणे हा निलकेणींचा हातखंडा आहे. आधार कार्डचा शोध लावून भारतासाठी थोडंफार योगदान देता आलं याचा अभिमान असल्याचं नंदन निलकेणी सांगतात.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.