चंद्राबाबूंचा पप्पू आता स्वतःचा इमेज मेकओव्हर करतोय

राहुल गांधी भलेही मोठा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचे महत्वाचे चेहरे असले,  हाय कमांडच्या निर्णयात त्यांचीही बाजू महत्वाची मानली जात असली तरी सुद्धा त्यांची तयार झालेली ‘पप्पू’ची इमेज त्यांच्या बाकीच्या भूमिकेपेक्षा जास्त गडद आहे. म्हणजे पप्पू म्हंटल कि राहुल गांधी यांचचं नाव येत.

पण आपल्या देशाच्या राजकारणात पप्पू म्हणून आणखी एक चेहरा फेमस आहे. तो म्हणजे तेलुगु देशम पार्टी अर्थात टीडीपीचे नेते नारा लोकेश. आता नारा लोकेश आणि राहुल गांधी यांच्या वयात आणि पक्षात जरी फरक असला तरी, दोघेही आपल्याला पडलेलं पप्पू हे पुसून टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

तर ३८ वर्षीय नारा लोकेश हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र. ज्यांना त्यांचे विरोधी पक्ष नेते पप्पू म्हणून हाक मारतात. पण नारा लोकेश आपली ही फ्रेम बदलण्याचा जोरदार प्रयत्न करत आहेत. म्हणजे आधीचे नारा लोकेश म्हणजे लठ्ठ शरीर, क्लीन शेव, शूज घालणं, आणि तोडकी – मोडकी तेलगू. 

या सगळ्या गोष्टींचा फायदा विरोधकांनी घेतला आणि ते बॉडी शेमिंगचे शिकार बनले. ज्यातून त्यांना ‘पप्पू’ हे नाव बनलं. 

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून शिकून आलेले नारा लोकेश आपल्या वडिलांच्या कार्यकाळात म्हणजे २०१४ ते २०१९ या दरम्यान पंचायत राज आणि ग्रामीण विकास मंत्री होते सोबतच त्यांच्यावर आयटी मंत्रालयाची देखील जबाबदारी होती. या मंत्रिपदावर असताना एसी रुमध्ये बसून कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधन हेच त्यांचं काम. 

आता त्यांना पप्पू हे नाव पडलं २०१९ च्या निवडणुकीवेळी. 

म्हणजे २०१९ मध्ये नारा लोकेश यांनी मंगळागिरी जागेवरून पहिल्यांदा निवडणूक लढवली. पण वायएसआर काँग्रेसकडून त्यांचा ५००० मतांनी पराभव झाला. खरं तर १९८५ पासून टीडीपीला ती जागा जिंकताच आलेली नाही. पण नारा लोकेश यांनी त्याच जागेवर उभं राहून केविलवाणा प्रयोग करून पहिला. 

या दरम्यान पप्पू गाणं मोठं हिट झालं होत. त्यामुळे नेमकं आपल्या इमेजमुळे लोकेश यांना प्रचारावेळी ‘आंध्रचा पप्पू’ असं नाव पडलं. विरोधकांनी हेच उचलून धरलं. म्हणजे पार आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बहीण वाय.एस. शर्मिला यांनी निवडणूक प्रचारावेळी एक घोषणा दिली जी खूप लोकप्रिय झाली. ती म्हणजे ‘बाय बाय बाबू (चंद्रबाबू नायडू) आणि ‘बाय बाय पप्पू’

आणि तेव्हापासून ‘पप्पू’ नावाचा ठपका त्यांच्यावर पडलाचं. 

पण सध्याचे चित्र पाहून असं म्हणायला काही हरकत नाही कि, आधीचे नारा लोकेश सध्याचे नारा लोकेश यांच्यात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. म्हणजे राहून गांधींच्या यांच्यापेक्षाही या नेत्याने टीडीपी प्रशासक म्हणून आपला अनुभव आणि कुशाग्रता सिद्ध केली आहे. 

आता ते आपल्या जुन्या अवतारातून बाहेर पडत, छोटी दाढी, चप्पल आणि चांगली तेलगू भाषा बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, जो प्रत्यक्षात दिसूनही आलाय. महत्वाचं म्हणजे गेल्या २ वर्षात त्यांनी आपलं २४ किलो वजन कमी केलंय. 

आणि हा बदल फक्त शरीरापुरता नाही तर आपल्या राजकीय भूमिकेत, निर्णय घेण्याच्या बाबतीत अर्थात प्रत्यक्षात जमिनी स्तरावर सुद्धा पाहायला मिळतोय. म्हणजे ते लोकांची जवळून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, घरोघरी जाऊन दौरा करत आहेत. वादळग्रस्त भागात स्वतः भेट देत आहेत, एकंदरीत काय तर एक जननेत्याची इमेज बनविण्यावर ते भर देत आहेत. 

आता तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण नारा लोकेश यांनी आपली ही नवीन इमेज तयार करण्यासाठी हैद्राबादच्या एका इमेज कंसल्टंटशी संपर्क साधलाय. जे त्यांच्या बारीक बारीक गोष्टींकडेही लक्ष देत आहेत. ज्यात आपली भाषा सुधारण्यावरही ते काम करत आहेत. 

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत लोकेश म्हणाले कि, 

त्यांचा टीडीपी पक्ष आता ‘तरुण पिढी’च्या नेत्यांना आघाडीवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. 

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.