फक्त भुताननेच नाही तर या ही देशांनी मोदींना त्यांचा सर्वोच्च अवॉर्ड दिलाय
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतान सरकारनं सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. आता भूतानसारख्या छोट्या देशाने हा सन्मान देण्याने या पुरस्काराचे महत्व कमी होत नाही कारण तो भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
त्यातही मोदी भूतानचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी देखील असल्याचं सांगितलं जातंय.
आता थोडक्यात पाहू मोदींना दिल्या गेलेल्या ‘नगदग पेल जी खोरलो’ या भूतानच्या सर्वोच्च नागरी सन्मानाबद्दल.
‘ऑर्डर ऑफ ड्रॅगन किंग’ म्हणूनही हा पुरस्कार ओळखला जातो. भूतानच्या लोकांसाठी आणि राज्याच्या सेवेसाठी ज्यांनी आजीवन प्रयत्न केले आहेत अशा व्यक्तींना या पुरस्कारने सन्मानित करण्यात येते. २००८ मध्ये सुरु करण्यात आलेला हा पुरस्कार आतपर्यंत फक्त भूतानच्याच लोकांना देण्यात आला होता.
नरेंद्र मोदी सरकारने करोना महामारीच्या काळात भूतानला भरभरून मदत केली होती. भूतानला कोविड लसींचा सर्वात मोठा पुरवठा भारताकडूनच झाला होता.
या अर्थाची फेसबुक पोस्ट टाकून भूतानचे पंतप्रधानाणीं मोदींचे अभिनंदन केले आहे. तसेच भूतान हा देश मोदींना एक आध्यत्मिक माणूस म्हणूनही पाहतो असंही भूतानचे पंतप्रधान म्हणालेत. पंतप्रधान मोदींनी २०१९ मध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यांनंतर आपला पहिला विदेशी दौरा भुतानलाच केले होता. त्यानंतर भारत-भूतान संबंध अधिक दृढ झाले होते. याचाच परिपाक मोदींना भूतानचा सर्वात सगळ्यात मोठा पुरस्कार देण्यात झाला असं आंतराष्ट्रीय विषयातील तज्ञांचं म्हणणं आहे.
पण मोदींना या आधी इतरही देशांनी त्यांचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवलंय. ते पुरस्कार एकदा बघाच
ऑर्डर ऑफ अब्दुलअज़ीज़ अल सऊद-सौदी अरेबिया सरकारतर्फे दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान मोदींना २०१६ मध्ये देण्यात आला होता.
स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान -अफगानिस्तानचा हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन मोदींना २०१६ मध्ये गौरवण्यात आला होतं.
ग्रैंड कॉलर ऑफ स्टेट ऑफ पॅलेस्टाईन – पॅलेस्टाईन सरकारनं हा पुरस्कार २०१८ मध्ये नरेंद्र मोदी यांना दिला होता.
ऑर्डर ऑफ जायद अवार्ड -संयुक्त अरब अमीरात जो दुबई,अबुधाबी ,शारजाह या राज्यांचा ग्रुप आहे त्यांनी २०१९ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च सन्मान दिला होता.
ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू अवार्ड – पुतिनच्या रशियानं २०१९ मध्येच मोदींना हा अवार्ड दिला होता.
द किंग हमाद ऑर्डर ऑफ़ द रेनेसां – बहरीन या देशानं २०१९मध्ये मोदींना हा अवॉर्ड देऊन गौरवलं होतं.
त्याच बरोबर साऊथ कोरिया सरकारतर्फे दिला जाणारा सेऊल शांति पुरस्कारही २०१८ मध्ये मोदींना मिळाला होता. युनाइटेड नेशन्स तर्फे दिला जाणारा पर्यावरण क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ‘चैंपियंस ऑफ द अर्थ’ अवार्ड मोदींना २०१८ मध्ये मिळाला होता. बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशननं मोदींना स्वच्छ भारत मिशनसाठी त्यांना ग्लोबल गोलकीपर अवार्ड देऊन गौरवलं होतं.
मोदींना २०१८-२०१९ च्या दरम्यान हे सर्व अवार्ड मिळाले आहेत. भारताची जागतिक राजकारण, अर्थकारण यांमध्ये वाढलेलं महत्व अधोरेखित करतात असं मत आंतरराष्ट्रीय विषयातील जाणकार व्यक्त करतात. त्यामुळं मोदींना जेव्हा अवॉर्ड होतो तेव्हा मोदींबरोबरचं भारताची देखील हवा होते एवढं नक्की.