मोदी ज्या सीतापुर हॉस्पिटलचं कौतुक करतात त्याचा इतिहास काय?

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. येत्या जानेवारी महिन्यात निवडणूक आयोग मतदानाच्या तारखा जाहीर करेलच परंतु आत्तापासूनच सगळेच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. निवडणुका येत आहेत म्हणल्यावर राज्यात केलेल्या विकासकामांचा लेखा -जोखा देणे आणि श्रेयवादाची लढाई लढणे हे ठरलेलेच असते.

त्यालाच सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही कारण कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अलीगडच्या दौऱ्यावर होते. तेंव्हा त्यांनी तेथील काही योजनांचे उद्घाटन केले. येथे विद्यापीठाच्या पायाभरणीच्या  कार्यक्रमामध्ये संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा सीतापूरचा उल्लेख केला.

ते म्हणाले की लहानपणी जेव्हा मला देशातील जिल्ह्यांची नावंही माहित नव्हती, तेंव्हापासूनच मी सीतापूरचे नाव ऐकले होते.

५५-६० वर्षांपूर्वी आमच्या गावातील कुणाच्याही डोळ्याला काही झालं तर प्रत्येकजण सीतापूरला जा असे म्हणायचे. कानावर सीतापूर हा शब्द अनेकदा पडायचा.  डोळ्यांच्या उपचारासाठी सीतापूर अजूनही प्रसिद्ध होते.

मोदी त्यांच्या भाषणात नेहेमीच म्हणतात कि, त्यांच्या आयुष्यात सीतापुर हॉस्पिटलचं विशेष स्थान आहे.

पण या सीतापुर हॉस्पिटलचा इतिहास काय ?

वर्ष १९२६ मध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त डॉ.महेश प्रसाद मेहरे यांनी अंधत्वाविरुद्ध मोहीम राबविण्यासाठी सीतापूरच्या खैराबाद शहरात डोळ्यांच्या दवाखान्याची पायाभरणी केली होती. डॉ.महेश प्रसाद मेरे नगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टर होते. शासकीय सेवेचा राजीनामा देऊन सन १९२६ मध्ये त्यांनी हे रुग्णालय सुरु केले.

इंग्रजांच्या राजवटीच्या काळात डॉ. मेहरे मातीच्या एका घरात हे हॉस्पिटल चालवत असायचे.

सुरुवातीच्या काळात, क्लिनिकमध्ये रुग्णांना पाहण्या व्यतिरिक्त, तो गावोगावी जाऊन शिबिरे लावून रुग्णांवर उपचार करत असे.

त्यांच्या कामाचा विस्तार वाढू लागला. जास्त संख्येने येणाऱ्या रुग्णांना सामावून घेण्यासाठी तात्पुरत्या खाच झोपड्या बांधल्या गेल्या. डोळ्यांचे रुग्ण मोठ्या संख्येने येऊ लागले. खैराबाद या छोट्या शहरात या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये त्यांना सामावून घेणे अशक्य झाले. आणि मग हे हॉस्पिटल सीतापूरच्या जिल्हा मुख्यालयात हॉस्पिटल हलवले.

सध्याच्या नेत्र रुग्णालयाच्या इमारतीचा पाया १९४३ मध्ये घातला गेला. श्रीमती नारायणो देवी यांनी याच्या पायाभरणीसाठी १० हजार दिले होते. चांगल्या कामाला लोकांनी मान्यता दिली आणि सरकारी अनुदान आणि देणग्या येऊ लागल्या.

त्यासाठी १९४५ मध्ये त्यांनी जिल्हा मुख्यालयात राणी एलिझाबेथ यांनी दान केलेल्या ११.२२ एकर जमिनीवर सीतापूर नेत्र रुग्णालयाची स्थापना केली.

नेत्र रुग्णालय सीतापूरची मुख्य इमारत १९२ जनरल वॉर्ड रुग्ण आणि ३७ खाजगी वॉर्डांची क्षमता असलेल्या १९४५ साली पूर्ण झाली.  रुग्णांची संख्या जसजशी वाढत गेली तसतशी अधिकाधिक इमारती बांधल्या जात होत्या. सध्या नेत्र रुग्णालय सीतापूरमध्ये खाटांची संख्या ८०० आहे त्यापैकी ६०० जनरल वॉर्डमध्ये आणि २०० खाजगी वॉर्डमध्ये आहेत.

त्यांच्या अभूतपूर्व योगदानाबद्दल, मेहरे यांना अनेक मोठ्या सन्मानांनी आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नंतर त्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आणि १९७५ मध्ये नेत्र रुग्णालय म्हणून स्थापित करण्यात आले. मग हे हॉस्पिटल चालवण्याची जबाबदारी जिल्हा नेत्र मदत सोसायटीकडे दिली.

आतापर्यंत २७ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे.

डॉ. मेहरे यांच्या कामगिरीची आणि त्यांच्या या रुग्णालयाची केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये चर्चा  झाली आणि त्यांच्या ख्यातीमुळे परदेशातील रुग्ण उपचारासाठी सीतापुरात येऊ लागले. 

सीतापूर नेत्र रुग्णालयाचे सद्याचे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वजीत यांनी सांगितले की, येथे पूर्वी मोतीबिंदूचा उपचार केला जात होता, परंतु नंतर कॉर्निया प्रत्यारोपणापासून काचबिंदूपर्यंतचा उपचारही येथे यशस्वीपणे करण्यात आले. परिस्थिती अशी आहे की गेल्या आर्थिक वर्षात सुमारे २.२५ लाख रुग्ण येथे OPD मध्ये दिसले आणि २७ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

सीतापूर नेत्र रूग्णालयात डोळ्यांच्या रूग्णांच्या उपचाराबरोबरच डोळ्यांच्या आजारांशी संबंधित अनेक अभ्यासक्रमही चालवले जात आहेत, जिथे वैद्यकीय सेवेत आपले भविष्य पाहणारे विद्यार्थी अभ्यासासाठी येत असतात.

तर असाय या या चर्चेत आलेल्या हॉस्पिटलचा इतिहास. ज्याप्रकारे पंतप्रधानांनी या हॉस्पिटल चा उल्लेख केला आहे त्यामुळे कदाचित या हॉस्पिटल्सचा चेहरा मोहरा बदलू शकतो हे मात्र नक्की.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.