मोदींनी वलसाडमधूनच प्रचाराला सुरुवात केली याचं कारण म्हणजे, वलसाडचा इतिहास

गुजरात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. १ आणि ५ डिसेंबर ला दोन टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. भाजप आपली सत्ता टिकवण्यासाठी संपूर्ण ताकतीने उतरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेससाठी ही अस्तित्वाची  लढाई असणार आहे. मागच्या ३५ ते ४० वर्षात गुजरात मध्ये काँग्रेस भाजप मध्ये सरळ लढत राहिली. यंदा ही लढत तिहेरी असणार आहे. यात आम आदमी पक्षाची भर पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचाराला सुरुवात केली आहे. रविवारी ते वलसाड येथे सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी त्यांनी ए फॉर आदिवासी आणि गुजरात आम्ही तयार केलंय अशा घोषणा केल्या. निवडणुकीशी गुजरातची अस्मिता जोडून मोदींनी नवीन एक समीकरण जोडले आहे. यावेळी त्यांना ऐकण्यासाठी दुरून लोक आली होती. 

तसे पाहायला गेले तर वलसाड हे गुजरात मधले मोठे शहर नाही, राजधानी सुद्धा नाही मग प्रश्न उपस्थित केला जात आहे की, वलसाड येथून मोदींनी प्रचाराचा श्रीगणेशा का केला आहे? 

२००७ पर्यंत वलसाड मध्ये तीन गोष्टी खूप फेमस होत्या. 

पहिले म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई, (मँगो) आंबे आणि मच्छर. असे तीन  M महत्वाचे समजले जात होते. त्यावेळी नरेंद्र मोदी याच वलसाड मतदारसंघातून निवडून जात होते. मात्र तेथील लोक त्याचं कनेक्शन मोरारजी देसाई यांच्या सोबत असल्याचे दाखवत. 

२०१७ मध्ये मोदी हे वलसाड येथे प्रचारसभेसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सुमित्राबेन यांचा एक किस्सा सांगितला.  नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये सद्भावना उपवास पकडला होता. त्यावेळी धर्मापुर जिल्ह्यातील सुमित्राबेन यांनी त्यांच्यासाठी सुप तयार केले होते. तेव्हा वलसाड येथे चौथा M जोडला गेल्याचे सांगितले होते. 

वलसाड येथील M फॅक्टर बरोबर अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे जो पक्ष येथील जागा जिंकतो सत्ता त्यालाच मिळते असा इतिहास आहे. 

गेल्या ३२ वर्षांपासून भाजप वलसाड येथील जागा जिंकत आहे.

तेव्हा पासून भाजप गुजरातच्या सत्तेत आहे. या अगोदर वलसाड येथून काँग्रेसचा उमेदवार निवडून येत होता आणि सत्तेत काँग्रेस होती. १९७५ ला वलसाड मतदार संघातून  काँग्रेस ‘ओ’ चे उमेदवार केशव पटेल निवडून आले होते. याच वर्षी काँग्रेस मधून फुटून काँग्रेस ओ तयार झाली होती. काँग्रेस ओ ने जनसंघ, केएलपी आणि इतर पक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. बाबू भाई पटेल हे मुख्यमंत्री झाले होते. 

तर १९८० मध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत वलसाड मधून दौलतभाई देसाई निवडून आले होते. आणि राज्यात काँग्रेसची सत्ता काँग्रेस मध्ये आली होती. मात्र १९८५ च्या निवडणुकीत दौलतभाई देसाई यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिली आणि अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत देसाई यांचा पराभव झाला. काँग्रेसचे बरजोरजी पारदीवाला निवडून आले होते.

दौलतभाई देसाई यांनी १९९० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला

देसाई यांनी १९९० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. वलसाडमधून ते दुसऱ्यांदा विजयी झाले. भाजपने जनता दलासह सरकार स्थापन केले आणि चिमणभाई पटेल मुख्यमंत्री झाले. भाजपचे केशुभाई पटेल उपमुख्यमंत्री झाले. मात्र, लवकरच युती तुटली.

त्यानंतर १९९५, १९९८, २००२ आणि २००७ मध्ये दौलतभाई देसाई येथून विजयी झाले. या सर्व निवडणुकांमध्ये भाजपने सरकार स्थापन केले. मात्र २०१२ मध्ये भाजपने वलसाडमधून देसाई ऐवजी भरतभाई पटेल यांना उमेदवारी दिली. ते या मतदार संघातून दोन वेळा निवडून आले. तसेच १९९५ पासून भाजप गुजरातच्या सत्तेत आहे. 

गेल्या वेळी भरतभाई पटेल यांनी वलसाडमधून नरेंद्र कुमार तांडेल यांचा पराभव केला होता. यावेळी गुजरातमध्ये काँग्रेसची जागा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या (आप) रूपाने भाजपसमोर नवीन आव्हान असणार आहे.

वालसाडचा इतिहास पाहिला तर लक्षात येतं. त्यामुळे कुठलाही पक्षाला गुजरात मध्ये सत्ता स्थापन करायची असेल तर वलसाड जिंकणे किती महत्वाचं आहे.

हे ही वाच भिडू 

 

   

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.