नरसिंह राव आणि वाजपेयी यांच्या PMO मध्ये अनेक ‘बड्या’ नेत्यांच्या ‘सिक्रेट’ फायली होत्या ?
सद्या समीर वानखेडे प्रकरणावरून किंव्हा त्याआधी घडलेल्या वाझे प्रकरणावरून आपण पाहत आलोय सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात बड्या अधिकाऱ्यांचा वापर करतात आणि घाणेरड राजकारण करत असतात. सत्तेत असलेल्या मंत्र्यांची विरोधक जुने प्रकरणं उकरून काढत असतात तर सत्ताधारी मंत्री विरोधकांच्या जुन्या फायली काढून पलटवार करत असतात. सत्तेचा वापर करत विरोधकांच्या नेत्यांना एखाद्या प्रकरणात गोवायचं अन मग त्यांच्या मागे ईडी एनसिबी सारखी यंत्रणा लावायची….मग तो कोणताही पक्ष असो हे असंच चालत राहणार..
मग प्रश्न पडतो असा पडतो कि, असं राजकारण पूर्वी पण चालायचं का ??????
काही अशा बातम्या वाचण्यात आल्या होत्या कि, माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी डझनहून अधिक ‘काही बड्या’ नेत्यांविरुद्धच्या काही सिक्रेट फाइल्स जपून ठेवल्या होत्या….हो असा खुलासा पीएमओचे माजी अधिकाऱ्याने एच.डी. देवेगौडा यांच्या चरित्रात केला आहे जे चरित्र लवकरच पब्लिश होणार आहे.
देवेगौडा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या १३ दिवसांच्या सरकारनंतर १९९६ मध्ये नरसिंह राव यांची जागा घेतली होती. नरसिंह राव यांनी देवेगौडा यांच्याकडे या सगळ्या सिक्रेट फाइल्स सुपूर्द केल्या होत्या, ज्या फायली घेण्यासाठी त्यांनी त्यांचे निकटवर्तीय आणि पीएमओमधील तत्कालीन सहसचिव एस.एस. मीनाक्षीसुंदरम यांना पाठवले होते….तेच अधिकारी ज्यांनी हे सर्व खुलासे केले आहेत.
देवेगौडा यांचे दोन उत्तराधिकारी-आय.के. गुजराल आणि वाजपेयी यांच्या कार्यकाळात या फाईल्स पीएमओमध्ये जपून ‘ठेवल्या’ होत्या. मात्र, वाजपेयी पदावरून पायउतार झाल्यानंतर त्या फायलींचे पुढे काय झाले ? त्या फायली पीएमओमध्येच होत्या की काढून टाकण्यात आल्या हे स्पष्ट झालेले नाही…
मीनाक्षीसुंदरम यांनी सुगाता श्रीनिवासराजू यांना त्यांच्या ‘फॅरो इन अ फील्ड’ नावाच्या चरित्रासाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “या बड्या नेत्यांच्या सिक्रेट फाईल्स ‘ॲटम बॉम्ब’सारख्या होत्या. राव यांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि बाहेरील महत्त्वाच्या व्यक्तींच्या डझनभर फायली दिल्या होत्या. या सगळ्या फायली मुलायमसिंह यादव, जे. जयललिता, एस. बंगारप्पा, शरद पवार आणि इतर नेत्यांच्या होत्या”,
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रकाशित केलेले हे पुस्तक या महिन्याच्या शेवटी प्रकाशित होण्याची शक्यता सांगितली जातेय.
पण जेंव्हा हे पुस्तक येणार तेंव्हा बराच मोठ्ठा वाद निर्माण होऊ शकतो हे मात्र नक्की
मीनाक्षीसुंदरम यांनी पुस्तकात उद्देशून लिहिलेय की, “राव यांच्याकडे अशा राजकीय व्यक्तींच्या काही गोपनीय फायली होत्या ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप येऊ शकतो, या फायली त्या नेत्यांनी केलेल्या गैरवर्तनाच्या विरोधात तसेच राजकीय फायद्यासाठी वापरल्या जाऊ शकतात”, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
‘या सर्व फाईल्स एखाद्या ॲटम बॉम्ब’पेक्षा कमी नाहीत.
शरद पवार हे नरसिंह राव सरकारमध्ये जवळपास २० महिने संरक्षण मंत्री राहिले होते. ते संरक्षण मंत्री असतांनाच १९९३ मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी पवारांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईला जाण्यास सांगितले होते.
समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव हे देवेगौडा सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर १९९० मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बनलेले बंगारप्पा हे नोव्हेंबर १९९२ पर्यंत म्हणजेच नरसिंह राव यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या काळात या पदावर होते. आणि याच काळात म्हणजेच नरसिंह राव पंतप्रधान असताना जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या.
मीनाक्षीसुंदरम यांच्या म्हणण्यानुसार, एका दिवशी नरसिंह राव देवेगौडा यांना म्हणाले होते की “ते पंतप्रधान म्हणून वापसी करणार नाहीत” त्यामुळे त्यांनी त्या सिक्रेट फायली त्यांच्याकडून काढून घ्याव्यात.
मग नरसिंह राव यांनी गौडा यांना हे काम करण्यासाठी एक विश्वासातला अधिकारी सुचवायला सांगितला.
मीनाक्षीसुंदरम यांच्या सांगण्यानुसार, “नरसिंहराव यांनी देवेगौडा यांना अशा एका अधिकाऱ्याचे नाव द्यायला सांगितलं ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकू कि तो अधिकारी सुरक्षितरीत्या ह्या फायली सुपूर्द करेल. आणि मग देवेगौडा यांनी मला राव यांच्याकडे पाठवले आणि मला सांगितले की मला त्यांना फाइल्स दाखवायची गरज नाही, पण त्यात काय आहे ते मला थोडक्यात सांगा….पण या फाइल्स एखाद्या अणुबॉम्बपेक्षा कमी नव्हत्या”.
आता सगळं प्रकरण तुमच्या लक्षात आलंच असेल….थोडक्यात पीएमओच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत ते पीएमओमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते, तोपर्यंत त्या फाइल्स त्यांच्याकडेच होत्या.
“जेंव्हा वाजपेयींनी पदभार स्वीकारला, तेव्हा मी त्या फाईल्स अशोक सैकिया जे कि, वाजपेयींच्या काळात पीएमओमध्ये सहसचिव होते, त्यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या… मी जसा गौडा यांच्यासाठी होतो, तसाच तो वाजपेयींसाठी होता. दरम्यान, गुजराल पंतप्रधान झाल्यावर मीनाक्षीसुंदरम यांनी त्यांना फायलींची माहिती दिली. “ज्यांनी गुजराल यांनी मला त्या फायली माझ्याकडे ठेवण्यास सांगितले कारण त्यांच्याकडे विश्वासातील असा कोणता अधिकारी नव्हता. त्यानंतर वाजपेयी आल्यावर मी ब्रजेश मिश्रा यांना फायलींची माहिती दिली. त्यामुळे त्यांनीही मला या फायली माझ्याच जवळ ठेवण्यास सांगितले होते.”
शेवटी जेंव्हा मीनाक्षीसुंदरम यांनी लेखकाला सांगितल्यानुसार, “ PMO मधील त्यांचा कार्यकाळ संपत असताना, त्यांनी त्यांच्या जवळच्या फायली कोणाच्या तरी हाती सोपवायच्या होत्या. त्यानंतर अशोक सैकिया सेवेवर रुजू झाले होते. त्यांच्याकडे या फायली सोपवण्यात आल्या होत्या. वाजपेयींच्या राजीनाम्यानंतर अशोक सैकिया यांनी त्या फायली दुसऱ्या कोणाला दिल्या की नाही याची मला कल्पना नाही” असंही त्यांनी सांगितलं..
२००४ मध्ये डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधानपदी विराजमान झाले, तर २००७ मध्ये अशोक सैकिया यांचे निधन झाले. त्यानंतर त्या फायलींचे पुढे काय झाले, हा प्रश्न उरतोच आहे. जेंव्हा २०१४ मध्ये प्रथमच नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून रुजू झाले तेंव्हा त्यांचे प्रधान सचिव बनलेले नृपेंद्र मिश्रा यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देतांना म्हणलं होतं कि, “मी अशा कोणत्याही फायलींबद्दल ऐकलं नाही ना त्यांच्याबद्दल मला कोणीही काहीही बोललेलं नाही.”
इतकंच नाही तर याच प्रकरणी माध्यमांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधला होता, परंतु त्यांच्या कुटुंबातील एकाने पीएमओकडे अशा गोपनीय फायली असल्याची कसल्याही प्रकारची माहिती नाही म्हणून या मुद्द्याला स्पष्टपणे नाकारले होते.