भारतातली पहिली इन्श्युरन्स कंपनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झाली होती…

जेव्हा कोरोनाने सगळ्या जगात थैमान घातलं, तेव्हा सगळ्यांनाचं हेल्थ इंश्युरन्सचं महत्व पटलं. म्हणजे आधीच इंश्युरन्स असलेल्या लोकांना टेन्शन नव्हतं, पण ज्यांना इंश्युरन्स म्हणजे फुकटची इन्व्हेस्टमेंट वाटायची, विम्यासाठी बँकेने किंवा एखाद्या इंश्युरन्स कंपनीने फोन केला की कट करायचे  त्यांना याचं महत्व पटलं. ज्याचा परिणाम आपण पहिला कि, या महामारी दरम्यान आणि त्यानंतरही इंश्युरन्सचा लाभ घेणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

आणि फक्त आरोग्यच नाही तर कार, डेथ आणि होम इन्शुरन्स घेण्याकडेही लोकांना कल वाढत आहे.

आता इन्शुरन्स कंपनी म्हंटल कि, आपल्याला सरकारी मालकीची एलआयसी कंपनीचं जास्त अनुभवी आणि विश्वासाठी वाटते. पण तुमच्या माहितीसाठी त्याआधीही कित्येक वर्ष मार्केटमध्ये हवा होती ती नॅशनल इंश्युरन्स कंपनीची.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NIC) ही भारतातील सर्वात जुनी सामान्य विमा कंपनी. जिची स्थापना गोवर्धनदास दुतिया आणि जीवन दास दुतिया यांनी ५ डिसेंबर १९०६ साली केली. पश्मिच बंगालच्या कोलकात्यात त्याचे हेडक्वार्टर आहे.

आता स्वातंत्र्याआधीचा काळ म्हणजे तेव्हा वित्तीय सेवा एवढ्या मजबूत नव्हत्या. पण कंपनी स्थापनेमागचा हेतूही हाच होता. मरगळलेल्या अर्थव्यवस्थेत कंपनीने महत्वाची भूमिका बजावत एक वेगळी ओळख निर्माण केली.

स्वातंत्र्याआधी देशातील सर्वात मोठी विमा आणि विश्वासू कंपनी म्ह्णून नॅशनल इन्शुरन्सने नाव कमावलं. दरम्यान, १९७२ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना जेव्हा राष्ट्रीयीकरण झालं, तेव्हा २१ विदेशी आणि ११ भारतीय कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले, तेव्हा कॉमन इंश्युरन्सच्या ४ कंपन्या स्थापन करण्यात आल्या. सध्या या चार कंपन्या सरकारी मालकीच्या जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत कार्यरत आहेत.

परिणामी विमा कंपनी भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) चा भाग बनली, जी संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची होती. पुढे  ७ ऑगस्ट २००२ मध्ये जनरल इन्शुरन्स बिझनेस (राष्ट्रीयकरण) सुधारणा कायदा मंजूर झाल्यानंतर, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने भारताच्या मालकीची स्वतंत्र संस्था म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

सध्या नॅशनल इन्शुरन्स कंपनीची देशभरात जवळपास २,००० कार्यालये आहेत. एवढंच नाही तर  नेपाळमध्येही ते काम करते. कंपनीच्या अंतर्गत १५ हजार कर्मचारी इनहाऊस काम करतात, तर ५० हजारांहून अधिक एजंट आहेत. इन्शुरन्सच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी हे ३०० हून अधिक उत्पादनांची सर्व्हिस देते.

अगदी औद्योगिक जोखीम संरक्षणापासून जसे की विमान वाहतूक, आयटी, बँकिंग, दूरसंचार, शिपिंग, ऊर्जा, तेल आणि ऊर्जा, आरोग्यसेवा, फॉरेन ट्रेड, शिक्षण, ऑटोमोबाईल, स्पेस रिसर्च, प्लांटेशन, अॅगोनोमीपासून ग्रामीण भागातील  इन्शुरन्सपर्यंत कंपनी सर्व्हिस देते.

नॅशनल इन्शुरन्स कंपनीची खासियत म्हणजे कंपनीने प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि कस्टमर सर्व्हिस डिलिव्हरी या दोन्ही क्षेत्रात नवनवीन आयडिया आणल्या. त्यातली महत्वाची कल्पना म्हणजे घरोघरी जाणून इन्शुरन्स उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारतात ‘ऑफिस ऑन व्हील्स’ सुरू करणारी NIC ही पहिली कंपनी ठरली. सोबतच भारतातील ‘Bancassurance’ आणि ऑटो टाय-अपमध्ये टॉपची कंपनी बनली.

सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारमध्येही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री फसल विमा योजना यासारख्या सामाजिक योजनांमध्ये सहभागी असणाऱ्या इन्शुरन्स कंपनीमध्येही कंपनी आघाडीची कंपनी म्ह्णून काम करतेय.

आता कितीही जुनी असली तरी कंपनी काळाच्या ओघाबरोबर नेहमीच जाताना पाहायला मिळाली. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे ऑनलाइन ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी डेडिकेटेड डिजिटल मार्केटिंग सेल. सोबतच ग्राहकांना सेल्फ-सर्विस आणि डायरेक्ट अॅक्सेस मध्ये सर्व्हिस देण्यासाठी कस्टमर पोर्टल आणि एजंट पोर्टल सुरु करणं ही देखील कंपनीचीचं आयडिया.

आणि एवढंच नाही कंपनी २४*७ लाईव्ह चॅट सर्व्हिस आणि सोशल कनेक्टिव्हीटी सुद्धा प्रोव्हाइड करते. ज्यामुळे ग्राहकांच्या अडचणी तातडीने सोडवता येतील.

कंपनीच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेक इन्शुरन्स कंपन्या भारतात आल्या, पण एनआयसीचं नाव आजही दिग्गज इन्शुरन्स कंपन्याच्या यादीत घेतलं जात.

हे ही वाचं  भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.