सिनेमात संगीत देतो म्हणून पोरी नकार द्यायच्या, टेलर आहे म्हणून सांगितलं आणि लग्न ठरलं..

‘नौशाद अली’ बॉलीवूडमधले प्रसिद्ध नाव. ज्यांच्या संगीताचे आजही दिवाने आहेत. 25 डिसेंबर 1919 रोजी लखनऊच्या मुंशी वाहीद अली यांच्या घरी नौशाद यांचा जन्म झाला.

शहराची संस्कृती आणि शास्त्रीय संगीताशी जोडल्या गेल्याने नौशाद यांनाही संगीताबद्दल आवड निर्माण झाली. यानंतर त्यांनी उस्ताद गुरबत अली, उस्ताद युसूफ अली, आणि उस्ताद बब्बन यांच्याकडे भारतीय संगीताचे धडे घेतले.

मुंबईच्या कार्टर रोडवरील ‘आशियाना’ बंगल्यात नौशाद अली राहायचे. अत्यंत साधा- सरळ माणूस, ना कोणता देखावा, ना कोणता स्टारडम. मनमोकळ्या स्वभावाचे नौशाद त्यांना कोणती गोष्ट लावायची म्हंटल तरी ते लपवू शकत नव्हते.

एका मुलाखतीत त्यांनी आपल्या लग्नाचा मजेशीर किस्सा सांगितला.

नौशाद मुंबईत रहायचे. एक दिवस त्यांना त्यांची आई वलिदा यांचे पत्र मिळाले. ज्यात नौशाद यांच लग्न फिक्स झाल्याचं सांगितलं होतं. त्यांच्या घरचे जेव्हा स्थळ घेऊन गेले होते. तेव्हा नवरीकडच्यांनी विचारलं की, मुलगा काय करतो. नौशादच्या आई – वडिलांनी त्यावेळी सांगितल की, मुलगा मुंबईत टेलर आहे. आणि तिथं त्याच खूप चांगल काम आहे.

नौशादच्या आईने ताकीद दिली की, आता तू तिथं जा आणि तुला विचाारल तर तेच सांग.

हा किस्सा हसून सांगताना नौशाद म्हणाले, ‘बघा, मला या बायकोच्या प्रेमापोटी किती पापड लाटायला लागले.’

त्या काळात एका संगीतकारापेक्षा जास्त किंमत एका टेलरची असायची. त्यांच्या लग्नाच्या वेळी सुद्धा त्यांचा रतन चित्रपट रिलीज झाला होता, त्याचे गाणे चांगलेच हिट झाले होते. जेव्हा नौशाद यांची वरात सुरू होती.

तेव्हा बँड वाल्यांनी त्याच चित्रपटातलं एक गाणं ‘अंखियां मिलाके, जिया भरमा के, चले नहीं जाना’ वाजवत होते. पण दुसरीकडे माझे वडील आणि माझे सासरे त्या गाण्याला नाव ठेवत होते की, किती बकवास गाणं बनवलयं.

नौशाद अली यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. हा मूकपटांचा काळ होता. चित्रपटात संगीतच काय कोणताच आवाज नसायचा. अशावेळी थिएटरमध्ये लोकांना सिनेमाचा फील येण्यासाठी तबला, हार्मोनियम, सितार आणि व्हायोलिन वादक पडद्याजवळ बसलेले असायचे. व्हायचे असे की, त्यांनी सिनेमा आधीच पाहिलेला असायचा, आणि कुठं काय वाजवायचंय हे ठरलेलं असायचं. जेव्हा प्रेक्षक चित्रपट पहायला यायचे, तेव्हा हे वादक चित्रपटाला आणखी ताजं कारायचे.

नौशाद अली अशाच एका टीमचा हिस्सा होते आणि खेळाखेळातचं शिकले होते की बॅकग्राऊंड म्यूजिकचं महत्त्व काय आहे.

दरम्यान, नौशाद यांच्या वडिलांना त्यांचं हे म्यूजिकयं वेड पटतं नव्हतं. जेव्हा वडिलांचा हा कठोरपणा सहनशीलतेच्या बाहेर पडला तेव्हा नौशादने लखनऊला रामराम करत मुंबई गाठली होती.

‘रतन’च्या यशानंतर नौशाद यांनी एका चित्रपटासाठी 25 हजार रुपये घेण्यास सुरवात केली. त्यांनी जास्त चित्रपट केले नाहीत. त्यांच्या वाट्याला फक्त 67-68 चित्रपट असतील ज्यात त्यांनी संगीत दिले, पण यशची कहाणी अशी आहे की त्यापैकी 35 चित्रपट सिल्वर-जुबली (25 आठवडे), 12 गोल्डन-जुबली(50 आठवडे) आणि 3 डायमंड-ज्युबिली (60 आठवडे) चालली होती.

त्यांनी फिल्मी संगीताला सुरैया, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफीसारखे आवाज दिले. अशी गाणी दिली ज्यांच्याशिवाय संगीतवर चर्चा होऊ शकत नाही. ज्यात नन्हा मुन्ना राही हूं’, ‘ओ दुनिया के रखवाले’, ‘बचपन के दिन भुला न देना’, ;मुहब्बत की झूठी कहानी पे रोये’चा सामावेश आहे.

जब प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याचा एक किस्सा नौशाद सांगतात.

आसिफ ‘मुगल-ए-आज़म’ बनवत होते. आणि त्याचवेळी फिल्मिस्तान स्टूडियोवाले तीच स्टोरी ‘अनारकली’ नावाने बनवत होते. त्यामुळे नौशादने विनंती आसिफ सरांना विनंती केली की, मुगल-ए-आजम आणि अनारकली हे एकाच कथेवर आधारित दोन चित्रपट आहेत आणि नौशाद यांच्यामते फिल्मीस्तान बनवत असलेला अनारकली चित्रपट आधी रिलीज केले होईल. त्यामुळे आसिफ यांनी विषय बदलावा. नाहीतर उगाच स्पर्धा वाढेल.

यावर आसिफ साहब म्हणाले की, विषय तसाच राहील आणि नौशाद तुम्हाला याचे संगीत बनवायचेय. यावर नौशाद म्हणाले, ठीक आहे करूयात.

आणि असेच झाले की, आम्ही कामच करत होतो आणि अनारकली रिलीज झाला. त्या चित्रपटाचे एक गाणेही खूप गाजले, ‘मोहब्बत में ऐसे कदम डगमगाए, जमाना ये समझा कि हम पी के आए”. तेव्हा नौशाद यांनी आसिफला सांगितले की, या गाण्याची सिच्युएशन दोन्ही ठिकाणी एकसारखी आहे. त्यामुळे आपण एकतर सिच्युएशन बदलायला हवी किंवा गाण्याची आयडिया बदला.

तेव्हा आसिफ साहेब पुन्हा म्हणाले, सिच्युएशन तशीच राहील, आणि आयडिया तशीच राहील. अकबर बसलेला आहे, सलीमसुद्धा बसला आहे आणि सेम रक्कासा येईल. जिचे नाव जिचे अनारकली आहे आणि ती आयटम पेश करेल. यात वापर नौशादचा होता.

कारण आसिफ चित्रपटाचा असा सेट लावत होते, जो आजपर्यंत कोणीच पाहीला नसेल. जिथं ‘जब प्यार किया तो डरना क्या’ गाणं रेकॉर्ड झालं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.