कौतुक सोहळ्याला आठवडा उलटला नाही, तोच सिद्धूंनी केजरीवालांवर तोफ डागलीये

नेतेमंडळी, राजकारण आणि आरोप-प्रत्यारोप यांचा जुना इतिहास आहे. त्यात निवडणूका आल्या की, सोशल मीडिया, माध्यमांमध्ये नेते मंडळी तूम्ही काय केलं नि आम्ही काय केलं याशिवाय दुसरं काही बोलतही नाही.

पण पंजाबच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी जरा वेगळ चित्र पाहायला मिळालं होतं. म्हणजे केजरीवालांनी सिद्धूंना गुलाब देण्याचा प्रयत्न केला, पण त्याबदल्यात त्यांच्या हातात काटेचं मिळाले. तुमचा गोंधळ उडतोय  ना तर जरा सोप्या भाषेत सांगते.

तर  झालं असं की,  येत्या काही महिन्यांमध्ये पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे  हरएक पक्ष जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन आखतोत. पण या निवडणुकीच्याा ऐन तोंडावर पंजाब काँग्रेसमध्येचं ताळमेळ नाहीये. आधी कॅप्टन अमरिंदरसिंग vs नवज्योत सिंग सिद्धू आणि आता मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्ना vs  नवज्योत सिंग सिद्धू असा वाद सुरू आहे. 

नवज्योत सिद्धू यांनी आधी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह  उपस्थित करत त्यांना पदावरून बाहेर काढलं. आणि आता आपल्याच नवीन मुख्यमंत्र्यांच्या खोट्या आश्वसनाचे वाभाडे काढतायेत.

 म्हणजे झालं असं कि, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी यांनी आपल्या कार्यकाळातील कारभाराचा आराखडा वाचून दाखवला. पण नवज्योत सिंग सिद्धू यांनी हे सगळं खोटं असल्याचं म्हंटल. 

आता यावरून असं म्हंटल जात होत कि, काँग्रेसची पक्षांतर्गत भांडण अजूनही सुरु आहेत. आणि याचाच फायदा घेतला अरविंद केजरीवारील यांनी.  दिल्लीनंतर पंजाबमध्ये आपचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी २३ नोव्हेंबर रोजी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे खुलेआम कौतुक केले. आणि सोबतच असेही म्हंटले कि, काँग्रेस सरकार सिद्धू यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. 

अरविंद केजरीवाल म्हणाले की, सिद्धू लोकांचे प्रश्न मांडत आहेत, पण आधी कॅप्टन आणि आता चन्नी ते दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आता केजरीवाल यांना वाटलं कि, सिद्धू यांचे कौतुक केल्यामुळं ते आपल्या पक्षात येतील किंवा त्यांच्या मदतीने पंजाब काँग्रेसचा वाद चव्हाट्यावर आणता येईल. पण झालं काही भलतंच. 

या कौतुक सोहळ्याच्या सहा दिवसांनंतरचं म्हणजे २९ नोव्हेंबरला सिद्धू यांनी केजरीवालां रिटर्न गिफ्ट दिल ते त्यांच्यावर हल्लबोल करत. 

पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सिद्धू यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवडणूक आश्वासनांवर टीका केली आणि म्हंटलं की,  

शीशे के घरों में रहने वालों को दूसरों पर पत्थर नहीं फेंकना चाहिए.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत सिद्धू यांनी मंत्रिमंडळात एकही महिला सदस्य नसल्यावरून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला.

“ज्यांची घरं काचेची असतात त्यांनी इतरांवर दगडफेक करू नये.  अरविंद केजरीवाल तुम्ही महिला सक्षमीकरण, नोकऱ्या आणि शिक्षकांबद्दल बोलता, पण तुमच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही.  दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी सोडलेला अतिरिक्त महसूल असूनही दिल्लीतील किती महिलांना १००० रुपये मिळतात!!”  

नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले की, महिला सक्षमीकरण म्हणजे निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांचा समावेश करणे, जसे काँग्रेस पंजाबमध्ये करत आहे.  खरे नेतृत्व १००० रुपयांचे लॉलीपॉप देण्यामध्ये नाही, तर स्वयंरोजगार आणि महिला उद्योजकांना कौशल्य प्रदान करून भविष्यात गुंतवणूक कारण हे खरं पंजाब मॉडेल आहे”

एवढंच नाही तर शिक्षकांच्या मुद्द्यावर नवज्योत सिद्धू यांनी केजरीवाल सरकार गेस्ट लेक्चरर्सच्या नियुक्तीने रिक्त पदे भरत असल्याचा आरोप केला.

“शिक्षक आणि नोकऱ्यांवर, २०१५ मध्ये दिल्लीत १२५१५ शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या, आणि २०२१ मध्ये दिल्लीत अशा १९९०७ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत… आणि तुम्ही बहुतेक रिक्त पदावर फक्त गेस्ट लेक्चरर्स  भरत आहात”

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पंजाब निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या आश्वासनाच्या यादीत महिलांसाठी १,००० रुपये दरमहा देत, हंगामी शिक्षकांना नियमित करण्याचे आश्वासन दिले. 

यावर सिद्धू यांनी केजरीवालांच्या दिल्ली कारभारावर बोट ठेवले. त्यांनी म्हंटले कि, 

पक्षाने २०१५ मध्ये ज्या आठ लाख नोकऱ्या आणि २० नवीन महाविद्यालये देण्याचे आश्वासन दिले होते ते कुठे आहेत. गेल्या पाच वर्षांत दिल्लीतील बेरोजगारीचा दर जवळपास पाच पटीने वाढला आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.