नवज्योतसिंग सिद्धूच्या वडिलांनी देखील एकेकाळी पंजाब काँग्रेस गाजवली होती

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची तुरुंगातून तब्बल १० महिन्यांनंतर सुटका होणार आहे. सिद्धू यांच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. १९८८ सालच्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. शिक्षेदरम्यान सिद्धूने एकही दिवस सुट्टी घेतली नाही म्हणून ४८ दिवस आधीच त्यांचा तुरुंगवास संपणार आहे. सिद्धू यांच्या पत्नीला स्टेज २ कर्करोगाचे निदान झाले आहे, त्यात त्यांची लवकर सुटका होणं महत्वाचं मानलं जात आहे. 

सिद्धू यांच्या सुटकेमुळे पंजाब काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरु आहेत. बाहेर आल्यानंतर सिद्धूंचा प्रवास सोपा नसेल. बाहेर येताच सुमारे १ वर्षातच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु होईल त्यात पंजाबच्या राजकारणात मोठे महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच मागच्या राजकीय राड्यात काँग्रेसने आपले मजबूत नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन सिद्धू यांना पाठिंबा दिला होता.

कॉंग्रेसमध्ये काम करणारे नवज्योत सिंग सिद्धू हे त्यांच्या घरातील पहिले व्यक्ती नाहीत. त्यांचे वडील हे सुद्धा कॉंग्रेस मध्ये होते. आणि स्वातंत्र्य लढयात त्यांचे योगदान होते.

सरदार भगवंतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू यांचे वडील सरदार भगवंतसिंग सिद्धू हे एका मोठ्या राजघराण्याचे वारसदार होते. त्यांच कायद्याचं उच्च शिक्षण झालं होतं. घरची परिस्थिती उत्तम होती. नोकरी व्यवसाय सुरु करायची संधी होती. पण तो काळ महात्मा गांधींनी सुरु केलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा होता.

स्वातंत्र्याच्या या महायज्ञात इतर तरुणांप्रमाणे सरदार भगवंतसिंग सिद्धू यांनी देखील उडी घेतली. या कार्यासाठी त्यांनी आपले राजघराणे सोडले आणि कॉंग्रेसचा सामान्य  कार्यकर्ता म्हणून स्वातंत्र्य लढयात सामील झाले होते. काही काळ त्यांना कारागृहात सुद्धा जावे लागले होते.

त्यांच्या देशभक्तीच्या कामामुळे किंग एमनेस्टी कडून दिलासा मिळाला होता. नंतर ते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार आणि पंजाबचे महाधिवक्ता झाले होते.

सरदार भगतसिंग सिद्धू यांना उर्दू, पर्शियन, अरबी, संस्कृत, इंग्रजी आणि पंजाबी भाषाचे ज्ञान होते. त्यांना संस्कृत भाषेची चांगली जाण होती. नवज्योतसिंग सिद्धूची आई सुद्धा राजकारणात होती.

स्वातंत्र्य लढ्या दरम्यान सरदार भगवंतसिंग सिद्धू आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट झाली होती.

सिद्धू यांच्यावर लहानपणा पासून वाचनाचे संस्कार व्हावे म्हणून वृत्तपत्र वाचायची सवय वडील सरदार भगतसिंग यांनी लावली होती. ते सिद्धू यांच्याकडून हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि पंजाबी पेपर वाचून घेत. सिद्धू ने दररोज वृत्तपत्र वाचावे यासाठी ते खूप आग्रही होते.

तसेच शाळेतून परत आल्यावर अभ्यास घेत होते. तर संध्याकाळी दूरदर्शनवरील हिंदी, इंग्रजी बातम्या पाहावे यासाठी आग्रही असायचे. त्यामुळे नवज्योत सिंग यांना हिंदी आणि इंग्लिश चांगले चांगली पकड घेता आली.

नवज्योत सिंग सिद्धू यांना क्रिकेटर म्हणून घडविण्यात वडील सरदार भगवंतसिंग यांचा मोठा वाटा आहे.

नवज्योत सिंग सिद्धू हे क्रिकेटर म्हणून जर यशस्वी झाले. त्याच मुख्य कारण हे त्यांचे वडील सरदार भगवंतसिंग असल्याचे सांगण्यात येते. भगतसिंह यांना क्रिकेटर बनायचे होते. कॉलेज मध्ये असतांना ते थोडेफार क्रिकेट खेळले होते. मात्र त्यांना पुढे जास्त खेळता आले नाही.

त्यामुळे मुलगा नवज्योत सिंग याने मोठा क्रिकेटर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले. ते आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून नवज्योत सिंगचा  खेळ बघण्यासाठी मैदानावर जायचे. वडिलांची इच्छा होती म्हणून नवज्योत सिंग सिद्धू क्रिकेट खेळले आणि पुढे जाऊन मोठे खेळाडू झाले.

पंजाब कॉंग्रेसचा अध्यक्ष केल्या नंतर नवज्योत सिंग सिद्धूने ट्वीट करून आपले कॉंग्रेस सोबतचे संबंध किती जुने आहे सांगीतले होते. ट्वीट करत सिद्धूने त्यांचे वडील सरदार भगवंत सिंह आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू शेअर यांचा फोटो शेअर केला होता. आता तुरुंगातून बाहेर येऊन सिद्धू पुन्हा आपली राजकीय इनिंग खेळणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.