समीर वानखेडेंवर अचानक पर्सनल अटॅक होतोय, पण वानखेडे काही लपवू पाहत आहेत का ?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा फोटो ट्वीट करत, सोबत ‘पैहचान कौन?’ कॅप्शन देत सोशल मिडियावर खळबळ उडवून दिली आहे. तर त्यांनी पोस्ट केलेला फोटो हा समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील वानखेडेंच्या एकट्याचा फोटो आहे.

नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाविषयी फोटो आणि कागदपत्रे ट्वीट केल्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर एकच चर्चा चालू झाली आहे. ती म्हणजे नेमकं समीर वानखेडे काय लपवत आहेत ?

त्यानंतर समीर वानखेडे यांनी प्रेस नोट जारी करत मलिक यांच्या कृतीवर टीका करत आहेत कि,  नवाब मलिक माझ्या कुटुंबाची खाजगी माहिती सोशल मीडियावर व्हायरल करत असून आमची बदनामी होत आहे. माझे वडील स्टेट एक्साईज विभागात सिनिअर पीआय होते. ते २००७ मध्ये निवृत्त  झाले. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हिंदू आहेत तर आई जहिदा मुस्लिम होती. आमचे धर्मनिरपेक्ष कुटुंब असून मला त्याचा अभिमान आहे. मी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी २००६ मध्ये लग्न केलं आणि २०१६ मध्ये आमचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला. त्यानंतर २०१७ मध्ये मी क्रांती दीनानाथ रेडकर यांच्याशी लग्न केलं” अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.

 “Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा” असं ट्वीट करत काही कागदपत्रंही मलिक यांनी शेअर केली आहेत.

त्यांनी असा आरोप केला आहे कि, मलिक हे आमच्या कुटुंबाची आणि माझ्याबद्दलची वैयक्तिक माहिती सोशल मिडीयावर प्रकाशित करून, माझ्या खाजगी माहितीच्या गोपनीयतेचा भंग करत आहेत. माझ्या नावासमोर वेगवेगळी नावे लावून माझी, माझ्या कुटुंबाची, वडील आणि आईची प्रतिमा मलीन करत आहेत. नवाब मलिक यांचं कृत्य माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास देणारं ठरतंय, असंही वानखेडेंनी माध्यमांना सांगितले आहे.

त्यानंतर मलिक यांनी आणखी एक ट्विट केलं आहे,

त्यांनी ट्विट मध्ये, महापालिकेच्या साबंधीतला एक कागद पोस्ट केला आहे. तो कागद नेमका कशा संबंधातला आहे हे स्पष्टपणे दिसत नाही. पण हा कागद पोस्ट करत मलिक यांनी त्यावर समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा इथूनच सुरू झाला, असं म्हटलं आहे.

मलिक यांनी पोस्ट केलेलं सर्टिफिकेट हे विवाह नोंदणीचं सर्टिफिकेट असावं आणि वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचं हे सर्टिफिकेट असावं असं सांगितलं जातं. मात्र, हे सर्टिफिकेट नेमकं कसलं आहे याची माहिती अजून स्पष्ट झाली नाही.

हे प्रकरण चालू झालं जसं पाहत आलोय कि,  मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्यावर वारंवार आरोप करत आलेत.

त्यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे. ते ससातत्त्तायाने आरोप करत आलेत कि, त्याने एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असतात. पण आत्ता चालू असलेला प्रकार आह थेट वानखेडे यांच्या जात आणि धर्माशी संबंधित आहे. वानखेडे यांनी जात आणि धर्माचे सत्य लपवल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

अनेक प्रश्न समोर येत आहेत ….

नवाब मलिक यांनी शेअर केलेला जन्मदाखला आहे तो खरा आहे कारण तो मुंबई महानगपालिका इथून मिळवला आहे असं मलिक याचं म्हणणे आहे. जर हा जन्म दाखला खरा असेल तर मग समीर वानखेडे हे खरंच समीर दाउद वानखेडे आहेत का ? असेही प्रश्न सोशल मिडीयावर उपस्थित केले जात आहेत.

वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप देखील त्यांच्यावर होत आहे. यामध्ये वडिलांचे नाव ‘दाऊद के. वानखेडे’ असे लिहिले आहे. ज्यामध्ये धर्माच्या जागी ‘मुस्लिम’ असे लिहिले आहे.

पण यावर समीर वानखेडे यांनी, आपल्याबाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात असून, आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि माझी माहिती तपासा. आपला जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे. तसेच, आपल्या विरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. याला आपण कायदेशीर उत्तर देऊ. याबाबत आपण लवकरच जाहीर खुलासा करणार असल्याचं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.

आता या सगळ्या गोंधळावर आणखी काय घडामोडींचा भर पडणार याचे अपडेट्स लवकरच कळतील.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.