खरंच वानखेडे फॅमिली वसुलीसाठी दुबई मालदीवला गेले होते का ?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांची ही चर्चा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अश्या दोन्ही प्रकारची आहे.
आता पॉझिटिव्ह म्हणाल तर बॉलिवूडमधलं ड्रग कनेक्शन समोर आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. म्हणजे सुशांतसिंह राजपूत आत्महत्या वेळीही ड्रग प्रकरणात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नाव समोर आली होती. त्यावेळी समीर वानखेडे माध्यमांच्या हेडलाईनमध्ये झळकत होते.
आणि आत्ताही काही दिवसांपूर्वी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकला आणि ड्रग्ज जप्त केली. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यासोबतच आणि ८ जणांना ताब्यात घेतलं गेलयं. आणि या कारवाईचं श्रेय समीर वानखेडे यांना दिलं गेलं.
यासोबतचं आणखी बरीचशी प्रकरण आहेत, ज्यात समीर वानखेडे यांची मुख्य भूमिका होती. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना एनसीबीचा ‘सिंघम’ असं म्हंटल जाऊ लागलं.
आता यादरम्यान समीर वानखेडे यांना निगेटिव्ह चर्चेला देखील समोर जावं लागतोय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक सतत समीर वानखेडे यांना सतत धारेवर धरत आहेत. आताही नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्याबाबत धक्कादायक माहिती दिली.
काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सोशल मीडियावर वानखेडे यांच्या कुटुंबीयांचे दुबई आणि मालदीवमधले फोटो शेअर केलेत. हे फोटो शेअर करत त्यांनी वानखेडे यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप लावलेत.
मलिक त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर जास्मिन वानखेडे यांचे मालदीव आणि दुबईतील फोटो शेअर करत म्हंटले कि, “Here are the proofs!” आणि याचं फोटोंचा संदर्भ देत मलिक यांनी वसुलीचे आरोप केले आहेत.
उगाही का धंधा मालदीव में! pic.twitter.com/ECzlOI70vG
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 21, 2021
नवाब मलिक बोलताना म्हणाले कि, “एनसीबीच्या माध्यमातून सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर एका विशेष अधिकाऱ्याला या डिपार्टमेंटमध्ये आणलं गेलं. आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली. आता ही आत्महत्या होती कि हत्या हे कोडं अजून तरी सुटलेलं नाही.पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये एनसीबीचा सगळा खेळ सुरु झाला.”
रिया चक्रवर्तीला फसवण्यात आलं, डझनभर फिल्म अभिनेता- अभिनेत्रीची परेड करण्यात आली. काहींना या प्रकारांत अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे दहशत निर्माण करण्याचं काम करण्यात आल्याचे आरोप मलिक यांनी केले
नवाब मलिक पुढे म्हणाले कि,
‘एवढंच नाही कोरोना महामारीच्या काळात सगळी फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये एन्जॉय करत होती. त्यावेळी एनसीबी अधिकाऱ्याच्या कुटुंबातील काही लोक सुद्धा तिथं होती. त्यामुळे अधिकारी समीर वानखेडे हे स्वत: दुबई किंवा मालदीवमध्ये होते का? आणि होते तर ते किंवा त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये काय करत होते, याचा खुलासा समीर वानखेडे यांनी करावा. मला तर पूर्ण विश्वास आहे कि, सगळी वसुली मालदीव आणि दुबईत झालीये.
तसं पाहिलं तर नवाब मलिक यांनी शेअर केलेले फोटो जॅस्मिन वानखेडे यांचे आहेत. जॅस्मिन समीर वानखेडे यांची बहीण आहे. नवाब मलिक त्यांना लेडी डॉन म्हणतात. यास्मिन पेशेन वकील आहेत. त्या मनसेच्या चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षा असून मनसेचं कायदेशीर काम सुद्धा पाहतात. सोबतच पॉस्को संबंधित प्रकरणही हाताळतात.
आता ही काही पहिली वेळ नाही, याआधीही आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि एनसीबीची ही कारवाई बोगस असल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर नवाब मलिक यांचं समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचं सत्र सुरूच आहे.
या आरोपामुळे सगळीकडे चर्चा सुरु झालीय कि समीर वानखेडे खरच वसुलीसाठी दुबईला गेले होते का? नवाब मलिक यांनी जे फोटो दिले आहेत ते जास्मिन वानखेडे यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून घेतले आहेत. पण समीर वानखेडे त्यांच्या सोबत दुबई, मालदीव येथे होते का ते स्पष्ट होत नाही. नवाब मलिक यांनी हे मोठे आरोप करून खळबळ उडवली आहे. आता या प्रकरणाला कोणते वळण लागेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.
हे ही वाचं भिडू :
- बापूंच्या नावाने मिळालेला पुरस्कार समीर वानखेडे यांना देखील अभिमानास्पद वाटतो..
- नवाब मलिकांच्या आरोपामुळे NCB प्रकरणात नवा ट्वीस्ट, हे फ्लेचर पटेल कोण आहेत ?
- NCB च्या सिंघमची रेव्ह पार्टीवर धडाकेबाज कारवाई. शाहरुखचा मुलगा देखील अडकला ?