नवाजच्या गरिबीबद्दल बरच काही ऐकून असाल पण तो एका जमीनदाराचा मुलगा होता…

बाप का दादा का भाई का सबका बदला लेगा रे तेरा फैजल…..

मौत को छू के टक से वापस आ सकता हूं……

जब तक तोडेंगे नही तब तक छोडेंगे नही…

हे सगळे डायलॉग तुम्ही सेम नवाजच्या आवाजत वाचले असतील. तर नवाजुद्दीन सिद्दीकी हा असा हिरो आहे ज्याने सर्वसामान्य लोकांमध्ये विश्वास जागवला कि हिरो कुणीही होऊ शकतो. अगदी कितीही संघर्ष करावा तरी मागे न हटण्याची नवाजुद्दीनची प्रवृत्ती आज आपल्याला पाहायला मिळतेय. तर जाणून घेऊया नवाज बद्दल.

बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख आणि स्टारडम तयार करणारा नवाजुद्दीन सिद्दीकीचा स्ट्रगल आज तो आपल्याला सांगताना दिसतो, एक वेगळी वाट निवडून नवाजने हा स्ट्रगल निवडला आणि त्यात यशस्वी होऊन दाखवलं. एकूणच १२ वर्षे बॉलिवूडमध्ये छोटेमोठे रोल करणारा नवाजुद्दीन सिद्दीकी हा मुळात श्रीमंत घराण्यातून आलेला होता. 

नवाजला एकूण ९ भावंडं. उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातल्या एका छोट्याश्या गावात बुढानामध्ये नवाजुद्दीनच बालपण गेलं. नवाजचं शाळकरी शिक्षण गावातच पूर्ण झालं. बरेच लोक असं समजतात कि नवाज एका गरीब घरातून आला पण तस नाहीए तर नवाज एका श्रीमंत जमीनदार शेतकऱ्याच्या घरातून येतो. लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर नवाजने त्याच्या शेतातला एक व्हिडिओ व्हायरल केला होता.

पण करियर बनवण्याचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा नवाजने असे असे दिवस पाहिले जे कधी त्याने स्वप्नातसुद्धा बघितले नसतील. आपल्या करियर बनवण्याच्या काळात नावाजने घरच्यांकडून पैसे न घेणं पसंत केलं आणि स्वतःच्या कामावर पैसे मिळवण्याचं ध्येय बाळगलं. स्ट्रगलच्या दिवसांनी नवाजला भरपूर स्ट्रॉंग बनवलं.

नवाज सुरवातीपासूनच वेगळं काहीतरी करण्याच्या बेतात होता. गावातून बाहेर पडून काहीतरी स्वतःच निर्माण करण्याच्या विचारात तो होता. गावात असलेला शिक्षणाचा माहोल हा त्याला पटणारा नव्हता. नवाजुद्दीन म्हणतो कि गावात तुम्ही कुणालाही विचारा तिथल्या लोकांना फक्त तीनच गोष्टी माहिती होत्या त्या म्हणजे गहू, ऊस आणि बंदुका…

गावातून बाहेर पडून नवाजुद्दीन हरिद्वारला गेला. तिथं जाऊन गुरुकुल कांग्री विश्वविद्यालय मध्ये नवाजने केमिस्ट्रीमध्ये बीएस्सीची डिग्री मिळवली. यानंतर तो वडोदऱ्यात जाऊन एका केमिस्टच्या हाताखाली काम करू लागला. या कामात नवाजुद्दीनच मन लागत नव्हतं पण परिस्थितीमुळं त्याला हे काम करणं भाग होतं. हे काम करत असतानाच नवाजचा एक मित्र त्याला एकदा गुजराती नाटक दाखवायला घेऊन गेला.

नवाजुद्दीन पहिल्यांदाच असं काहीतरी भव्य दिव्य बघत होता. याआधी नवाजने गावामध्ये रंगा खुश, बिंदिया और बंदूक अश्या बी ग्रेड, सी ग्रेड फिल्म्स बघितल्या होत्या. पण नाटक बघितल्यावर नवाजचा दृष्टिकोन बदलला. आणि आपणही हे करायला पाहिजे, हे काम आपल्याला जमेल असा आत्मविश्वास त्याच्यामध्ये चाळवला गेला. आपल्या मित्राला नवाजने हि आयडिया सांगितली तेव्हा नवाजला त्याने समजावलं कि नाटक, अभिनय शिकायचा असेल तर दिल्लीला एनएसडीमध्ये प्रवेश मिळवावा लागतो. 

नवाजुद्दीन नोकरी सोडून दिल्लीत गेला आणि तिथं त्याने अजून काही नाटकं बघितली. एनएसडीला प्रवेश घेण्याअगोदर नाटकांचा अनुभव म्हणून साक्षी थेटर ग्रुप जॉईन केला. हा तोच ग्रुप होता ज्यात मनोज वाजपेयी आणि सौरभ शुक्ला नवाजच्यासोबत होते. पुढे नवाजला बराच स्ट्रगल करावा लागला. वॉचमनपासून पासून ते भाजी विकणे असे बरेच काम नवाजने केली.

पण १२ वर्षाच्या संघर्ष करण्याचं फळ नवाजला जेव्हा पूर्ण हिरोचा रोल मिळाला. गँग्ज ऑफ वासेपूर या सिनेमाने नवाजकडे बघण्याचे लोकांचे दृष्टिकोन बदलून टाकले. शूल, सरफरोश, मुन्नाभाई अशा अनेक सिनेमांमध्ये अगदीच छोटे रोल नवाजला मिळाले होते. पण नंतर वासेपूरच्या यशानंतर सॅक्रेड गेम्स, बाबूमोशाय बंदूकबाज, किक, तलाश, रईस अशा अनेक सिनेमांमधून नवाजने आपली जादू दाखवून दिली.

जमीनदार शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या नवाजने आपली वेगळी वाट धरली आणि १२ वर्षे स्ट्रगलकरून आपलं नाव जगभरात पोहोचवलं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.