बंगालच्या शाळांमध्ये समलैंगिकते बद्दल फिल्म दाखवल्या जाणार म्हणून दंगा सुरु झाला आहे.

गेल्या कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर देखील समलैंगिक समुदायाला भारताच्या समाजात अजूनही मान्यता नाही मिळत. कायद्याने जरी यांना मान्यता मिळाली असली तरीही ते सामाजिक पातळीवर समानता आणि सर्वसमावेशकता मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे.

जागतिक स्तरावरचं बोलायला गेलं तर बहुंताश देशात विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये या LGBTQ  मोहिमेने चळवळीचे रूप धारण केले होते, तर भारतातही गेल्या काही काळात एलजीबीटीक्यू समुदायाबाबत अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. याबाबत जाणीव जागृती 

त्यात अलीकडेच एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे, पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये समलैंगिक नात्यावर आधारित असणाऱ्या ८ शॉर्ट फिल्म जागरूकता म्हणून दाखवण्यात येणार असल्याचे प्रकरण समोर आले आणि सगळीकडेच खळबळ उडाली आहे.

 या बातमीला ट्वीट करत पत्रकार स्वाती गोयल यांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांना या प्रकरणाची दखल घ्यायला लावलं आणि बाल हक्क संरक्षण आयोगाए दखल घेतली आहे.

याची दखल घेत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी (UNICEF) यांना नोटीस बजावली आहे. CBFC चे अध्यक्ष प्रसून जोशी यांना विचारणा केली आहे की NCPCR ला तक्रार मिळाली आहे की,

“पश्चिम बंगालमध्ये शाळा उघडल्यानंतर समलैंगिक संबंधांवरील ८ शॉर्ट फिल्म दाखवल्या जातील. या  निवडलेल्या शॉर्ट फिल्म्सला राज्यात होणाऱ्या प्रदर्शनासाठीचे प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही याबद्दल CBFC ने कृपया १० दिवसांच्या आत तुमचं यावरचं उत्तर अपेक्षित आहे. तसेच या निवडलेल्या चित्रपटांना कोणत्या श्रेणीत प्रमाणपत्र देण्यात आले आहे,” याबाबत देखील NCPCR ने विचारणा केली आहे. 

नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घ्या..

शाळेतल्या विध्यार्थ्यांना समलैंगिक संबंधांच्या बाबतीत मोकळेपणाने बोलावं म्हणून, मनातले समज-गैरसमज दूर व्हावेत म्हणून ‘प्रयासम्स बॅड’ आणि ‘ब्युटीफुल वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल’ने निवडलेल्या समलैंगिक संबंधांवर आधारित असणाऱ्या  ८ शॉर्ट फिल्म पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये दाखवल्या जाणार आहेत.  

कोरोनाच्या संकटानंतर आता राज्यातील सगळे शाळा, कॉलेज हळूहळू सुरू होत आहेत. याकाळात काही  ‘चित्रपट दिग्दर्शकांनी’ बनवलेले हे लघुपट विद्यार्थ्यांना दाखवले जाणार आहेत. 

प्रयासम हि संस्था UNICEF शी संबंधित असणारी संस्था आहे.

थोडक्यात हि संस्था पौगंडावस्थेतील तसेच किशोरवयीन मुलामुलींना आत्मविश्वासाने जगण्याची जाणीव व्हावी या उद्देशाने काम करत असते. 

प्रयासम संस्थाद्वारे ज्या लोकांनी या ८ शॉर्ट फिल्म बनवल्या आहेत. त्या टीम मध्ये सलीम शेख, मनीष चौधरी, सप्तर्षी रॉय आणि अविजित मर्जीत. हे सर्वजण नजरलपल्ली येथील महिषाबठाण येथील डाकिंदरी येथे राहतात. हा परिसर राजधानी कोलकातामध्येच आहे. हे सर्व प्रयासम व्हिज्युअल बेसिक्स एशियाच्या बेसिक फिल्म स्टुडिओचे विद्यार्थी आहेत, ज्याला Adobe नावाच्या कंपनीचा पाठिंबा आहे.

या शॉर्ट फिल्म मुलांना दाखवून ‘सर्वसमावेशक शिक्षणा’ला तसेच लिंगभाव विषय शिकण्यास आणि समजण्यास प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. LGBTQ तरुणांना समाजापासून वेगळे किंवा अवांछित वाटू नये म्हणून हा शॉर्ट फिल्म दाखवण्याचा खटाटोप आहे असं त्यांनी सांगितलंय. 

‘प्रयासम्’चे दिग्दर्शक प्रशांत रॉय यांनी सांगितले की, शाळा उघडताच या लघुपट मुलांना दाखवले जातील. मात्र या शॉर्ट फिल्मवरून बंगालमधील काही लोकांचा विरोध आहे. पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये चित्रपट प्रदर्शित: पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये समलैंगिक चित्रपट दाखविण्याच्या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.