आजही लग्नात दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांची आयडिया, जर्मनीतल्या खुर्च्यां बघून सुचलिये

आपल्या भारतात खुर्ची या प्रकाराला लय जबरदस्त महत्त्व आहे. म्हणजे राजकारणी नेत्यांच्या खुर्च्या आहेतच, पण लग्नात कुठल्या पाव्हण्याला कुठली खुर्ची दिली, घरात आलेल्याला कुठली खुर्ची दिली किंवा राजकीय नेत्यासाठी खुर्ची उचलून आणली किंवा नाही… असे लय विषय असतात ज्यात खुर्ची एकदम सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतं.

या खुर्चीच्या आता खुंखारमध्ये व्हरायटी आल्या आहेत. म्हणजे कसं असं रेलल्या रेलल्या आरामशीर वाटतंय अशी खुर्ची, ऑफिसमधली गोल फिरणारी खुर्ची, आजोबांची हलणारी आरामखुर्ची आणि खुर्च्यांचं नवं स्वरुप म्हणून आलेल्या बिनबॅग्स असे कित्येक प्रकार आता आपल्या वापरात आहेत.

आता प्रत्येकाची खुर्च्यांशी रिलेटेड एक आठवण फिक्स असणार, ती म्हणजे लग्नातल्या खुर्च्या. ओळीनं मांडून ठेवलेल्या या खुर्च्यांच्याभोवती फिरायचं किंवा एकावर एक खुर्च्या ठेऊन त्याच्यावर बसायचं, हे असले उद्योग आपण लहानपाणी फिक्स केलेत. या प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर एक नाव आपल्याला शंभर टक्के सापडतं ते म्हणजे नीलकमल.

आता हा आहे खुर्च्यांचा ब्रँड आणि ही त्या ब्रँडच्या उभं राहण्याची गोष्ट…

या ब्रँडची आयडिया आली दोन भावांच्या डोक्यातून. त्यांचं नाव वामनराय पारेख आणि शरद पारेख. पारेखांच्या घरातच बिझनेस होता, पण तो होता बटणं बनवण्याचा. या दोघा भिडूंना वाटलं की आपण जरा मोठी झेप घ्यावी. म्हणून त्यांनी पर्याय निवडला, प्लॅस्टिकचं सामान बनवण्याचा. सुरुवात केली ती मग, बास्केट, बादल्या बनवण्यापासून.

एक दिवशी एका डेअरीपासून जाताना त्यांना दुधाचे क्रेट दिसले. त्यामुळं त्यांना आयडिया सुचली की या प्रॉडक्टमध्ये पैसा आहे आणि आपण कमी पैशात आणखी चांगलं प्रॉडक्ट देऊ शकतो. त्यामुळं त्यांनी दुधाचे क्रेट्स बनवायला सुरुवात केली. पुढं हे दोन कार्यकर्ते एका कार्यक्रमासाठी जर्मनीत गेले होते, तिथं त्यांनी बघितलं की, लोकांना बसण्यासाठी प्लॅस्टिकच्या खुर्च्यांच्या लांबच्या लांब रांगा आहेत.

बास, त्यांना इथंच सुचली आयडियाची कल्पना…

तेव्हा सुरू होतं ८० चं दशक. भारतात कुठलाही कार्यक्रम असला की, लाकडी किंवा लोखंडाच्या खुर्च्या वापरल्या जायच्या. त्यांनी ठरवलं या वजनदार खुर्च्यांपासून भारतीयांना रिलीफ द्यायचा आणि मार्केटमध्ये आणायच्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या. त्यांनी या खुर्च्या आणल्या खऱ्या, पण त्यांचं प्रॉडक्शन आणि बिझनेस वाढवायला त्यांच्याकडं पैसा नव्हता.

मग ९० च्या दशकात ते उतरले शेअर मार्केटमध्ये. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तशी मंदी होती, पण तरीही नीलकमलच्या शेअरला चांगला प्रतिसाद मिळाला. मग मात्र नीलकमलनं माग वळून पाहिलं नाही.

आता जवळपास चाळीस वर्ष झाली नीलकमलची घौडदौड सुरूच आहे. फक्त सामान्य माणसांसाठीच नाही, तर कोकोकोला, पेप्सिको, फोक्सवॅगन अशा अनेक कंपन्यांसाठीही नीलकमल काम करतं. सोबतच फक्त खुर्च्याच नाहीत, तर फर्निचर, गाद्या आणि पॅकेजिंगचं काम नीलकमल करतं. आजच्या घडीला त्यांची तिसरी पिढी बिझनेस संभाळतिये.

त्यांचे नवे प्रॉडक्ट्स आपण कळत-नकळत वापरतो, तेव्हा पटकन आपल्या लक्षात नीलकमलचं नाव येत नाही. पण आजही कुठल्या प्लॅस्टिकच्या खुर्चीवरुन हात फिरवताना, हाताला नीलकमलचं कमळ लागलं, की जुने, लग्नातले, लहानपणीचे दिवस आठवतात हे नक्की.

हे ही वाच भिडू:

English Summary: Nilkamal was incorporated on 5 December 1985 as Creamer Plastic. The company changed its name to Nilkamal Plastic on 23 August 1990. In the Year 2004 Company Changed Names to Nilkamal Ltd. The company has manufacturing facilities in Samba, Greater Noida, Pondicherry, Barjora, Sinnar, Nashik, and Silvassa. The company also has joint manufacturing ventures in Bangladesh (Nilkamal Padma Plastics) and Sri Lanka (Nilkamal Eswaran Plastics). In 2011, the company also began production of mattresses with manufacturing units in Hosur and Dankuni.

 

WebTitle: Neelkamal Chairs: Neelkamal chairs rising story and journey

Leave A Reply

Your email address will not be published.