“भारत माता की जय” घोषणा देणाऱ्यांना नेहरूंनी या गोष्टी सांगितल्या होत्या.
भारत माता की जय, सोबत भारताचा तिरंगा आणि वंदे मातरम् राष्ट्रीयत्व सिद्ध करण्यासाठी सध्या या तीन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. या गोष्टी नसतील तर तूम्ही राष्ट्रप्रेमी नाही. तुम्हाला भारताबद्दल अभिमान नाही. तुम्ही तुकडे तुकडे गॅंगचे सदस्य असू शकता इतकच काय तर तुम्हाला पाकिस्तानमध्ये पाठवण्याची तरतूद देखील करावी लागेल.
देशप्रेमाच्या वेगळ्या व्याख्या आहेत. विशेषत: व्हॉटसएप सारख्या माध्यमातून तरी आपणासमोर नेहरू सारख्या नेत्यांना व्हिलन करण्याच काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आजवरच्या राष्ट्रीय नेत्यांनी मग ते कॉंग्रेसचे असोत की भाजपचे त्यांनी लोकांना डोळसपणे पहायला शिकवलं. नुसता झेंडा घेवून किंवा घोषणा देवून भारतीयत्त्व सिद्ध होत नसतं हे आपणाला समजलं पाहीजे.
असो तर विषय़ आहे भारत मातेचा. नेहरूंच्या समोर एकदा भारत माता की जय घोषणा देण्यात आल्या. तो काळ होता १९२० सालचा. नेहरू तेव्हा नवीनच होेते. पंजाब प्रांतातील एका शेतकऱ्यांच्या सभेला ते उपस्थित होते.
तेव्हा उपस्थित लोकांनी घोषणा दिल्या भारत माता की जय…!
नेहरूंनी उपस्थित लोकांना विचारलं भारतमाता म्हणजे नेमकं कोण? लोकांना सांगता आलं नाही. काहीजण म्हणाले नदी, डोंगर, जमीन, शेती, घर हे सगळं मिळून जे तयार होतं तीच भारतमाता.
तेव्हा नेहरू म्हणाले होते,
‘‘ ये सब बातें जो आपने भारत माता के बारे में बताईं, वे हैं तो सही, लेकिन ये तो हमेशा से हैं। आखिर धरती को या नदी-पहाड़ों को तो आजादी नहीं चाहिए। आजादी तो इस धरती पर रहने वाले हम इंसानों को चाहिए। अंग्रेजी राज में जुल्म, गरीबी और भुखमरी का सामना तो आखिरकार हम भारत के लोग ही कर रहे हैं। अगर हम न हों तो इस धरती माता को भारत माता कौन कहेगा? आखिर हम जो भी कर रहे हैं, वो हम अपनी आजादी के लिए ही तो कर रहे हैं। इसलिये जब हम भारत माता की जय बोलते हैं तो हम भारत के 30 करोड़ लोगों की जय बोलते हैं। उन 30 करोड़ लोगों को आजाद कराने की जय बोलते हैं। इस तरह हम सब भारत माता का एक-एक टुकड़ा हैं और हमसे मिलकर ही भारत माता बनती है। तो जब भी हम ‘भारत माता की जय‘ बोलते हैं तो असल में अपनी ही जय बोल रहे होते हैं। जिस दिन हमारी गरीबी दूर हो जाएगी, हमारे तन पर कपड़ा होगा, हमारे बच्चों को अच्छे से तालीम मिलेगी, हम सब खुशहाल होंगे, उस दिन भारत माता की सच्ची जय होगी।’’
असाच एक दूसरा किस्सा तो नेहरूंच्या पत्रातला.
मुस्लीमच काय तर प्रत्येक अल्पसंख्याक समुदायाने आपले राष्ट्रप्रेम सिद्ध केलं पाहीजे हा समज तेव्हा देखील होता. नेहरूंनी १ मार्च १९५० साली तत्कालीन राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं होतं.
त्यामध्ये नेहरू लिहतात,
‘हममें से कुछ लोगों की ये फितरत है कि वे भारत के मुसलमानों से देश के प्रति वफादारी साबित करने और पाकिस्तान समर्थक प्रवृत्तियों की निंदा करने की मांग करती हैं। इस तरह की प्रवृत्तियां निश्चित तौर पर गलत हैं और उनकी निंदा की जानी चाहिये। लेकिन मैं समझता हूं कि हर बार भारतीय मुसलमानों के वफादारी साबित करने पर जरूरत से ज्यादा जोर डालना गलत है। वफादारी किसी आदेश या भय से पैदा नहीं होती है। ये वक्त के सहज प्रवाह में अपने आप पैदा होती है और धीरे-धीरे न सिर्फ एक प्रेरक मनोभाव बन जाती है, बल्कि व्यक्ति को लगता है कि इसी में उसका भला है। हमें ऐसे हालात बनाने होंगे, जिसमें लोगों के अंदर इस तरह के मनोभाव पैदा हो सकें। किसी भी हाल में अल्पसंख्यकों की निंदा करने और उन पर दबाव बनाने से कोई फायदा नहीं होगा।’
असाच तिसरा किस्सा तो भारताच्या विभाजनानंतरचा. भारत व पाकिस्तानच्या निर्मीतीमुळे देशभरात हिंसाचार माजला होता. तिकडे हिंदूंच्या तर इकडे मुस्लीमांच्या कत्तली होत होत्या. म.गांधी नवखाली भागात उसळलेल्या दंगली शांत करत होते. पंडित जवाहरलाल नेहरू याच कालावधीदरम्यात अलाहाबाद इथल्या भागात फिरत होते.
पंडित जवाहरलाल नेहरूंना या भागात फिरत असताना समोरून लोकांचा मोठ्ठा समुदाय येताना दिसला. ही लोकं आपल्या बैलगाड्यांवर मुस्लींमांचा लुटलेला माल लादून चालत होती. नेहरूंना पाहताच या समुदायाने घोषणा देण्यास सुरवात केली,
भारत माता की जय, महात्मा गांधींकीं जय, पंडित नेहरू की जय !!!
तेव्हा नेहरू म्हणाले हातात लुटूची माल घेवून भारत माता आणि महात्मा गांधींच नाव घेताना लाज वाटत नाही का. दूसऱ्यांना लुबाडणाऱ्यांना भारत मातेचं, महात्मा गांधींच नाव घेण्याचा काहीएक अधिकर रहात नाही.
तेव्हाची माणसं देखील शहाणी होती. त्यांनी तात्काळ लुटीचं सामान तिथेच टाकलं आणि जागेवरून रवाना झाली.
संदर्भ : पुस्तक : मिथक औंर सत्य. लेखक पियुष बबेले
हे ही वाच भिडू.
- नेहरूंच्या पुतण्यापासून भारतात पक्षांतराला सुरवात झाली.
- गावकऱ्यांनी तिला सांगितलं, आजपासून तू नेहरूंची बायको झालीस.
- नेहरू हे एकमेव नेते आहेत ज्यांनी स्वत:च स्वत:च्या विरोधात लिखाण केलं आहे.