ना केजरीवाल ना सिसोदिया मुस्लिमांच्या प्रश्नावर हाच आमदार बोलतो

दिल्लीतील वफ्फ बोर्ड मध्ये झालेल्या कथित घोटाळ्यात दिल्लीतील आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना चार दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या जवळील लोकांना अँटी करप्शन ब्युरोच्या वतीने नोटीस पाठवण्यात आली आहे.

अमानतुल्लाह खान यांच्यावर दिल्ली वफ्फ बोर्डात मनमानी पद्धतीने आणि चुकीच्या पद्धतीने अनेक पदांची भरती केल्याचा आरोप ठेवत अटक करण्यात आली आहे. अमानतुल्लाह खानला टार्गेट करण्यासाठी भाजपकडून प्रकराची कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.      

अमानतुल्लाह खान हे आपचे मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जातात. 

केजरीवाल हे अनेक विषयावर बोलत नाहीत. त्यावेळी अमानतुल्लाह खान समोर येऊन बाजू घेत असतात. त्यामुळे त्यांना आपचा मुस्लिम चेहरा म्हटलं जातं. आप अमानतुल्लाह यांना नेहमी मुस्मिल चेहरा म्हणून पुढे केलं आहे. यांच्यामुळेच दिल्लीत आपला मुस्लिम समाजात जाता आल्याचा बोललं जातंय. 

अमानतुल्लाह खान हे दिल्लीतील मुस्लिम बहुल ओखला आणि इतर भागात चांगेलच प्रसिद्ध असून त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. तरीही मोठ्या घटनांमध्ये आपपक्षांकडून मौन बाळगण्यात आल्याने पक्षाकडे मुस्लिम समाज संशयास्पद पाहतात.

सीएए कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे मुस्लिम धर्मियांच्या वतीने आंदोलकन करण्यात आले होते. १०० दिवसांपेक्षा जास्तकाळ हे आंदोलन चालले. केंद्र सरकार विरोधात करण्यात येणाऱ्या या आंदोलनात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पक्षाचे मोठे नेते अंतर ठेवून होते. तसेच यावेळी केजरीवाल म्हणाले होते की, दिल्ल्ली पोलीस हे आमच्या अखत्यारीत असते तर २ तासात शाहिनबागचे रस्ते मोकळे केले असते असे सुद्धा म्हणाले होते.

तर दुसरीकडे अमानतुल्लाह खान हे सतत शाहीबागच्या आंदोलनात सामील होत होते.

आंदोलनादरम्यान त्यांनी अनेक वेळा तिथे भाषण सुद्धा केली. एका भाषणानंतर खानवर हिंसा भांडवण्याच्या प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.  फेब्रुवारी २०२० मध्ये शाहीन बाग येथील आंदोलन जोरात सुरु होते तेव्हा अमानतुल्लाह खान हे आपच्या तिकिटावर ओखला मतदारसंघातून मोठ्या फरकाने निवडून आले होते. शाहीन बाग मध्ये बसलेल्या बहुतेक आंदोलनकर्त्यांची घरे याच मतदार संघात येत असल्याचे सांगितलं जात.  

एप्रिल २०२१ मध्ये खान यांनी दसना देवी मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचे सांगता  एफआयआर दाखल केली होती. एका भाषणादरम्यान धार्मिक भावना दुखविल्याचा आरोप खान यांनी केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी नरसिंहानंद यांना धमकावल्याप्रकरणी खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच मागच्या वर्षी जंतरमंतर भाजपच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुस्लिम विरोधी घोषणा दिल्या गेल्याचा आरोप अमानतुल्लाह खान यांनी केला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी पत्र लिहून  भाजपच्या अश्विनी उपाध्याय यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी उपाध्याय यांना अटक केली होती. 

हा एक प्रकारे खान यांचा विजय समजला गेला. 

पण त्यानंतर जंतरमंतर हे खान यांच्या मतदारसंघात येत नसताना किंवा ते अल्पसंख्याक मंत्री नसताना त्यांनी दिल्ली पोलिसांना पत्र का लिहले, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता अशी एक नाही तर अनेक घटनांमुळे दिल्लीतील मुस्मिल बहुल भागात खान प्रसिद्ध होत गेले. खान हे फक्त आमदार आहेत मंत्री नाहीत. दिल्लीतील मुस्लिम धर्मियांबद्दल कुठलाही निर्णय असुद्या, संबंधित घटना असुद्या तिथे खान हजर होतात.  

केजरीवाल यांच्या सरकार मध्ये इम्रान हुसेन हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत मात्र ते आपले काम सोडून  इतर गोष्टीत सहभागी होत नाहीत. 

तसेच मे महिन्यात दिल्ली महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामा विरोधात शाहिनबाग भागात बुलडोझर चालविण्यात येत होते. याच्या विरोधात खान रस्त्यावर उतरले होते. याच बरोबर मदनपूर खादर मध्ये  अनधिकृत बांधकामा पाडण्यात येत होते. त्यावेळी सुद्धा खान याला विरोध केला होता. त्यावेळी त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. 

खान ज्या ज्या भागात जाऊन विरोध करत तो सगळा भाग मुस्मिम बहुल समजला जातो. एवढी सगळी कारवाई होत असतांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकही शब्द बोलले नाही. तर दुसरीकडे खान हे केजरीवाल यांचे खंदे समर्थक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जात. आपचे संस्थापकांपैकी एक समजले जाणारे कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली केली होती. तेव्हा खान हे केजरीवालांच्या बाजूने उभे राहिले होते. 

केजरीवाल हे सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका घेतात असा आरोप अनेकांकडून करण्यात येतो. केजरीवाल यांना अडचणीत अशा वेळी मुस्लिम प्रश्न घेऊन दरवेळी खान हे बाजू मांडत असतात.

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.