नेताजी मला जाताना म्हणाले होते, “हम आझाद भारत मैं मिलेंगे”.
“मैं वो दिन जीते जी कभी नहीं भूल सकता. मैंने बर्मा-थाईलैंड बॉर्डर पर सीतांगपुर नदी के पास कार से उन्हैं उतारा था. मैं उनके साथ खुद भी जाना चाहता था लेकिन उन्होंने यह कहकर वापस भेज दिया कि हम आजाद भारत में मिलेंगे. इसके बाद नेताजी से मेरी कोई मुलाकात नहीं हुई.”
ब्रम्हदेशातील कोणत तरी जंगल, या जंगलात नेताजी सुभाषचंद्र बोस थांबले होते. काळ तोच जो शाळेच्या पाठ्यपुस्तकांपासून तुमच्या मनात कोरला गेला आहे. अशाच कोणत्यातरी मोक्याच्या क्षणी नेताजींनी आपल्या खिश्यातून रुमाल काढला. तो रुमाल जमिनीवर पडला. नेताजी वाकून तो घेवू लागले इतक्यातच त्यांच्या शेजारी असणारे ते वाकले. त्यांनी रुमाल घेतला आणि उभा राहिले तोच त्यांच्या पाठीवर एकामागून एक गोळ्या लागल्या. ते तिथेच बेशुद्ध झाले.
त्यांना शुद्ध आली तेव्हा नेताजी सुभाषबाबू त्यांच्या उशाला बसले होते. नेताजी त्यांना म्हणाले “कर्नल”.
कर्नल हि पदवी होती. आझाद हिंद सेनेतला बहुमान होता. जो नेताजींनी आपल्या ड्रायव्हरला दिला होता. त्यावर ड्रायव्हर म्हणाला मुझें तो आपका साथ चाहिंऐं.
आझाद हिंद सेनेत खरी आझाद माणसं होती जी देशासाठी लढत होती. त्यांचे सेनापती सुभाषचंद्र बोस होते. आणि त्या सेनापतीचा ड्रायव्हर होते निझामुद्दीन.
निझामुद्दीन हे गेल्या काही वर्षांपुर्वी आझाद हिंद सेनेतील जिवंत असणाऱ्या निवडक लढवय्यांपैकी एक होते. गेल्या वर्षी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झालं !
हि कथा त्यांचीच, एका लढवय्याची, जे नेताजींची वाट बघत ११७ वर्ष जगले !!
निझामुद्दीन याचं खर नाव सुफैद्दिन होतं. आझमगडमधल्या मुबारकपुर मधले ते रहिवासी होती. ब्रिटीश सैन्यात सहभागी होवून ते सिंगापूरमध्ये ब्रिटीश सैन्यामार्फत लढत होते तेव्हा त्यांना आझाद हिंद सैनेबद्दल समजल. वेळ न घालवता ते तात्काळ “आझाद हिंद सेनेमध्ये सहभागी झाले” .
नेताजी सुभाषबाबूंचे पर्सनल ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड अशी विश्वासू भूमिका त्यांच्या वाट्याला आली होती. ते नेताजींसोबत सावली सारखे राहतं. नेताजींच्या मृत्यूबद्दल त्यांच ठाम म्हणणं होतं की ती अफवा होती. ब्रम्हदेश आणि थायलंडच्या सीमेवर आझादबाबू त्यांनी म्हणाले होते की, “हम आझाद भारत मैं मिलेंगे.”
हि घटना नेताजींच्या मृत्यूच्या अफवेनंतर तीन महिन्यांनी घडल्याचं ते सांगतात.
नेताजींच्या माहितीची शेवटचा खजिना म्हणून अनेक पत्रकार त्यांना भेटत. प्रत्येकाला ते हेच सांगत की, नेताजी त्या घटनेत गेले नव्हते.
काही वर्षांपुर्वी मोदींची लाट भारतात आली होती. मुखर्जी आयोगासहित नेताजींच्या मृत्यूंबाबत असणाऱ्या फाईल सत्तेत येताच उघड करण्यात येतील अस मोदींनी त्यांच्या उपस्थितीत सांगितलं होतं.
मोदींनी त्यांच्या पाया पडूनच सभेस सुरवात केली होती. तेव्हा त्यांच्या डोळ्यात चमक होती. राजकारणाच्या आश्वासनांमध्ये वेगळं काय झालं ते सांगण्याची गरज नाहीच. अखेर २०१८च्या फेब्रुवारीमध्ये त्यांच निधन झालं. आझाद भारत मैं मिलेंगे यांची वाट बघत त्यांनी आयुष्याची ११७ वर्ष पुर्ण केली.
हे ही वाचा –
- स्वातंत्र्यलढ्यातील एकमेव अमेरिकन ज्याने भारतात ‘सफरचंद क्रांती’ घडवून आणली !
- स्वातंत्र्यलढ्यात सर्वात कमी वयात फासावर चढलेला क्रांतिकारक !
- स्वातंत्र्यलढ्यात तोफेच्या तोंडी गेलेले देशातील पहिले पत्रकार.
- भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून १५ ऑगस्ट हीच तारीख का ठरविण्यात आली ..?