फक्त कॅलेंडरचं पानच नाही तर तुमच्या दैनंदिन आयुष्यात ‘या’ गोष्टी बदलणार आहेत
नवीन वर्ष येणार…त्याचे तुमचे अनेक प्लॅन्स, नवीन संकल्प इत्यादी गोष्टी मनात तुम्ही ठरवून तयार असाल. चालू वर्षाला बाय-बाय करत अन नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी काही ट्रिप्स, कॅम्पिंग, ट्रेक किंव्हा पब वेगैरे पार्टीची सोय देखील झाली असेल. पण मित्रांनो जरासं प्रॅक्टिकल व्हा आणि गेलेलं वर्ष आपल्याला किती आव्हानात्मक गेलं, याची कल्पना आपल्याला आहेच…कोरोनाच्या साथीमुळे कित्येकांचं आयुष्यच या २०२१ ने बदललं. त्यामुळे येतं नवीन वर्ष सुखाचं जावं म्हणून काही जण काही योजना आखात असतीलच…
पण हे सगळं ठरवतांना हे हि लक्षात असू द्या कि, येत्या नवीन वर्षात दैनंदिन जीवनाशी संबंधित आपल्या समोर काय आव्हानं असतील ? सामान्य लोकांच्या आयुष्यात या आव्हानांमुळे काय आहेत ते पाहूया…
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि तुमच्या खिशावर होईल.
त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे.
१ जानेवारी २०२२ पासून, एटीएममधून पैसे काढणे आणखी महाग होणार आहे. आरबीआयच्या नवीन नियमांनुसार, आता ग्राहकांना निश्चित मर्यादेनंतर एटीएम व्यवहारासाठी अधिक पैसे द्यावे लागतील. १ जानेवारीपासून देशातील सर्व बँकांनी एटीएम शुल्कात ५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच आता मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांना प्रत्येक वेळी एटीएममधून पैसे काढताना २१ रुपये द्यावे लागतील. बँका सध्या ग्राहकाकडून अशा व्यवहारांसाठी प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारतात, पण यावर टॅक्स लागत नव्हता तो आता लागणार आहे.
तर ऑनलाइन कार्ड पेमेंटचे नियम देखील बदलणार आहेत. वास्तविक, डेबिट आणि क्रेडिट कार्डची सुरक्षा लक्षात घेऊन हे बदल केले जात आहेत. RBIने १ जानेवारी २०२२ पासून नवीन नियम लागू करणार आहे. ग्राहकांचा डेटा हटवण्यासाठी आणि त्याच्या जागी व्यवहार करण्यासाठी आरबीआयने एनक्रिप्टेड टोकन वापरण्यास सांगितले आहे.
२) सर्वात महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे, एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होणार आहे.
आता मिडल क्लास माणूस महागाई म्हणलं कि, टेन्शन येत असते. त्यात सिलेंडर च्या वाढत्या किमती म्हणलं कि आणखीनच टेंशन येते. आता हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करत असतात. अशा स्थितीत गेल्या काही महिन्यांपासून गॅसच्या किमतीत वाढ दिसून येत आहे. आता या महिन्यात म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो हे देखील सांगितले जातेय.
३ ) पोस्ट ऑफिसशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजेच IPPB ने जाहीर केले आहे की १ जानेवारी २०२२ पासून, ग्राहकांना ठराविक मर्यादिपक्षा जास्त रोख रक्कम आणि जमा काढण्यासाठी शुल्क द्यावे लागेल. आता नवीन नियमानुसार, बेसिक बचत खात्यातून प्रतिमहिना चारवेळा निःशुल्क पैसे काढता येतील. मात्र, निर्धारित मोफत मर्यादा ओलांडल्यानंतर पैसे जमा केले किंवा काढले, तर प्रत्येक व्यवहारासाठी रकमेच्या अर्धा टक्के किंवा २५ रुपये यापैकी कमी शुल्क द्यावे लागेल.
४) आता शॉपिंग जपून करायला लागणारा आहे कारण चपला- कपड्यांच्या किंमती वाढणार आहेत.
बाकी सगळं महत्वाच्या गोष्टींच्या नियमांमध्ये बदल होणारच आहेत तसेच आता १ जानेवारी पासून फुटवेअर आणि कपड्यांवर १२ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. जीएसटीत केंद्र सरकारने सात टक्के वाढ केली आहे.
त्याचप्रमाणे, ऑनलाइन रिक्षा बुकिंगवरही पाच टक्के जीएसटी लागू होईल. त्यामुळे, ओला, उबेरच्या रिक्षासेवासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
५ ) आणखी एक म्हणजे, येत्या नवीन वर्षांत फोर व्हीलर महागणार आहेत.
प्रत्येक मिडल क्लास असो वा अप्पर क्लास माणसाचं स्वप्न असते कि, आपल्या जवळ एक तरी फॉरव्हीलर असावीच. पण आता या स्वप्नासाठी आता ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. १ जानेवारी पासून ग्राहकांना मारुती सुझुकी, रेनो, होंडा, स्कोडा अशा जवळपास सर्व कंपन्यांच्या मोटारींसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. टाटा मोटर्सने १ जानेवारीपासून व्यावसायिक वाहनांच्या किमतीत अडीच टक्के वाढ केली आहे. त्यामुळे चारचाकी महागणे हे थोडेसे निराशाजनक मानले जातेय.
शेवटचं म्हणजे, Google च्या अनेक अँप्स वर देखील आता पैसे खर्च होणार आहेत.
Google १ जानेवारी पासून अनेक नियमांमध्ये बदल करत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. तुम्हाला Google Ads, YouTube, Google Play Store सारख्या सर्व Google सर्व्हिससाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील. इतकंच नाही तर पुढच्या महिन्यापासून तुम्ही RuPay, American Express किंवा Diners कार्ड वापरत असाल तर Google तुमच्या कार्डचा तपशीलही सेव्ह करणार नाही. नवीन वर्षाच्या १ ला पासून, तुम्हाला प्रत्येक मॅन्युअल पेमेंटसाठी कार्ड तपशील प्रविष्ट करावा लागेल.