NIA चा ISIS संबंधी नांदेडमध्ये छापा, दहशतवादी कारवायांत नांदेड, उदगीर कनेक्शन का समोर येतं ?

एक काळ असा होता कि दहशतवादी कारवाईच्या एक ना एक बातम्या सारख्या कानावर असायच्या. त्यातही महाराष्ट्रातून जेव्हा बातम्या येयच्या तेव्हा मुंबईजवळील मुंब्रा, मराठवाड्यातील काही ठिकाणं अशी फिक्स नावं असायची. मात्र मधल्या काळात या बातम्या कमी झाल्या होत्या.

मात्र गेल्या काही दिवसांत अशा बातम्या पुन्हा येऊ लागल्यात. कालच NIA ने आयसिसशी संबंध असल्यावरून संपूर्ण देशभरात एनआयएचे छापे मारल्या जात आहेत.

त्यातच देशभरातील एकूण 6 राज्यात, 13 ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात महाराष्ट्रातील नांदेडचं नाव समोर आले आहे.

नांदेड शहरातील इतवारा परिसरातील जुनागंज मस्जिद येथील मुफ्ती व इतर दोन जनांना संशयित म्हणून NIAने छापेमारी करत ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे मात्र NIA ने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाहीये.

याधीही नांदेडमध्ये  प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बियाणी यांच्या हत्येमागे पाकिस्तानात असलेला खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याचा हात असल्याचं समोर आलं होतं. 

त्यामुळं पुन्हा या भागात दहशतवाद्यांचं सेल ऍक्टिव्हेट झालं आहे का? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

२०१० यामध्ये जेव्हा जर्मन बेकारी बॉम्बस्फोटाने पुणे हादरलं होतं तेव्हा देखील हा भाग असाच चर्चेत आला होता. पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट उदगीर येथे शिजल्याची माहिती बाहेर आली होती.

लष्कर-ए-तय्यबाचा राज्यप्रमुख व इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा प्रमुख मिर्झा हिमायत बेग याने उदगीर येथे तळ ठोकून हा कट रचल्याचे समोर आले होते. 

यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रच्या सीमेवरील लातूर जिल्ह्यातील उदगीर शहर देशभर चर्चेत आले होते. लातूर जिल्ह्य़ातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या उदगीरला अतिरेक्यांनी केंद्र बनविल्याची देशभर चर्चा झाली होती. त्यानंतर बीड, उदगीर येथून मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सापडले होते.

याची महत्वाची कारणं म्हणजे या दहशतवादी संघटनांकडून या भागात मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आलेलं नेटवर्क.

मराठवाड्यात दहशतवाद्यांच्या कारवाया या नवीन नाहीत. १९९२ नंतर बाबरी मशीद पाडल्याने देशभरातलं १९९९मध्ये या कारवायांना प्रारंभ झाला होता. औरंगाबाद, बीड, परभणी, उदगीर, परळी येथे ‘स्लीपर सेल’ म्हणून दहशतवादी संघटना कार्यरत होत्या.

 ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ने (सिमी) औरंगाबादमध्ये नोव्हेंबर १९९९मध्ये अधिवेशन घेतले होते. त्या वेळी अझम घौरी याने चिथावणीखोर व्हिडिओ औरंगाबाद आणि परिसरातील तरुणांना दाखविले होते. ६ डिसेंबर १९९९ रोजी ‘सिमी’चे रूप खऱ्या अर्थाने समोर आले होते. 

पुढे सिमी बॅन झाल्यानंतर इंडियन मुजाहुद्दीन आणि त्यानंतर इसिसच्या वेळसही असंच नेटवर्क उभारण्याचे प्रयत्न झाले होते. 

दुसरं म्हणजे मुस्लिम बहुसंख्य असलेला भाग 

अनेकदा मुस्लिमांच्या धार्मिकतेचा फायदा धर्मांध संघटनांकडून घेतला जातो. हा भागही त्याला अपवाद  नाहीये.  प्रक्षोभक व्हिडिओ दाखवणे, कुराणाचा दाखल देऊन माथी भडकवणे अशी कामं या संघटनांकडून केली जातात आणि मग दहशतवादी संघटना जेव्हा आपले हातपाय पसरवू पाहत आहेत तेव्हा त्यांच्या हाती अनेकदा असे रेडिमेड प्रोडक्ट सापडतात. NIA ने नांदेड मधून अटक केलेल्यांमध्ये एक मुफ्तीचाही समावेश आहे असं सांगण्यात येत आहे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे आहे.  

आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या असलेलं मागासलेपण

सच्चर कमिटीच्या अहवालात मुस्लिम समाजातील गरिबी, शैक्षणीक मागासलेपण पुढे आलं होतं. त्यात मराठवाडा तर आधीच आर्थिकदृष्ट्या मागास आहे. अनेकदा समाजातील तरुणांनाकडून आर्थिक विवेंचनेमुळे गुन्हेगारीची वाट धरली जाते. अर्थीक परिस्थिती नसल्यामुळे, मुस्लिमांविरोधात समाजात असलेल्या पूर्वग्रहदूषित वातावरणामुळे मुस्लिम समाजातील तुरुंगात खितपत पडलेले दिसतात.  हि सर्व परिस्थती दहशतवादी संघटनांना आपले हातपाय पसरण्यासाठी अगदी पोषक आहे. याचा ही फायदा या संघटनांकडून घेतला जातो.

हा भाग धार्मिकदृष्ट्या संवेदनशील राहिला आहे

नांदेड आणि आजूबाजूचा परिसर पहिल्यापासूनच संवेदनशील राहिला आहे. मुस्लिम दहशतवाद्यांचं कनेक्शन अनेकदा पुढे आलंच आहे. पण त्याचबरोबर खलिस्तानी दहशतवादी ही या भागातून पकडले गेले आहेत, एवढंच नाही तर हिंदू दहशतवाद्यांचं कनेक्शनही नांदेडमध्ये समोर आलं होतं.

  6 एप्रिल 2006 रोजी नांदेड येथे RSS कार्यकर्त्याच्या घरी बॉम्बस्फोट झाला होता ज्यात हिमांशू पानसे आणि नरेश राजकोंडोवार या दोघांचा मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते. 

त्यानंतर NIA ने सर्व 2006 च्या नांदेड बॉम्बस्फोटातील आरोपी आणि समझौता, मालेगाव, मक्का मशीद आणि अजमेर शरीफ या दहशतवादी घटनांमागील आरोपी यांच्यातील संबंधांचे पुरावे पुढे आणले होते.

अशा घटनांचा  फायदा धर्मांध कट्टर लोकांकडून एकमेकांविरोधात डोकी भडकावण्यासाठी घेतला जातो. त्यामुळं देशातील इतर भागात जी कारणं सापडतात तशीच कारणं नांदेड, उदगीर, लातूर आणि मराठवाड्यातील इतर भागात सापडतात. यामध्ये अमुक एकट्या भागाला टार्गेट नं करता ज्या कारणामुळं दहशतवादी संघटना फोफावू शकतात टी कारणांचं उत्तर शोधलं पाहिजे असं जाणकार सांगतात. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.