4 लाखांचा दंड भरून Nike ने 800 कोटींचे शूज विकले..

अमेरिकेत बास्केटबॉल सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे. एनबीए अर्थात नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अमेरिकेत फेमस लीग आहे.

एकदा एक क्लबच्या प्लेयरला नियमात बसत नाही म्हणून त्याचे शूज बॅन करण्यात आले होते. जर ग्राउंडवर शूज वापरायचा असेल तर प्रत्येक मॅचसाठी त्याला ४ लाख रुपये दंड भरावा लागेल अशी अट टाकण्यात आली होती. मात्र कंपनी दंड लावण्यात आल्याने मागे हटली नाही.

कंपनीने प्रत्येक मॅचसाठी ४ लाख रुपये दंड भरण्याचे मान्य केलं. आणि खेळाडूला तो शूज घालून खेळायला सांगितले. पुढे जाऊन हा शूज इतका प्रसिद्ध झाला की, ८०० कोटींच्या शूजची विक्री झाली. 

ज्या प्लेयरच्या शूजला बॅन करण्यात आले त्याचे नाव होते.

मायकल जॉर्डन

अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर. भारतातील कुणाशी तुलना करायची झाल्यास सचिन तेंडुलकरशी करता येईल. तो ग्राउंडवर आल्यावर पब्लिक सगळं काही विसरून जात होत अगदी तसंच. जॉर्डनने चाहत्यांना वेड लावलं होत.

तो काळ होता १९८४-८५ चा.

मायकल नॉर्थ कोलंबिया युनिव्हर्सिटीकडून खेळत होता. शिकागो बुल्सने ६ मिलियन देऊन त्याला आपल्या क्लब मध्ये घेतलं. त्याचबरोबर नाईकी कंपनीने मायकल जॉर्डनची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड केली आणि त्या बदल्यात ५ लाख डॉलरचा करार केला.

करारापोटी ५ लाख डॉलर मिळविणारा मायकल पहिला प्लेयर होता

अमेरिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडत होते. तो पर्यंत एकाही खेळाडूला करारापोटी एवढे पैसे मिळाले नव्हते. मायकल जॉर्डन पहिला खेळाडू होता. त्यावेळी त्याचे वय अवघे २१ वर्ष होते. मायकलची ब्रँड व्हॅल्यू इतर खेळाडूच्या तुलनेत मोठी होती. तो कसा खेळतो, तो कुठल्या प्रकारचे कपडे घालतो याकडे त्याच्या चाहत्यांच्ये विशेष लक्ष असायचे. त्याला फॉलो करणारा मोठा वर्ग होता. त्यामुळेच नाईकीने मायकलची निवड केली होती.  

५ लाख डॉलरच्या कराराबरोबर नाईकीने जॉर्डनच्या नावाने एक स्निकर शूज बाजारात आणला त्याचे नाव ठेवले एयर जॉर्डन 1 (AJ1). त्याचा कलर रेड आणि ब्लॅक होता. बास्केटबॉल खेळणाऱ्या इतर खेळाडूंच्या शूज पेक्षा हा स्निकर जरा वेगळा होता.  

मायकल जॉर्डन हेच स्निकर घालूनच बास्केटबॉल खेळत असे.

फेब्रुवारी १९८५ शिकागो बुल्स आणि न्यूयॉर्क निक्स या दोन क्लब मध्ये मॅच होती. यावेळी न्यूयॉर्क निक्स क्लबच्या प्रशिक्षकाने मायकलच्या स्निकरच्या कलरमुळे खेळाडूंचे लक्ष विचलित होते अशी तक्रार केली होती.

यावेळी एनबीएचे तत्कालीन अध्यक्ष डेव्हिड स्टर्न हे ग्राउंडवर होते. त्यांनी मायकलच्या स्निकरवर बंदीची सूचना दिली. या संदर्भात एनबीएने नाईकी कंपनीला पत्र पाठविले. त्यात जॉर्डन घालत असलेला स्निकरचे कलर मैदानातील नियमांचा भंग करत असल्याचे सांगितले. एनबीएच्या नियमानुसार एकतर ग्राउंडवरील शूज हे पांढऱ्या कलरचे असायला हवेत नाहीतर तुमच्या टीमच्या जर्सीच्या कलरचे. जॉर्डन घालत असलेले स्निकर हे यात कुठंच बस नव्हते.     

यामुळे एनबीएने मायकेल जॉर्डनला नाईकीचे रेड-ब्लॅक स्निकर शूज घालून बास्केट बॉल खेळायला बंदी घातली. 

शूज घालून मॅच खेळाला तर ४ लाख रुपये दंड लावण्यात येईल असे सांगितले गेले  

एक प्रकारे जॉर्डनच्या स्नीकरवर बॅन आणण्याचा प्रयत्न केला गेला.

नाईकीने मात्र याचा फायदा घ्यायचे ठरले. त्यांनी जॉर्डन एअर 1 (AJ1 ) बॅन एडिशन बाजारात आणले. त्यावेळी मायकल जॉर्डन हा फुल्ल फॉर्म मध्ये होता.

बॅन प्रकरणामुळे जॉर्डनला अधिक प्रसिद्धी मिळाली. एकप्रकारे त्याच्यावर अन्याय होतो असे दाखविण्यात आले.

जॉर्डन आणि नाईकी मध्ये यावर चर्चा झाली. यानंतर जॉर्डन बॅन करण्यात आलेले स्निकर घालून मॅच खेळण्याचे ठरले. आणि नाईकीने प्रत्येक मॅचसाठी ४ लाख रुपये दंड भरणार होती. या सगळ्या वादात जॉर्डनला फॉलो करणाऱ्यां मध्ये AJ 1 ची क्रेज वाढली.

आता स्निकरची किंमत वाढवून २०० डॉलर केली गेली. 

पुढे एका वर्षात म्हणजेच  १९८६ मध्ये एअर जॉर्डन २ बाजारात आणला. दिवसेंदिवस नाईकीच्या स्निकरची विक्री वाढत चालली होती यानंतर पहिल्यांदा एअर जॉर्डन स्निकर बास्केट बॉलच्या ग्राउंड बाहेर आला.

नाईकीने आपली सगळी ताकत एअर जॉर्डन स्निकरच्या मागे लावली होती.

जॉर्डन एनबीएचे शेवटची मॅच खेळाला २०१९ मध्ये. त्या वीस वर्षात एअर जॉर्डन स्निकर ८०० कोटींचे विकले गेले. नाईकी कंपनीला या सगळ्यात वादात २० कोटींच्या शूजची विक्री होईल असे वाटले होते.

उलट बॅन लावल्यामुळे नाईकी कंपनीचा अधिक फायदा झाला. १६ वर्षानंतर जॉर्डन एनबीए मधून निवृत्त झाला. जगात सार्वधिक कमाई करणाऱ्या प्लेयर्स पैकी जॉर्डन एक ठरला. एनबीए ने पाठविले जॉर्डनच्या शूज संदर्भातील पत्र नाईकीच्या ऑफिस मध्ये फ्रेम करून लावण्यात आले आहे.   

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.