14 व्या वर्षी बिझनेसमध्ये उतरलेल्या कामत बंधूनी स्टॉक ब्रोकरेज मधली बाप कंपनी ‘झिरोधा’ बनवली …

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षापासून व्यवसायाला सुरवात ते फॉर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या निखिल कामथ यांची ही गोष्ट. निखिल कामथ यांनी त्यांचा मोठा भाऊ नितिन कामथ यांच्यासह व्हॉल्यूमच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकरेज कंपनी, झिरोधा ( Zerodha ) ची स्थापना केली. या कामथ बंधूंनी ट्रू बीकन ही इन्व्हेस्टमेंट कंपनी स्थापन केली. या कंपनीची झालेली भरभराट म्हणजे त्यांनी फोर्ब्सच्या भारतातील 100 श्रीमंतांच्या 2020 च्या यादीत प्रवेश केला. पण त्यांचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता.

शाळेत असताना निखिल कामथ यांचं अभ्यास मुळीच लक्ष नव्हतं पण बुद्धिबळ खेळण्याचा भारी नाद त्यांना शाळकरी वयात लागलेला होता. आता नाही अभ्यास जमत तर दुसरं काहीतरी काम केलं पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या मित्रासोबत जुने फोन खरेदी विक्री करण्यासाचा धंदा सुरू केला पण हे प्रकरण जेव्हा निखिल कामथ यांच्या आईला कळलं तेव्हा त्यांना हा बिझनेस बंद करावा लागला. शाळेतसुद्धा परीक्षा देण्यावरून त्यांना रोखण्यात आलं हे आपल्या सोबतच का घडतंय म्हणून त्यांनी थेट शाळेलाच रामराम ठोकला. पुढं काय करायचं म्हणून वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी कॉल सेंटरमध्ये 8 हजार पगारावर त्यांना नोकरी मिळाली.

निखिल कामथ दुपारी 4 ते पहाटे 1 पर्यंत कॉल सेंटरवर काम करत असे आणि सकाळी स्टॉक व्यापारात हात आजमावत असे. प्रॉपर शिक्षण घेतलं,शेअर बाजार कसा चालतो याचं गणित समजावून घेतलं. वयाच्या १८ व्या वर्षाच्या सुमारास निखिल कामत योग्य रितीने शेअर्सचा व्यापार करू लागले.

वडिलांनी त्यांची काही बचत त्यांना दिली आणि म्हणाले, ‘हे एवढे इन्व्हेस्ट कर.’ त्यांचा फक्त आंधळा विश्वास होता. त्यानंतर, निखिल कामथ यांनी कॉल सेंटरमधील त्यांच्या मॅनेजरलाही असेच करण्यास पटवून दिले त्याने कामथ यांच्यासाठी ते काम केले, त्याने इतरांना सांगितले. म्हणून निखिल कामथ शेवटच्या वर्षात एकही दिवस कामावर गेले नाही, परंतु मॅनेजरने त्यांना उपस्थित म्हणून मार्क केलं होतं. कारण सगळ्या टीमचे पैसे कामथ सांभाळत होते.

2010 मध्ये निखिल कामथ यांनी नोकरी सोडली आणि त्यांनी कंपनीच्या लोकांना चांगला नफा मिळवून दिला. मग आपल्या मोठ्या भावासोबत त्यांनी झिरोधाची सुरवात केली. आज कोटी रुपयांची उलाढाल ते करतात. कोट्याधीश असूनही कामथ दिवसाला 85 टक्के काम करतात आणि निवांत राहतात. म्हणून फॉर्ब्सच्या 100 लोकांच्या यादीत त्यांचं नाव आलेलं आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.