टेस्लाच्या संशोधनावर स्वामी विवेकानंद यांच्या अध्यात्माचा प्रभाव होता.

स्वामी म्हणल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर बरेच बाबा,महाराज येत असतील जे तुम्हाला पूजा अर्चा, योग-धारणा, धर्म इत्यादींबद्दल मार्गदर्शन करीत असतील. पण आपल्या भारताला एक असेही स्वामी मिळाले आहेत जे, अध्यात्म आणि विज्ञान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे सांगून गेले आहेत, ते म्हणजे स्वामी विवेकानंद !

स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या याच समीकरणाचा आधार घेतला जगातील महान शास्त्रज्ञ निकोला टेस्ला ह्यांनी

आता असं म्हणल्यावर तुमचा विश्वास बसणार का कि, जमशेदजी टाटा, तसेच एडिसन आणि टेस्ला सारख्या मोठ-मोठाल्या शास्त्रज्ञांसोबत स्वामी विवेकानंद विज्ञानावर, संशोधनावर चर्चा करायचे. 

स्वामींचा वेदांचा अभ्यास आणि टेस्ला यांचा विज्ञानाचा अभ्यास या दोन्ही गोष्टींची सांगड घातल्यास काय घडू शकते टेस्ला यांच्या संशोधनावरून दिसूनच येते.  आइनस्टाईनच्याही आधी रिलेटिव्हिटीच्या दृष्टिकोनातून विचार करणारे टेस्ला यांच्यावर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आणि वेदान्ताचा प्रभाव होता.

१८ व्या शतकाच्या शेवटपर्यंत आपल्याला आत्ता जशी बटण दाबले की वीज मिळते, तशी मिळत नव्हती. आपण सद्या वापरत असलेला अल्टरनेटींग करंटचा शोध अजून लागला नव्हता, केवळ डायरेक्ट करंट उपलब्ध झालेला होता. परंतु त्यानंतर वीज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे सोपे झाले ते टेस्ला यांच्या संशोधनामुळे. त्यांनीच अल्टरनेटींग करंट (AC) चा शोध लावला होता.

१८८२ मध्ये टेस्ला यांनी पॅरिसमधील एडिसन कंपनीमध्ये नोकरी करतांना त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा खरा अनुभव मिळाला. टेस्ला यांचे इंजिनिअरिंग आणि फिजिक्समधील अफाट ज्ञान आणि अभ्यास बघून कंपनीने त्यांना मोटर बनविणे आणि डिझाईन करणे या जबाबदाऱ्या दिल्या. आणि त्यानंतर टेस्ला यांनी नोकरी सोडली आणि अमेरिकेत आले.  आणि  १८८५ मध्ये त्यांनी स्वतःची “टेस्ला इलेक्ट्रिक लाईट अँड मॅन्युफॅक्चरिंग” ही कंपनी स्थापन केली, त्या कंपनीद्वारे त्यांनी बरेच मोठ-मोठाले शोध लावले.

टेस्ला हे एक मोठे इलेक्ट्रिकल इंजिनिअर, मेकॅनिकल इंजिनिअर होते तसेच ते  तसेच ते वेदांताचे  अभ्यासक सुद्धा होते.

निकोला टेस्ला जेव्हा अमेरिकेत स्थायिक झाला त्याच सुमारास स्वामी विवेकानंद अमेरिकेत होते. हा काळ होता साधारणतः १८९६ चा. स्वामी विवेकानंद यांची अनेक ठिकाणी व्याख्याने चालू होती. ते बऱ्यापैकी लोकप्रिय झाले होते. त्यामुळे त्यांना अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळत असे.

त्यांच्या याच अभ्यासामुळे त्यांची भेट विवेकानंदांसोबत झाली होती. योगही असा जुळून आला कि टेस्ला जेव्हा १८९६ मध्ये अमेरिकेत स्थायिक होते त्यादरम्यान स्वामी विवेकानंदही अमेरिकेत मध्येच होते. विवेकानंद त्याकाळात विदेशातही बरेच लोकप्रिय झाले होते. त्यांना बऱ्याचदा व्याख्याने करण्याचे निमंत्रणे यायची त्यामुळे विवेकानंद यांची परदेशी दौरे नेहेमीच असायचे.  

वेदांताच्या अभ्यासामुळेच दोघांची भेट झाल्याची काही पुरावे हि आढळून आले आहेत. “कम्प्लिट वर्क ऑफ स्वामी विवेकानंद’ याच्या ५व्या खंडात याचे काही उल्लेख आढळून आले आहेत.

एकदा अमिरिकेत गौतम बुद्धांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या नाटकाला स्वामी विवेकानंद उपस्थिती होते. बुद्धांच्या आयुष्यावर आणि भारतीय संस्कृतीवर अभ्यास केलेल्या काही लोकांनी विवेकानंदाची भेट घेतली त्यात टेस्ला सुद्धा होते, त्या दोघांची हि पहिलीच भेट होती.

एका विषयात रस असणारे आणि त्यातच अभ्यास करणारे दोन व्यक्ती एकत्र आले म्हणजे गहन चर्चा तर होणारच. तशीच या दोघांत वेदांत आणि इतर विषयांवर चर्चा बरीच लांबलचकचर्चा झाली.

स्वामी विवेकानंद यांनी वेदांत अमेरिकेतील बुद्धिजीवींपर्यंत तर पोहचवला होता परंतु त्यांची इच्छा होती कि जर वेदांताला वैज्ञानिक आधार आहे हे जर सिद्ध करताआलं तर खूप चांगलं होईल असं त्यांनी टेस्ला यांच्याजवळ मत व्यक्त केलं. 

याबाबत स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या खंडात याचा उल्लेखही केला कि, “बल आणि मॅटर यांचा ऊर्जेशी असलेला संबंध हा गणितीय सूत्राद्वारे मांडता येणे शक्य असल्याचे टेस्ला यांना वाटते. मी त्यांना भेटणार आहे. असे असल्यास वैदिक तत्त्वज्ञान जगापुढे मांडण्याकरिता एक उत्तम पाया रचला जाईल, याचा मला विश्वास आहे. मी सध्या ब्रह्मांड विज्ञान आणि परलोकीय विज्ञानाचा वेदान्ताच्या दृष्टिकोनातून अभ्यास करीत आहे. त्यांचा आधुनिक विज्ञानाशी असलेला संबंध मला स्पष्टपणे दिसून येतो आहे”.

टेस्ला यांच्या मनावर विवेकानंदांच्या विचारांचा असलेला प्रभाव आणखीच वाढला. ते विवेकानंदांच्या ‘वेदांमधील विश्वरचना’ (Vedic Cosmology) या विषयावरील अनेक व्याख्यानांना उपस्थित राहू लागले आणि या विषयाचा वैज्ञानिक दृष्टीतून गंभीरपणे अभ्यास करू लागले. टेस्ला यांना एक दिवस यात नक्कीच यश मिळेल असा विश्वास स्वामी विवेकानंद यांना होता. टेस्ला यांनी वेदांची आणि विज्ञानाची सांगड घालण्याचा बराच प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यांनी प्रयत्न केले ते अर्धवट राहिले परंतु काही काळानंतर आईनस्टाईनच्या ‘थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’द्वारे वेदांची हीच संकल्पना जगापुढे आली.

परंतु त्याच्यामागे असलेली खरी संकल्पना ही. टेस्ला आणि विवेकानंदांची आहे ही बाब मात्र साऱ्या जगासमोर दुर्लक्षितच राहिली आहे. 

टेस्ला यांचे संपूर्ण आयुष्य हे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावण्यात आणि प्रयोगातच गेले. ते दिवसाची २-२ तासांची झोप घ्यायचे, काम आणि अभ्यास करतांना त्यांना कशाचेही भान राहत नसायचे. अनेक महत्वपूर्ण शोध लावून जगाला समृद्ध करणारा शास्त्रज्ञ शेवटपर्यंत एकाकी आणि गरीबीचे आयुष्य जगला आणि वयाच्या ८६ व्या वर्षी, १९४३ मध्येत्यांनी हे जग सोडले.  

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.