‘निंबूज’ हे लिंबू पाणी आहे की फ्रुट ज्यूस… वाद सुप्रीम कोर्टात गेलाय…

ते बाटलीबंद निंबूज माहित आहे का? नसेल माहित तर राहूदे. इथं प्रश्न फक्त निंबूज ब्रॅण्डचा नाहीय तर तो एकूणचं लिंबूपाण्याचा आहे. एक लिंबू घेतला तो पाण्यात पिळला थोडी साखर आणि थोडं मिठ टाकलं की लिंबूपाणी तयार होतं.

पण मुद्दा असाय की हेच लिंबूपाणी जेव्हा इंटरनॅशनल कंपन्या विकतात तेव्हा त्यावर कोटींच्या कोटींत पैसे मिळवतात.

साहजिक विषय पैशाचा येतो. अशा वेळी छोट्यातल्या छोट्या गोष्टी देखील महत्वाच्या असतात. तर झालय अस की सुप्रीम कोर्ट “निंबूज” हे फ्रुट पल्प आहे की ज्यूस बेस ड्रिंक यावर निर्णय देणार आहे. 

आत्ता काहीही निर्णय दिला तर काय फरक पडणार आहे. तर भावांनो हा विषय थेट टॅक्समध्ये येतोय. म्हणजे फ्रुट पल्प असेल तर वेगळा टॅक्स आणि ज्यूस बेस ड्रिंक असेल तर वेगळा टॅक्स असा मॅटर आहे. 

या याचिकेवर जस्टिस एमआर शाह आणि बीवी नागरत्न हे दोन न्यायाधीश सुनावणी करणार आहेत. बर सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हे प्रकरण काय आज आलेलं नाही तर मार्च २०१५ पासूनच हा मॅटर कोर्टात गेलाय.. 

नेमकं प्रकरण काय आहे.

केंद्रिय एक्साइज डिपोर्टमेंट आणि आराधना कंपनी या दोघांमधला हा वाद आहे. निंबूजला कोणत्या टॅक्स श्रेणीत ठेवायचं त्यावरून हा वाद सुरू झाला. यात एक्साईज विभागाचं म्हणणं आहे की निंबूज सेंट्रल एक्साईज ॲण्ड सर्विस टॅक्स हैद्राबाद CETH2022 च्या 90\20 च्या कायद्यानुसार फळांचा पल्प किंवा फळांपासून बनलेल्या रसांच्या श्रेणीत घ्यावं लागेल.

तर आराधना फुड्स च्या मते लिंबू पाणी हे फक्त लिंबू पाणी आहे. हे CETH2022 च्या 10\20 च्या सेंट्रल एक्साईज टेरिफ एक्टच्या १९८५ च्या फर्स्ट शेड्यूलमध्ये यायला हवं.. 

यापुढे जावून आराधना फुड्सचं म्हणणं आहे की उत्पादन शुल्क विभागाने आमचं म्हणणं मान्य पण केलं होतं.

एप्रिल ते डिसेंबर २०१३ मध्ये आमच्या म्हणण्यानुसारच टॅक्स कट करण्यात आला पण नंतर उत्पादन शुल्क विभागाने लिंबू पाणी हा फळांचा पल्प आहे यावरच जोर दिला. त्याचं कारण ठरलं निंबूज. पेप्सिकोच्या निंबूजला त्यांनी फळांच्या पल्पपासून झालेल्या प्रोडक्टच्या श्रेणीत ठेवलं आणि त्यानुसारचं टॅक्स आकारण्यास सुरवात केली. 

आत्ता सुप्रीम कोर्ट या वादावर एप्रिल किंवा मे मध्ये सुनावणी करुन पडदा टाकेल अशी चिन्ह आहे. 

तुम्ही ही गोष्ट साधी वाटत असेल तर खालील लिंकवर क्लिक करा म्हणजे प्रकरण अजून डिटेल्समध्ये कळेल. 

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.