एका चुकीच्या निर्णयामुळं अभिनेत्रीनं स्वतःचं अख्ख बॉलिवूड करियर संपवून टाकलं

१९४९ सालचा राज कपूर यांचा बरसात पिक्चर आठवतोय. जो राज कपूर  यांनी डायरेक्ट केलेला पहिला सुपरहिट पिक्चर ठरलेला. असं म्हणतात या पिक्चरच्या यशामुळेचं राज कपूर यांना आरके स्टुडिओ खरेदी करता आला. यात राज कपूर यांच्यासोबत नर्गिस मेन लीडमध्ये होती. सुपरहिट ठरल्यामुळे पिक्चरची तर चर्चा होतीच, पण त्याहून जास्त चर्चेचा विषय ठरलेली सेकंड लीड असणारी निम्मी.

निम्मीचं खरं नाव नवाब बानो. पण इंडस्ट्रीत तिला ‘निम्मी’ म्हणूनच ओळख मिळाली. राज कपूर यांनी तिला हे नाव दिलेलं. मूळची आग्र्याची असणाऱ्या निम्मीला लहानपणापासूनचं अभिनयाकडे ओढ होती. कारण तिची आई वहीदान त्यांच्या काळातील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होत्या. 

असं म्हणतात निम्मी कधीच शाळेत गेली नाही.  उर्दू येत होतीचं आणि चित्रपटात काम करताना  इंग्रजी सुद्धा जमायला लागली. दरम्यान एक दिवशी तिची भेट लेखक अली रझा यांच्याशी झाली. रझाने एकदा डायलॉगच्या प्रॅक्टिस दरम्यान निम्मीला मदत केली, ज्यामुळे दोघे मित्र बनले. पुढे या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न केले. 

निम्मीला अभिनयाची आवड असल्याने ती आईच्या ओळखीने छोटे मोठे रोल करायची. पण तिला पहिला ब्रेक मिळाला राज कपूरच्या ‘बरसात’ चित्रपटातून. झालं असं कि, मेहबूब खान हे निम्मीच्या आईच्या ओळखीचे होते. दोघांनीही चित्रपटात एकत्र काम केलेले. या संबंधामुळे त्यांनी निम्मीला त्यांच्या ‘अंदाज’ चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी सेंट्रल स्टुडिओत बोलावले. 

राज कपूर या चित्रपटाचा मेन हिरो होते आणि याच दरम्यान ते आपल्या ‘बरसात’ चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. जेव्हा राज कपूर यांची निम्मीही सेटवर भेट झाली, तेव्हा त्यांनी तिला ‘बरसात’ चित्रपटासाठी ऑफर केली. निम्मीला सुद्धा ही गोल्डन अपॉर्च्युनिटी सोडायची नव्हती. या चित्रपटात सेकंड लीड म्हणून निम्मीला काम मिळालं, जी प्रेमनाथच्या विरुद्ध भूमिका होती.

या चित्रपटातल्या जबरदस्त अभिनयामुळं तिला पुढे अनेक चित्रपटांमध्ये संधी मिळाली. पुढे १९५२ साली आन हा चित्रपट आला. जो फक्त पहिला पूर्ण टेक्निकलर चित्रपटचं नव्हता तर जगभरात प्रदर्शित झालेला पहिला भारतीय चित्रपट होता. लंडनमध्ये या चित्रपटाचं प्रीमियर झालं. ज्यामुळे निम्मी आता हॉलिवूडमध्ये सुद्धा गाजली. तिला हॉलिवूडमध्ये काम करण्याची ऑफर आली, पण तिने नकार दिला. यामागचं एकमेव कारण म्हणजे ती इंटिमेट सीन आणि किसिंग सीन्सला खूप घाबरायची.

निम्मीच्या बॉलिवूड इंडस्ट्रीतली करियरची गाडी सुसाट धावत होती. पण एका चुकीमुळे तीच सगळं करियर उद्ध्वस्त झालं. म्हणजे झालं असं कि, १९६३ साली ‘मेरे मेहबूब’ नावाचा चित्रपट आलेला.  दिग्दर्शक हरमन सिंह रवैल यांनी निम्मीला या चित्रपटात मेन लीडची ऑफर दिली होती. पण निम्मीने मेन लीड सोडून राजेंद्र कुमारच्या बहिणीचा रोल करण्याचा निर्णय घेतला, जी सेकंड लीड होती. आणि तिचा हाच निणर्य तिच्या करियरसाठी श्राप ठरला. 

दिग्दर्शक हरमन यांनी निम्मीचे मेन लीडसाठी मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण निम्मी ऐकायला तयार नव्हती. ती सेकंड लीडच्या निर्णयावरच ठाम राहिली. ज्यानंतर या चित्रपटात साधनाला निम्मीऐवजी मेन लीडसाठी घेण्यात आलं आणि निम्म्मीला तिच्या पसंतीनुसार सेकंड लीडमध्ये ठेवण्यात आलं. 

 मग काय, हा चित्रपट सुपरहिट झाला आणि साधनाच्या करिअरला सुरुवात झाली. पण, या चित्रपटानंतर निम्मीला मात्र मुख्य भूमिका फार कमी मिळाल्या आणि हळूहळू तिचं करियर पूर्णतः संपलं. आता गेल्या २ वर्षांपूर्वीच म्हणजे २५ मार्च २०२० रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी निम्मीचा  मृत्यू झाला.

हे ही वाच भिडू :

 

 

1 Comment
  1. Mithila Subhash says

    प्रेमनाथच्या ‘विरुद्ध’ नाही हो.
    ‘विरुद्ध’ हे तुम्ही केलेलं apposite चं चुकीचं भाषांतर आहे.
    ती प्रेमनाथची नायिका होती. म्हणजे प्रेमनाथच्या समोर.
    भाषेला गांभीर्याने घ्या जरा.

Leave A Reply

Your email address will not be published.