निर्मला सीतारामन यांना चूक दाखवणारा एकच खमक्या माणूस आहे तो म्हणजे त्यांचा नवरा

दिवसाची सुरवात एप्रिल फुल पासून झाली. झालेलं अस की काल भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक निर्णय घोषीत केला. या निर्णयानुसार १ एप्रिलपासून छोट्या बचतींवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

झालं अस की,

आज सकाळी सरकारने हा निर्णय मागे घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

काल झालेल्या निर्णयानुसार बचत खात्यावरील व्याजदर ४ टक्यांवरून ३.५ टक्के, PPF वरील व्याजदर ७.१ टक्यांवरून ६.४ टक्के करण्यात आला होता.

तसेच एका वर्षाच्या कालावधीसाठी बॅंकेत ठेवलेल्या मुदत ठेवीवरचा व्याजदर देखील तिमाहीला साडेपाच टक्यांवरून साडेचार टक्के करण्यात आला होता.

पण आज सकाळी हा निर्णय मागे घेण्यात आला. आत्ता सोशल मिडीयावर चर्चा रंगली ती निर्णय कशामुळे मागे घेतला. नजरचुकीने निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं पण हे कारण नन्नुल्या पोराला देखील पटणार नाही.

दूसरं कारण देण्यात येतय ते बंगालसह इतर राज्यांच्या निवडणूक. या निवडणूका झाल्या की निर्णय घेण्यात येईल असा अंदाज लोकं बांधायला लागलेत.

आत्ता कारण काहीही असली तरी एक गोष्ट मात्र नक्की आहे,

ती म्हणजे एकतर असा निर्णय घ्यायचा नव्हता आणि घेतला तर नोटबंदी सारखा कितीही अंगावर आला तरी ताणून न्यायचा होता. थोडक्यात काय तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण या चुकल्या. पण त्यांना चुकल्या हे सांगणार कोण…?

अशा वेळी तोच माणूस थेट चव्हाट्यावर मांडू शकतो, त्यांच नाव आहे,

“परकला प्रभाकर”

पेशाने अर्थतज्ञ पण कौटुंबिक जिवनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नवरा. परकला प्रभाकर हे आंध्र प्रदेश सरकारमध्ये संचार क्षेत्रासाठी सल्लागार राहिलेले आहे. सध्या हैद्राबादस्थित असणाऱ्या राईटफोलियो कंपनीचे ते निर्देशक आहेत.

निर्मला सीतारामण काही चुकल्या की ती थेट जाहीररित्या त्यांचे वाभाडे पेपरमधून काढत असतात. यापूर्वी त्यांनी द हिंदू मध्ये द लोडस्टार टू स्टिर द इकॉनॉमी नावाचा लेख लिहला होता यात ते काय म्हणलेले ते पाहूया..

१) नेहरूंवर ताशेरे ओढायचे बास करावं नेहरूंना दोष देवून त्यांचे मॉडेल दूस सारण्यात आलं पण त्याला पर्याय काहीच नव्हता. सरकारने नरसिंहराव-मनमोहसिंग यांच्या मॉडेलचा विचार करावा व आर्थिक मंदीच्या वातावरणात राव-मनमोहनसिंग मॉडेल राबवण्यावर भर द्यावा.

२) देशात असणाऱ्या आर्थिक मंदीवर चिंता व्यक्त करत ते म्हणालेत की, एका बाजूला मंदी नसल्याचं सरकार सांगत आहे पण आकडेवारी स्पष्ट सांगते की देशात आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. सार्वजनिक डेटा स्पष्ट सांगतो की एकामागून एक क्षेत्र संकटात येत आहे. पर्सनल कन्झमशन दरात घट आली असून गेल्या १८ तिमाहीतील सर्वांत निच्चाकी संख्येवर हा दर आला आहे.

३) २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत GDP हा पाच टक्यावर आला आहे. गेल्या सहा वर्षातला हा निच्चांक आहे. तरिही देखील अर्थव्यवस्थेवर आपली पकड असल्याचं सांगण्यात येत आहे.

४) ते सांगतात की, सरकारजवळ आर्थिक रोडमॅप नाही. गेल्या काही वर्षात आर्थिक स्थितीवर मोठ्या प्रमाणात संकट येत आहेत. “नेहरूवादी समाजवादी ढांचा” हा भारतीय जनता पक्षासाठी टिका करण्याचा विषय आहे. पण त्यांच्याकडे उत्तर नाही.

जर भारतीय जनता पार्टीसाठी राजकारण म्हणून सरदार वल्लभभाई पटेल हिरो ठरू शकतात तर पक्षभेद विसरून नरसिंहराव देखील हिरो ठरू शकतील.

हे झाले किरकोळ मुद्दे, महत्वाचा मुद्दा म्हणजे परकला प्रभाकर यांचे लेख तुम्ही हुडकून हुडकून वाचा, नवरा बायकोची अशीही भांडण होतात हे पाहून तुम्हाला मज्जा येईल. आत्ता निर्मला बाईंच्या सकाळच्या प्रकरणानंतर सोशल मिडीयात त्यांच्यावर टिका होईलच पण सर्वात इंटरेस्टिंग असणार ते म्हणजे परकला प्रभाकर काय म्हणतात,

बाकी परकला प्रभाकर यांच्यासाठी एक पत्ता :

  • पत्नी पिडीत पुरूष आश्रम.
  • औरंगाबादपासून १२ किलोमीटर मुंबई शिर्डी हायवेवर.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.