आभाळ मारणाऱ्या नित्यानंद बाबांच्यात कोणती ताकद आहे माहिताय का ?

तर आज बातमी आली की दक्षिण भारतात वेगवेगळ्या वादामुळे कायम चर्चेत असणाऱ्यारे नित्यानंद बाबावर आत्ता लहान मुलांना अपहरण केल्याचा आरोप झाला. त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर तो परदेशात पळून गेला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

कर्नाटकमधील जनार्दन शर्मा यांनी 2013 मध्ये आपल्या चार मुलींना नित्यानंद यांच्या शिक्षण संस्थेत दाखल केलं. तेव्हा त्याचं वय 5 ते 15 या दरम्यान होतं. मात्र 2019 मध्ये त्यांना समजलं की, त्याच्या या मुलींना नित्यानंद ध्यानपीठमधून त्याच्या दिल्लीतील सर्वज्ञपीठम या आश्रमात पाठवलेलं आहे.

ते तिथं आपल्या मुलींना भेटायला गेले. मात्र आश्रमाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना भेटून दिलं नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांच्या मदतीनं आश्रमात प्रवेश केला आणि चार पैकी आपल्या दोन मुलींना घेऊन आले. मात्र दोन मुलींनी त्यांच्यासोबत यायला नकार दिला. त्यानंतर शर्मा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 

पोलिसांना नित्यानंद बाबावर गुन्हा दाखल केला असून त्यांनी आपलं गुजरातमधील अहमदाबाद आश्रम चालवण्यासाठी मुलांचं शोषण केलेलं आहे. तसंच त्यांनी हे आश्रम चालवणाऱ्या साध्वी प्राण प्रियानंद आणि प्रियातत्व रिद्धि किरण यांना अटक केलेली आहे.

त्यानंतर नित्यानंद भारतातून पळून गेलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

तर कोण आहे नित्यानंद

नित्यानंद दक्षिण भारतातील लोकांमध्ये प्रसिद्ध असणारा आध्यात्मिक गुरू आहे. तो स्वत:ला भगवानाचा अवतार समजतो. त्याच्या सुरूवातीच्या जीवनाबद्दल फारसं माहित नाही. मात्र त्याच्या सोशल मि़डीयाच्या प्रोफाईलनुसार नित्यानंदचा जन्म 1978 सालाचा आहे. त्याने मेकीनिकल इंजिनीअरींगचं शिक्षण घेतलं आहे लहान पणापासून त्याला अध्यात्माची ओढ होती.

म्हणून तो 22 व्या वर्षी तामिळनाडूमधील मदुराई अधिनाम नावाचा 1500 वर्षे आश्रमात गेला. तीथं साधना करायला लागला. त्यामुळे हळुहऴु त्याचे भक्त वाढायला लागले. त्याचे प्रवचन ऐकण्यासाठी गर्दी व्हायला लागली. इंग्रजी भाषेवर असणारं त्याचं प्रभुत्व, चेहऱ्यावरचे शांत भाव, बोलण्यात एक सौम्यपणा.

डोक्यावर बांधलेल्या लांबलांब जटा, पांढर केलेलं कपाळ आणि त्यावर लावलेला उभा गंध. गळ्यात घातलेल्या रूद्राक्षाच्या माळा आणि डोक्यावर भरजरीत टोप. अंगावर भगवे कपडे, सोनेरी किंवा चांदी कलरचं भलमोठं आसन. हातात काठी.

त्यामुळे त्याच्याकडे भक्तांचा ओढा वाढला. आपल्याकडे दैवी शक्ती आहे. हे तो भक्तांना सांगू लागला. आपल्या शक्तीनं लोकांना हवेत उचलू शकतो अशी दोन- तीन प्रात्यक्षिकही त्याने दाखवली. त्यामुळे संपुर्ण दक्षिणेत त्याची ख्याती पसरली. परदेशातही त्याचे भक्त झाले. तिथं प्रवचन व्हायला लागली. त्यामुळे मदुराई आश्रमाचा उत्तराधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली.

नित्यानंदची ख्याती वाढली होती. त्याचे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी भक्त झाले होते.

मात्र 2010 साली त्याच्यी एक सेक्स क्लिप व्हायरल झाली. त्या क्लिपमध्ये एक तामिळ अभिनेत्री नित्यानंद बाबासोबत खोलीत दिसत होती. ती क्लिप व्हायरल झाल्यानंतर नित्यानंदचे धाबे दणाणले. त्याच्यावरचा भक्तांचा विश्वास उडाला. त्याच्याविरोधात लोकांनी मोर्चे काढले.

मात्र, नित्यानंदानी हे सगळे आरोप फेटाळून लावले. या क्लिपमध्ये छेडछाड केली आहे. मी असं काही करूच शकत नाही, कारण मी नपुसंक आहे, अशी कबुलीही त्याने दिली.

प्रकरण कोर्टात गेलं. त्या क्लिपची फाँरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करण्यात आली. आणि ती क्लिप खरं असल्याचं कोर्टानं सांगितलं त्यामुळे नित्यानंदला तब्बल 52 दिवस जेलमध्ये जावं लागलं.

त्यांनंतर 2012 मध्ये भारतीय वंशाची असणाऱ्या एका महिलेने बलात्कार आणि यौन शोषणाचा आरोप नित्यानंद यांच्यावर केला. माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरलं. त्यामुळे नित्यानंद यांचा ढोगींपणा जगासमोर आला. त्यांचा मदुराई आश्रमाच्या उत्तराधिकारी पदावरून हटवलं गेलं. 

मात्र, काही काळानंतर हे प्रकरण शांत झालं. नित्यानंद पुन्हा आध्यात्मिक मार्गाला लागले. लोक पुन्हा भक्तीभावानं जोडले गेले. त्याचा उदोउदो करायला लागले. मात्र त्याचे हे काळेधंदे सुरूच होते. त्याच्या अनोख्या बोलण्यानं ते नेहमीच माध्यमांच्या चर्चेत राहिले. त्यांनी आपल्या प्रवाचनातून विज्ञानाला सु्द्धा मागं टाकलं होतं.

ते फिजिक्स विषयांवर तोंडभरून बोलायचे. मी माणूस नसून एक नवीन प्रजाती आहे, असं ठासवायचे. हिंदूधर्माच्या रक्षणासाठी मी आलोय आणि हिंदूंचा उद्धार करणार आहे, असं भासवायचे. त्याचे भक्त हे सगळं एकाग्रतेने ऐकायचं. त्याचं तोंडभरून कौतुक करायचे.

मात्र, सध्या हे नित्यानंद बाबा गुन्हा दाखल होताच परदेशात फरार झालेत. त्याच्यावर या अगोदर बलात्कार करणे, धार्मिक भावना भडकावणे. फसवणुक करणे, असे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे बुबा- बाबांच्या नादाला लागणाऱ्यांनी जरा जपून रहावा.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.