एक नेता सतत म्हणत असायचा “देशावर वीज संकट येऊ शकतं”

आपण गेल्या काही दिवसापासून राज्यावर आणि देशावर वीज संकट आलं असं ऐकत आलो आहोत. देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकटाचे ढग अधिक गडद होतांना दिसतंय. कोळशाच्या पुरवठ्याअभावी देशातील बहुतांशी भाग अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातील अनेक उत्पादन केंद्रांची अवस्थाही चांगली नाही.

देशातील कोळसा तुटवड्यामागे अनेक कारणं सांगितली जात असतील पण इतिहासात देखील असचं संकट देशावर आलेलं. पण या संकटातून वाचवलं एका नेत्याने !

त्यांचं नाव म्हणजे एन.के.पी. साळवे.

राजकारण हे जातीच्या आणि धर्माच्या चौकटीच्या बाहेर जाऊन देखील करता हे एन.के.पी. साळवे यांच्याकडे पाहून समजतं. सुसंस्कृत राजकारणी कसा असावा याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नरेंद्रकुमार प्रसादराव साळवे. पण त्यांना सर्व त्यांना एन.के.पी. साळवे म्हणूनच ओळखतं. साळवे म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हंटल तरी चालतंय कारण त्यांना जवळपास क्रीडा, साहित्य, संगीत आणि राजकारण या सर्वच क्षेत्रातलं ज्ञान आहे.

ते मुळचे तसे मध्य प्रदेशातील छिंदवाडा गावाचे. छिंदवाडा भागात त्यांच्या खानदानाचं मोठं नाव होतं. पण शिक्षणासाठी म्हणून नागपूरला आलेले एन.के.पी. शेवटी नागपूरकरच झाले. बरं मूळ जरी मध्य-प्रदेश असेल तरी त्यांनी आपल्या जीवनात नागपूर आणि विदर्भाला आपलंसं करून घेतलं. राज्याच्या राजकारणात तर त्यांना एक कट्टर विदर्भवादी म्हणून ओळखायचे.

नागपुरात शिक्षण पूर्ण करून साळवे चार्टर्ड अकौंटंटची पदवी घेऊन पुढे त्याच व्यवसायात पडले. १९४९ ते १९८२ या काळात ते याच व्यवसायात होते. सीए असल्यामुळे त्यांचा संपर्क देशातील अनेक बड्या लोकांशी आला. मग ते राजकारण असो वा मग उद्योग, चित्रपट असो वा क्रीडा क्षेत्र असो. अनेक मोठ-मोठ्या लोकांचे ते  ‘सीए’ म्हणून ते कार्यरत होते.

ते विध्यार्थीदशेत असतांना कॉंग्रेसवासी झाले ते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ते कॉंग्रेसचे कट्टर समर्थक होते.

सीए म्हणून कार्यरत असतांना ते इंदिरा गांधी यांच्या संपर्कात आले अन कायमचेच ते इंदिरावादी राहिले.

हळूहळू ते व्यवसाय बाजूला ठेवत राजकारणात आले आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास सुरु झाला तो थांबलाच नाही. १९६७ मध्ये त्यांना मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचे कॉंग्रेसकडून तिकीट मिळाले आणि सहज जिंकून देखील आले. लोकसभेनंतर ते सलग १९७८ ते २००३ पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यानंतर राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास होता. त्यांनी त्यांच्या कारकीर्दमध्ये कोळसा, ऊर्जा आणि पोलाद यासारखी महत्त्वाची खाते त्यांच्याकडे होते. उर्जा आणि पोलाद खात्यात कार्यरत असतांना त्यांनी अनेक संकल्पना समोर आणल्या. पोलाद आणि उर्जा सारख्या क्षेत्रात गुंतवणूक झाली पाहिजे म्हणून एन.के.पी. साळवे यांचा आग्रह होता.

पण संपूर्ण राजकीय कारकीर्दमध्ये डाग एन.के.पी. साळवे यांच्या चारित्र्यावर भ्रष्टाचार अथवा अन्य कुठलाही आरोप लागला नव्हता. 

एक दिवस देशाला विजेच्या संकटाला तोंड द्यावं लागेल असं साळवे तेंव्हाच बोलून गेले होते.

ते सतत म्हणत असायचे कि, जोपर्यंत मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत नाही तोपर्यंत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देता येणार नाहीत. अन जर पायाभूत सुविधा नसतील तर मग उद्योगविस्तार होणार नाही. आणि अशामुळे आपल्या देशावर विजेचं संकट येणार हे मात्र नक्की.

आणि याच विजेच्या संकटामुळे देशामध्ये कृषी उत्पादन घटेल. आणि परिणामी याचा फटका सामान्य वर्गाला आणि शेतकरी वर्गाला बसेल अशी भीती ते कायमच व्यक्त करत असत. त्यांचं हे मत दाखवून देतं कि, त्यांची विचार करण्याची क्षमता किती अफाट आणि दूरदृष्टीकोनाची होती. देशाच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मंत्रालयात ते कार्यरत असतांना त्यांनी ऊर्जा क्षेत्रात खासगी आणि परदेशी गुंतवणूक हे साळवी यांच्या धोरणाचेच फळ आहे.

तसेच एन्रॉन प्रकल्प देखील त्यांचीच संकल्पना होती. पण आपले दुर्दैव म्हणजे हा एन्रॉन प्रकल्प आपल्या राज्यातील राजकारण्यांनी समुद्रात बुडवला आणि आपल्या महाराष्‍ट्राला अंधारात लोटले!

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.