१९८३ पासून या देशात एकही मुल जन्माला आलेलं नाही

व्हॅटिकन सिटीमध्ये क्रिसमसचं सेलिब्रेशन एका खास अंदाजात पहायला मिळतं. कारण हा देश ख्रिश्चन धर्मीय लोकांचं सगळ्यात मोठं पवित्र स्थळ असलेलं ठिकाण आहे.

म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं चर्च सेंट पीटर्स बेसिलीका व्हॅटिकन मध्ये आहे. आणि रोमन कॅथलिक धर्माचे सर्वेसर्वा पोप यांचं निवास्थान सुद्धा इथंच आहे. आणि याच कारणांमुळे व्हॅटिकनला स्वतंत्र देशाचा  मिळालाय. इथे राजेशाही चालते.

पण भिडू यासोबतच या देशामध्ये अशा काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्यामुळे तो इतरांपेक्षा नक्कीच एक वेगळा देश ठरतो.

सगळ्यात आधी बोलायचं झालं तर, व्हॅटिकन सिटी हा जगातला सर्वात छोटा देश आहे. त्याचं क्षेत्रफळ फक्त ४४ हेक्टर आहे. म्हणजे त्यापेक्षा मोठ्या तर आपल्या देशातल्या गल्ल्या आहेत. आणि लोकसंख्या विचाराल तर फक्त ८००. आणि ही  सगळी ८०० लोक कॅथलिक आहे.

आता तुम्ही म्हणाल काहीही काय पण भिडू ही गोष्ट खरीये. तशी तिथं राहणारी मंडळी भरपूर आहेत पण नागरिकत्व असलेली फक्त ८०० चं जण आहेत. आणि त्याहून धक्कादायक बाब अशी कि या ८०० लोकांमध्ये महिलांची संख्या  फक्त ५ टक्के आहे, म्हणजे फक्त ३० महिला या देशाच्या नागरिक आहेत. आणि या ८०० लोकांपैकी ४०० लोक हे शहरात राहतात, तर बाकी ४०० हे राजकीय सेवेत बाकीच्या देशांमध्ये आहेत.

या परिस्थितीमागची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथलं नागरिकत्व. आता कसं ना कुठल्याही देशाचं नागरिकत्व कसं मिळत तर आपण तिथे जन्म घेतला तर आपल्याला त्या देशाचं नागरिकत्व मिळून जातं. पण या देशात नागरिकत्व जन्मानुसार नाही तर आपल्या नोकरीच्या आधारावर मिळत. हे नागरिकत्व मिळवण्याची महत्वाची अट म्हणजे तुम्ही ख्रिश्चनचं असले पाहिजे. आणि तुम्ही नोकरी सोडली तर तुमचं नागरिकत्व सुद्धा जात.

व्हॅटिकनमधली लोकसंख्या कमी असण्याचं धक्कादायक कारण म्हणजे १९८३ पासून आतापर्यंत इथंही एकही बाळ जन्माला आलं नाही. म्हणजे युनिसेफच्या अहवालानुसार जर आपण भारतात पाहिलं तर दिवसाला ६७ हजारांच्या आसपास मुलं जन्माला येतात. आणि व्हॅटिकनमध्ये गेल्या ३८ वर्षांपासून एकही मुलं जन्माला आलं नाहीये.

आता यामागे तीन कारण आहेत. एक म्हणजे या अख्ख्या देशात एकही हॉस्पिटल नाहीये. दुसरं म्हणजे महिलांची कमी संख्या आणि तिसरं महत्वाचं म्हणजे धार्मिक कारणांमुळे इथले पुरुष लग्नच करत नाहीत.

आता जसा हा जगातला सगळ्यात छोटा देश आहे. त्याचप्रमाणे या देशाची मिलिट्री सुद्धा जगातली सगळ्यात छोटी मिलिट्ररी आहे. म्हणजे व्हॅटिकन सिटी, त्यांचा प्रमुख असलेले पोप आणि त्यांचा महालाच्या सुरक्षेसाठी फक्त १३० स्विस गार्ड आहेत. महत्त्वाचं म्हणजे  हे गार्ड स्वित्झर्लंडच्या सैनिकांमधून निवडले जातात. आणि त्यांचं रोमन कॅथलिक असणं खूप गरजेचं आहे. त्यांचं वय १९ ते ३० दरम्यानचं असलं पाहिजे. आणि त्यांची उंची ५ फूट ८ इंच असली पाहिजे.

या देशात कुठल्याही प्रकारचे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही.  फक्त तीनशे मीटर लांब एक रेल्वे ट्रॅक आहे. आणि फक्त एकचं रेल्वे स्टेशन आहे. आणि हाईट म्हणजे या रेल्वेने लोक प्रवास करत नाही तर फक्त माल वाहून नेला जातो. तसचं या देशात फक्त एकच हेलीपोर्ट आहे.  जिथून हेलिकॉप्टर उड्डान घेतात. 

या देशात काही बंधने सुद्धा आहेत. जसं की, महिला असो वा पुरुष  दोघांना स्टेट ड्रेस कोड आहे.  इथं बायका स्लीवलेस, मिनी स्कर्ट किंवा शॉर्ट्स घालू शकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे पुरुष आणि महिला दोघांचेही गुडघे झाकलेले असावेत.

एवढा छोट्या देशात मात्र दारू पिणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. वाईन इन्स्टिट्यूटच्या नुसार इथला प्रत्येक नागरिक दरवर्षी ५४.२६ लीटर दारू पितो. म्हणजे प्रत्येक नागरिक वर्षाला ७५ बॉटल वाईन पितात. इथं एकचं सुपरमार्केट आहे. जिथून लोक वाईन  खरेदी करू शकतात. आणि इथं मिळणारी दारू ही टॅक्स फ्री आहे.

आता एवढा छोटा  जगावेगळा देश असला तरी सुद्धा इथं सुविधांची कमतरता नाही.  म्हणजे पार  पासपोर्ट लायसन्स पासून  पोस्ट ऑफिस ते  रेडिओ स्टेशन पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.