आजवर कुठल्याही राजवटीला अफगाणिस्तानवर दीर्घकाळ वर्चस्व गाजवता आलेलं नाही…

जगात अनेक देश आहेत आणि प्रत्येक देशाला काहीतरी इतिहास आहे. निर्मितीपासून ते विनाश होण्यापर्यंतचा असो किंवा उत्कर्ष होण्याचा असो प्रत्येक देशाचा इतिहास वेगळा आणि आश्चर्यकारक असतो.

अनेक देश हे बरीच वर्ष गुलामगिरीच्या साखळदंडात वाढले तर काही देशांवर जबरदस्तीने कब्जा करून त्या देशांवर राज्य गाजवण्यात आलं. या सगळ्यांपेक्षा एक असा देश होता ज्यावर कुणी राज्य करू शकलं नाही.

त्याच नाव म्हणजे अफगाणिस्तान

अफगाणिस्तान हा असा देश होता ज्यावर अनेक लोकांनी हक्क गाजवण्याचा प्रयत्न केला सगळ्यांच्याच हाती निराशा लागली. अफगाणिस्तानला साम्राज्यांचं स्मशान म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. आता मागच्याच काही वर्षांची गोष्ट १९९० पासून अफगाणिस्तानमध्ये अशा घटना घडत राहिल्या त्यावरून अफगाणिस्तानला  

Graveyard of Empires

म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

अफगाणिस्तानची गणती त्या देशांमध्ये होते ज्याने अनेक युद्धे बघितली आणि बऱ्याच युद्धांचा साक्षीदार म्हणून अफगाणिस्तानला ओळखलं जातं. इतिहासकारांच्या मते तुमचा देश कितीही ताकदवर असो पण या देशावर राज्य करू शकत नाही. अनेक राजे महाराजे, सुलतानी राजवटींनी अफगाणिस्तानवर  प्रयत्न केला पण यात या सगळ्या राजवटींना अपयश आलं. 

मोठमोठी युद्धे याच अफगाणिस्तानच्या घडली. युद्धामध्येही मिळाला तरी अफगाणिस्तानवर राज्य करण्याचं अनेक लोकांचं स्वप्न धुळीस मिळालं. सोव्हिएत संघ, ब्रिटिश शासनापासून ते अमेरिकेनेसुद्धा इथून पळून जाण्यातच धन्यता मानली. अफगाणिस्तानमध्ये लोकं स्थानिक शासनाच्या मदतीने आपला कारभार चालवतात पण विदेशी राजवटींसोबत हातमिळवणी करायला नकार देतात.

या देशावर कोणाचंही शासन चाललं नाही याची बरीच कारणं आहेत. अफगाणिस्तानमध्ये कुठल्याही बाहेरील शासकांचं काम चालणं मुश्किल नाही तर अशक्यच आहे. कारण या देशात असलेली विविधता. अफगाणिस्तान हा देश मध्य आशिया, इराण आणि भारतामधल्या मुख्य जमिनीवर स्थित असलेला देश आहे. या देशावर अनेकदा हल्ले झाले, मोठमोठे युद्ध झाले यामुळे या देशात विविध जनजाती तयार झाल्या. आजही अनेक विविधता असलेले लोक या देशात राहताना दिसतात. 

आजही अनेक ठिकाणाहून या देशात दहशतवाद फोफावत चालला आहे. तालिबानी संघटना, वाढत चाललेला हिंसाचार या घटनांमुळे अफगाणिस्तानसारखा देश बदनाम होत राहिला. कायम होत असलेल्या युद्धांमुळे,गोळीबारांमुळे अफगाणिस्थानमध्ये घरांच्या रचना आणि गावांच्या रचना या किल्ल्याच्या स्वरूपात झालेल्या आहेत. जीव मुठीत घेऊन वावरणारे नागरिक या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार आहेत.

अफगाणिस्तानमध्ये मानवी जीवनासाठी अनुकूल अशी भौगोलिक परिस्थिती नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीचा असलेला अभाव अशा अनेक कारणांमुळे अफगाणिस्तानमध्ये विरळ लोकसंख्या आढळते. ज्या ज्या वेळी अफगाणिस्तानमध्ये युद्ध झाले त्या त्या वेळी मोठ्या प्रमाणात सैनिकांना आपले प्राण द्यावे लागले. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या युद्धात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व्हायची. 

आज घडीला अफगाणिस्तानमधून अमेरिकी सेनासुद्धा माघारी गेली आहे. तालिबानी संघटनांनी देशाच्या अनेक ठिकाणांवर कब्जा केला आहे. १८९३ ते १९१९ पर्यंत या काळात ब्रिटिश शासनाच्या वेळी तीन युद्ध घडली. ज्या ज्या वेळी अफगाणिस्तानमध्ये युद्ध घडली त्या त्या वेळी नवनवीन लोकांची तिथे वस्ती निर्माण होऊन तिचा पुढे विस्तार झाला.

हिंदुकुश पर्वत, पामिर, तियांशान, कुनलून आणि हिमालय अशा पर्वतांमध्ये आणि बर्फाळ वातावरणात हा देश वसलेला आहे त्यामुळे या देशावर हुकूमत अजूनही कोणी गाजवू शकलेलं नाही. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.