मुली नो शेव्ह नोव्हेंबर कॅम्पेन सेलिब्रेट करत नाहीत त्यामागे एक कारण आहे.

नोव्हेंबर महिना संपत आलाय …नोव्हेंबर म्हणलं कि, नो शेव्ह नोव्हेंबरची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. खासकरून सोशल मीडियावर ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणून स्पर्धा देखील चालतात…..कॉलेजची पोरंसोरं भल्या लांबलचक दाढ्या ठेवून हॅशटॅग #नो शेव्ह नोव्हेंबर चालवतात.

मात्र, अनेकजणांना या हे माहितीच नाही कि या मोहिमेमागे काय कारण आहे, नोव्हेबर महिन्यात शेव्ह का केली जात नाही ? याचा इतिहास काय आहे.

नो शेव्ह नोव्हेंबर हा ट्रेंड फक्त एंटरटेनमेंट म्हणून राबवला जात नाही. तर हा ट्रेंड कर्करोगाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राबवली जातो. ही कन्सेप्ट अमेरिकेच्या मॅथ्यू हिल फाउंडेशनची आहे. थोडक्यात कर्करोगाच्या उपचारादरम्यान रुग्णांचे केस गळतात. त्यांच्याबद्दल त्यांना आधार देण्यासाठी ही मोहीम २००९ पासून सुरू करण्यात आली आहे. 

थोडक्यात नोव्हेंबर महिन्यात लोकं दाढी करत नाहीत किंवा केस कापत नाहीत….आणि हे न करून  वाचलेले पैसे कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी दान म्हणून दिला जातात.

#नो शेव्ह नोव्हेंबर या ट्रेंड द्वारे काही मुलं वाढलेल्या दाढीमध्ये फोटो पोस्ट करतात मात्र या ट्रेंड मध्ये आपल्याला मुली दिसत नाहीत. बरं मुलींच्या शरीरावर केस वाढलेले किंव्हा खूप जास्त दाढी आलेले   फोटो कधी पाहिलेत का ?? इंटरनेटवर सर्च माराल तर काही बिनधास्त पोरी भारतातल्या अपवादच म्हणायला लागेल पण फॉरेनच्या पोरी नक्कीच सापडतील…..असा प्रश्न तुमच्याही डोक्यात आलाच असेल कि, फक्त विचारायला गेला नसाल…

मूळ मुद्दा म्हणजे मुली #नो शेव्ह नोव्हेंबर का सेलिब्रेट करत नाहीत ?

खरं तर #नो शेव्ह नोव्हेंबर हे कॅम्पेन जेंडर बेस्ड नाहीये..म्हणजे त्यात कुणीही सहभागी होऊ शकते. सोप्पंय महिनाभर शरीराचे केस वाढवायचे, दाढी करायची नाही…मुलींनी देखील हाता-पायाचं वॅक्स करायचं नाही…आणि यातून वाचवलेले पैसे कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत म्हणून द्यायचे..बस एवढं सोपं आणि उपयोगी हा ट्रेंड आहे.

आता मुलींच्या सहभागाची गोष्ट बोलायची तर, मुलींच्याही अंगावर केस येतात. मिशीचे केस म्हणजेच वरच्या ओठांवरचे केस ज्याला अप्परलिप्स/ ब्लीच म्हणलं जातं. तुमच्या आमच्या मैत्रिणी देखील दर महिन्याला त्यांच्या शरीराचे आणि चेहऱ्याचे केस देखील दाढी करतात किंवा काढतात….म्हणजेच आयब्रोज, अप्परलिप्स, वॅक्स, अंडरआर्म्स केली जातात अन यासाठी दर महिन्याला जवळपास हजार रुपयेपर्यंत खर्च लागतो….असो मग या ट्रेंडमध्ये मुलींचे फोटो का दिसत नाहीत?

आपण मुलांच्या मिशा, हात-पायांचे केस किंवा छातीचे केस पाहण्याची सवय असते. त्यामुळे त्यांचे केस बघायला फारसे काही वाटत नाही, कारण एक पक्का समज असा झालाय कि, अशी वाढलेली दाढी वेगेरे असलेले मुल माचो मॅन दिसतात. मर्द वाटतात. हॉट लुक दिसतो. आपण लागलीच असा समज करतो कि,  मुलांचे केस पुरुषत्वाशी संबंधित असतात. 

टीनेजमध्ये जर मुलांना लवकर दाढी, मिशी आली नाही तर कुणीही उठसुठ त्याला ‘कवळे’ म्हणून चिडवतात..जसं कि मुलींना ‘कवळी काकडी’ म्हणून बोललं जातं.

असो तर मग पुरुषांना वाढलेल्या दाढीत पाहून त्यांना माचो मॅन म्हणलं जातं पण तेच जर का मुलींच्या दाढीचा आणि हाता-पायावरच्या केसांचा विचार केला जातो, तेव्हा हे केस अस्वच्छ किंवा पुरुषी मानलं जातं.

मुलीच्या चेहऱ्यावर जरासे केस जरी वाढले तरी तिला अगदी सहज म्हणलं जातं, आग जरा जा जाऊन ये ब्युटी पार्लरमध्ये…मुलींचे तिचे हात पाय गुळगुळीत असावेत.  तिच्याकडे असं पाहिलं जातं जसं काय तिने स्वतःच ते केस वाढवलेत. 

 जर एखादी मुलगी वनपीस किंव्हा स्कर्ट घालून जर गेलीच तर तिला वॅक्सिंग करायला सांगितलं जातं.

तिला मग ज्ञान दिल जातं कि, कसं वाढलेल्या केसांत ती कुरूप दिसतेय, वॅक्स, अंडरआर्म्स नाही केले तर तेथील केस कसे अस्वच्छ असतात, केसांमध्ये जंतू राहतात…अशा गोष्टी सांगितल्या जातात.

हे झालं चेहऱ्यावरच्या केसांबद्दलच…मुलींना आठवत हि नसेल कि त्यांनी कधी चुकुनही अंडरआर्म्स न करता स्लीव्हलेस ड्रेस घातला असेल. म्हणजे आज कोणते कपडे घालायचे हे मुलींच्या वॅक्स करण्यावर आणि न करण्यावर डिपेंड असते. वॅक्स केल्याच्या एक आठवडा स्लीव्हलेस, स्कर्ट, वनपीस आणि मग हळूहळू फुल कपडे घालण्यावर पोरी येतात. 

मागे एकदा टीएमसीची खासदार नुसरत जहाँने सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्यात तिचे वाढलेले अंडरआर्म्स दिसत होते..आता मूर्ख लोकं त्यावरहि ऑफेंड झाले होते कि, हि बाई किती घाण राहते इत्यादी. याच मूर्ख लोकांना जेंव्हा अनिल कपूर, अक्षय कुमार अन सिद्धार्थ मल्होत्रा सारखे हिरोचे फोटो जेंव्हा वाढलेल्या अंडरआर्म्समध्ये दिसतात तेंव्हा त्यांना गलिच्छपणा दिसत नाही. तेंव्हा त्यांना हेच हिरो माचो मॅन किंव्हा हॉट वाटतात.

काही मुलींनी यावर असंही मत दिलं कि, बॉडी हेअरमुळे काही ट्रोल हि होतात तेंव्हा याच मुली एकमेकांना त्यांच्या गोष्टी अन अनुभव शेअर करतात….काही मुली एकदाही वॅक्स न करता फ्रॉक घालतात. त्यावर त्यांना चिडवलं जातं….टोमणे दिले जातात. तर काहींना गुळगुळीत हात आणि पाय असलेल्या मुली अधिक आकर्षक दिसतात. शरीरावरील केस ठेवणाऱ्या मुली लोकांना अस्वच्छ वाटतात….

असं असेल तर मग तुम्ही सांगा मुली महिनाभर अंगा-तोंडावर केसं वाढवून नो शेव्ह नोव्हेंबर मध्ये का भाग घेतील ???

आणखी एक इंटरेस्टिंग म्हणजे नो शेव्ह नोव्हेंबर मध्ये भाग न घेणाऱ्या मुली मात्र नो वॅक्स विंटर सेलिब्रेट करतात…पण का ???

आता यामागे काही इतिहास नाहीये…त्याचं सरळ सोपं कारण म्हणजे हिवाळ्यात आपल्याला अंगभर  हातभार कपडे घालावे लागतात. त्यामुळे अंगावर वाढलेले केस कोणालाच दिसत नाहीत. स्कर्ट अन वनपीस घालायची वेळच येत नाही. आणि त्याचं आणखी एक कारण म्हणजे हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे वॅक्सिंग करून त्वचा आणखी रुक्ष करण्याऐवजी न केलेलं बरय म्हणून मुली वॅक्स करत नाहीत. 

हिवाळा असो वा उन्हाळा असो कोणत्याही प्रकारच्या सामाजिक दबावाखाली न येता वॅक्स टाळायची इच्छा असेल तर टाळा लोकांचं काय…लोगों का काम हैं केहेना…

तुमच्यापैकी काही मुलींना, तुमच्या मैत्रीणीना या ट्रेंड मध्ये सहभागी व्हायचं असेल. #no_shave_Nov सोबत सोशल मीडियावर तुमच्या वाढलेल्या हाताच्या, पायावर आलेल्या केसांचा फोटो तसेच वाढलेल्या अप्परलिप्स, आयब्रोजमध्ये तुम्ही तुमचे फोटो पोस्ट करू शकता..अगदी बिनधास्तपणे !!!! 

 

Leave A Reply

Your email address will not be published.