नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या ग्रॅबियल यांनी इंदिरा गांधींच्या नावावरून आपल्या मुलीचं नाव ठेवलेलं

देशाच्या पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या राजकारणात महिला नेतृत्वाची खरी सुरुवात झाली ती इंदिरा गांधी यांच्यापासूनच. नेतेमंडळींच्या स्पर्धेत एक महिला देशाचे सर्वोच्च पद भूषवतेय, ही गोष्ट त्यावेळी अनेकांना खटकायची, पण इंदिरा गांधी यांनी या सगळ्या गोष्टींचा कधीही चुकीचा परिणाम आपल्यावर होऊ दिला नाही.

भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा कार्यकाळ आणीबाणीमुळे जरी वादग्रस्त ठरला तरी त्यांच्या कामाची छाप बऱ्याच जणांवर होती. देशातच नाही तर देशाबाहेरही  त्यांचा प्रभाव होता. त्यातलंच एक नाव म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्केझ. 

कोलंबियात जन्मलेले गॅब्रिएल गार्सिया मार्केझ एक प्रसिद्ध लेखक होते.  ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ आणि ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ यासारख्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या कादंबर्‍यांसाठी ते खासकरून ओळखले जातात. त्यांनी बऱ्याच चित्रपटांच्या कथाही लिहिल्यात.  साहित्यातल्या त्यांच्या या योगदानामुळेच १९८२ साली त्यांना सर्वोच्च अश्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

गॅब्रिएल यांच्याबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणजे ते भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मोठे चाहते होते. असं म्हणतात कि, जेव्हा गॅब्रिएल यांना साहित्यातला नोबेल पुरस्कार मिळाला, तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी या पहिल्या व्यक्ती होत्या ज्यांनी गॅब्रिएल यांना फोन करून अभिनंदन केले होते. 

गॅब्रिएल नेहमीच चर्चित असणाऱ्या चेहऱ्यांपैकी एक होते. पण मृत्यूनंतर सुद्धा त्यांची चर्चा कायम राहिली ती त्यांच्या लाईफमधल्या एका सिक्रेटमुळे. एक असं सिक्रेट जे त्यांच्या बरोबर त्यांच्या घरच्यांनी सुद्धा त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम ठेवलं. त्यांच्या मृत्यू २०१४ साली झाला, त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये त्यांच्या सिक्रेट लाईफचा उलगडा झाला.  

ब्रिटनमधल्या एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, १९९० च्या दशकात नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रिएल यांचे मेक्सिकन लेखिका सुझाना काटोसोबत एक्सटर्नल अफेअर होत. त्यांच्यापेक्षा ३३ वर्षांनी लहान असलेल्या सुझाना काटोसोबत त्यांनी दोन चित्रपटांच्या स्क्रिप्टवर काम केलं होत. तेव्हाच त्यांच्यात जवळीक वाढली. त्यांच्या या संबंधातून दोघांना एक मुलगी सुद्धा झाली, जिचे नाव त्यांनी ‘इंदिरा’ असं ठेवलं होत.  

पण इंदिरा काटोच्या जन्माच्या वेळी, गॅब्रिएल गार्सिया मार्केझ आपली पत्नी मर्सिडीज बर्चा हिच्यासोबत वैवाहिक जीवनात जगत होते. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झालेली आणि त्यांना मुलेही होती. पण गॅब्रिएल आणि सुझाना यांच्या संबंधाबाबत कोणालाही माहिती नव्हतं.  

दरम्यान, गॅब्रिएल आणि सुझाना यांची मुलगी इंदिरा काटो आता मेक्सिको सिटीमध्ये डॉक्युमेंटरी निर्माता आहे. तिने वडिलांच्या ऐवजी आपल्या आईचे नाव लावले आहे. इंदिरा काटोला २०१४ मध्ये मेक्सिकोमधून जाणाऱ्या स्थलांतरितांवर बनवलेल्या माहितीपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

हे ही वाच भिडू : 

 

Leave A Reply

Your email address will not be published.