नॉनस्टिक भांडी वापरल्यामुळे होऊ शकतात हे रोग.

आजच्या काळात तंत्रज्ञानामुळे गोष्टी बदलत आहेत, पण आधुनिक गोष्टींचे दुष्परिणाम ही आहेत. आता लोक त्यांच्या घरातील सामान्य भांद्याऐवजी नॉन-स्टिक वापरत आहेत. या भांड्यानमध्ये, अनेक प्रकारचे केमिकल्स वापरले जातात,  जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. आपण सरास  डोसा नॉन-स्कीट तव्यावर बनवतो.

पण यातून होणाऱ्या हानीची माहिती आपल्याला नाही.

नॉन-स्कीट भांद्यांमुळे होणारे आजार बहुतेक करून गर्भवती महिला आणि मुलांमध्ये होतात. नॉन-स्टिक भांड्यांमध्ये पीएफओ नावाचे रसायन असते. हे थायरॉईड पातळी कमी करतात, त्यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास थांबतो, अस सांगितल जातं.

 

पॅन्क्रेटाइटिस, यकृत आणि टेस्टिकुलर कर्करोग, कॉलिटीस, गर्भधारणेमध्ये हायपरटेन्शन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. नॉनस्टिक भांद्यांमुळे शरीरात आयर्नची  कमतरता होऊ शकते ज्यामुळे हाडे दुर्बल होऊ शकतात.

जेव्हा नॉनस्टीक कूकवेअरचे कोटिंग बाहेर येते किंवा जेव्हा त्यात स्क्रॅच पडतात तेव्हा अन्न शिजवल्यावर उष्णतेमुळे त्यातील विषारी द्रव्य अन्नात मिसळतात. यावर उपाय म्हणून सध्या तव्यावर थोडे मीठ घाला आणि दोन मिनिटे गरम करा त्याने निर्माण होणारी पोत नॉन स्टिकसारखी काम करेल.

हे आपल्या आरोग्यासाठी चांगले असेल आणि अन्न तयार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.