भारताला पहिलं ऑलम्पिक मेडल जिंकवून देणारा पुढे जाऊन हॉलिवूडचा फिल्मस्टार बनला….

ऑलम्पिक स्पर्धा या इतर सगळ्याच खेळांपेक्षा एक विशेष महत्व असलेल्या. देशाला मेडल जिंकून देण्यासाठी विविध खेळांमधून खेळाडू प्रयत्न करत असतात. भारत सुद्धा या स्पर्धेत आधीपासून सहभागी होत आहे. पूर्वीच्या तुलनेत आजच्या काळात भारत या स्पर्धाना जास्त महत्वाचं मानतो आणि त्यानुसार वाटचाल सुद्धा करतो. तर आजचा किस्सा अशा एका खेळाडूचा आहे ज्याने भारताला पहिलं ऑलम्पिक मेडल जिंकून दिलं.

१९२० साली भारताचा एक गट ऑलम्पिक स्पर्धेसाठी पाठवण्यात आला होता. जेव्हा देशाचे मोठे आणि प्रमुख उद्योगपतींपैकी एक असलॆले दोराबजी टाटा यांच्या समितीने भारतातून ५ ऍथलिट लोकांना या ऑलम्पिक स्पर्धेसाठी पाठवले होते. ते पाच खेळाडू होते रमा बनर्जी, फ़डेप्पा चौगुले सदाशिव दातार, कुमार नवाले और रणधीर शिंदे.

पण खरंतर हे पहिले खेळाडू नव्हते ज्यांनीऑलम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. यांच्या अगोदर एका ऍथलिटने स्पर्धेत भाग घेतला होता आणि मेडल सुद्धा मिळवलं होतं. आज घडीला ऑलम्पिक स्पर्धा  होऊन जवळपास १२५ वर्ष होत आली आहे. भारताने आजवर बरीच मेडल या स्पर्धेतून मिळवली आहेत पण जागतिक तुलनेच्या मानाने तोकडी आहेत. अजून या पदकांमध्ये वाढ कशी होईल याकडे खेळाडू लक्ष देऊन आहेत.

तर भारताला या पदकांपैकी दोन पदक एका ऍथलिटने मिळवून दिले होते.  ऍथलीटचं नाव होतं नॉर्मन प्रिटचर्ड.

कोलकातामध्ये जन्मलेला नॉर्मन प्रिटचर्ड पुढे ब्रिटन आणि अमेरिकेत जाऊन राहिला. १९०० च्या पॅरिस ऑलम्पिक स्पर्धेत भारताकडून सहभाग नोंदवणारा पहिला खेळाडू म्हणून नॉर्मनच्या नावाची नोंद झाली.

या स्पर्धेत ऍथलिट म्हणून नॉर्मन उतरला होता. २०० मीटरची अडथळ्याची शर्यत आणि २०० मीटर डॅश इव्हेन्ट या दोन्ही प्रकारात सिल्व्हर मेडल जिंकण्याचा पराक्रम नॉर्मनने केला होता. हा पराक्रम करणारे ते फक्त पहिले भारतीयच नव्हते तर पहिले आशियायी खेळाडूसुद्धा होते.

नॉर्मन हा फक्त चांगला ऍथलिट नव्हता तर तो उत्तम फुटबॉलसुद्धा खेळायचा. कोलकातामध्ये राहत असताना याने अनेक फ़ुटबॉल स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता आणि जिंकलासुद्धा होता.

ऑलम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी भारतीय पासपोर्टवर ते पॅरिसला गेले होते. आता त्यांच्या पदक जिंकण्यावर ब्रिटन देशसुद्धा दावा करतो कि ते मेडल नॉर्मनने ब्रिटनसाठी जिंकले होते. पण खरंतर नॉर्मनने स्वतंत्रपणे ऍथलिट म्हणून या स्पर्धेत भाग घेतलेला होता. ब्रिटिश इतिहासकारांच्या मते नॉर्मन पॅरिस British Amateur Athletics Association च्या सोबत पॅरिसला पोहचले होते. त्यांच्याजवळ Bengal Presidency Athletic Club आणि London Athletic Club ची मेम्बरशिप सुद्धा होती.    

पण International Olympic Committee ने नॉर्मनच्या मेडल विजयाचं श्रेय पूर्णपणे भारताला दिलेलं आहे. हा निर्णय त्यांनी अधिकृतरीत्या जाहीर सुद्धा केला होता. नॉर्मनने ऑलम्पिकमध्ये मेडल जिंकल्यानंतर पुढे इंग्लंडमध्ये प्रस्थान केलं आणि तिथेच ते राहू लागले. इंग्लंडमध्येच त्यांनी व्यवसाय सुद्धा सुरु केला होता.

पण टॅलेन्टने भरपूर असलेल्या नॉर्मनला पुढे अभिनयाचा छंद लागला. हॉलिवूडमध्ये गेल्यावर नॉर्मनने नॉर्मन ट्रेवोर नाव धारण केलं [ Norman Trevor ]. या नावाने नॉर्मनने अमेरिकन थेटरमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं. डान्सिंग मदर, चिल्ड्रन ऑफ डिवोर्स, द सायरन, मॅड हावर, रेस्टलेस युथ, लव्ह ट्रॅप अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये नॉर्मन झळकला. हॉलीवूडचा तो तेव्हाचा मोठा फिल्मस्टार होता. 

फिल्मस्टार होण्याअगोदर नॉर्मन भारताचा पहिला पदक विजेता ऑलम्पिक खेळाडू होता.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.