किम जोंग अण्णा स्क्विड गेम बघणाऱ्याचा गेम करायला लागलेत

१७ सप्टेंबर २०२१ ला म्हणजे जवळपास दोन महिन्यांपूर्वी स्क्विड गेम ही वेब सिरीज रिलीज झाली. रिलीज होताच या वेब सीरीजनं जगभरात जबरदस्त पॉप्युलॅरीटी मिळवली. एकीकडे सगळ्या जगात फेमस झालेल्या वेब सीरिजला उत्तर कोरियात पाहणं म्हणजे डायरेक्ट जीवाला मुकणं अशी परिस्थिती निर्माण झालीये.

आता तिथला हुकूमशहा किम जोंग उन आहे म्हटल्यावर काहीतरी भलतचं आणि खतरनाक होणार याची तर गॅरंटी असते. पण साध्या वेब सिरीजच्या पाहण्यावरून डायरेक्ट मृत्युदंड देणं म्हणजे मोठी शॉकिंग गोष्ट आहे.

साध्या शब्दात सांगायचं झालं, तर उत्तर कोरियात नेटफ्लिक्सची वेब सिरीज स्क्विड गेमवर बॅन लागलाय. इथं ही वेब सिरीज पाहणंच नाही तर त्याच्या पायरसीवर सुद्धा बंदी आहे. काही दिवसांपूर्वी याच वेब सीरिजच्या पायरसीच्या आरोपात एका व्यक्तीला डायरेक्ट गोळी मारल्यात आली. 

असं म्हंटल जातंय कि, या व्यक्तीने ही वेब सिरीज चीनमधून दक्षिण कोरियामध्ये पेन ड्राईव्हद्वारे आणली होती, जी त्याने हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर होती.  आता स्क्विड गेमची पायरसी करणाऱ्या या व्यक्तीला गोळी तर मारलीच पण ती सिरीज पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यातल्या, एका विद्यार्थ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर बाकीच्यांना ५ वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्यात आलंय.

हद्द म्हणजे वेब सीरीज पाहणाऱ्या विद्यार्थ्यां व्यतिरिक्त शाळेचे मुख्याध्यापक, युवा सचिव आणि शिक्षकांनाही शिक्षा झाली आहे. त्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलंय.

आता एका वेब सिरीजच्या पाहण्यावरून एवढं मोठं पाऊल उचलणं म्हणजे काहीतरी कारण असणारचं ना. तर किम जोंग उन सरकारने दिलेल्या कारणानुसार ही वेब सिरीज दक्षिण कोरियाच्या भांडवलशाही व्यवस्थेला प्रोत्साहन देते. 

पण भिडू उत्तर कोरियाच्या या भूमिकेमागे रिऍलिटी काही वेगळीच आहे. खरं तर, किम जोंग-उनच्या सरकारने गेल्या वर्षी एक नवीन कायदा आणला आहे, ज्यामध्ये त्यांच्या देशात दक्षिण कोरिया आणि अमेरिकन फिल्म, म्युझिक, नाटक आणि पुस्तकांवर बंदी घालण्यात आली आहे. 

 कारण उत्तर कोरिया सरकारचं म्हणणं आहे कि, या गोष्टींमुळे देशातील लोकांवर बाहेरून येणाऱ्या संस्कृतीचा परिणाम होईल. आणि हेचं सरकारला नको आहे. आणि त्यामुळे उत्तर कोरिया सरकारने “एलिमिनेशन ऑफ रिअॅक्शनरी थॉट अँड कल्चर” या नवीन कायद्यानुसार आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या कायद्यात बाकीच्या देशांचाही समावेश आहे, पण त्यातल्यात्यात अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा विशेष समावेश आहे. 

आता तस पाहिलं तर यामागे राजकीय दुष्मनी आहेच. पण किम जोंग सरकार हे स्वीकारायला तयार नाहीये.  पण या घटनेनंतर तिथले बाकीचे लोकं सुद्धा घाबरलेत, त्यांना भीती आहे कि, मेमरी स्टोरेज डिव्हाइसच्या खरेदी किंवा विक्रीसाठी सुद्धा त्यांना शिक्षा दिली जातेय कि काय. 

आता या स्क्विड गेम बद्दल बोलायचं झालं तर ही नेटफ्लिक्सवरची ही आतापर्यंतची सर्वात मोठी सिरीज असल्याचं म्हंटल जातंय. ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही  वेब सिरीज ११.१० कोटी लोकांनी पहिलीये.आणि अजूनही ही वेब सिरीज फॉर्ममध्ये आहे. 

या स्क्विड गेमच्या पहिल्या सीझनच्या यशानंतर आता त्याच्या दुसऱ्या सीझनचीही चर्चा सुरू झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच त्याच्या प्रोड्युसर्सनी दुसरा सीझन बनवण्याची घोषणा केली होती.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.