कधीकाळी बिनाटोपीचा हिमेश पहायची पण क्रेझ होती…

साठसत्तरच्या दशकात एक बाप होता. बापचं स्वप्न असत काहीतरी मोठ्ठ करायचं. त्या बापाचं देखील असच स्वप्न होतं. तो बाप माणूस शंकर जयकिशन सोबत काम करायचां. एन इव्हनिंग इन पॅरिस गाणं आलं आणि शंकर जयकिशनला टाळ्या पडल्या. साहजिक त्यांच्यासोबत काम करणाऱ्या त्या बाप माणसाचं पण कौतुक झालं. परत त्या माणसानं मदन मोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि राहूल बर्मन अशा अनेकांसोबत काम करण्यास सुरवात केली. पण मॅटर असा होता की दरवेळी गाणं हिट व्हायचं आणि कौतुक व्हायचं गाण्याचं. संगीतकाराकडे कोण लक्षच देत नव्हतं..
त्या बाप माणसानं इंडस्ट्री इलेक्ट्रानिक्स इन्स्ट्रुमेंट आणली होती. पण हळुहळु मोठ्ठा स्वप्न बघायचं त्याचं स्वप्न मेल. आत्ता बाप काय करतो तर आपली स्वप्न पोरांच्याकडून बघतो. आपलं हे स्वप्न आत्ता जयेश पुर्ण करेल अस त्यांना वाटू लागलं. पण ब्रेन हॅमरेज झालं आणि जयेश गेला..
आत्ता तो बाप माणूस त्यांच स्वप्न पुर्ण करण्यासाठी धाकट्या पोराकडे पाहू लागला,
त्या धाकट्या पोराचं नाव होतं हिमेश…
आपला हिमेश रेशमिया.
झान्कं दिखलांजां झाल्न्क दिखलांजा एकबार आंजा आंजा आंजा आंजा…
कस वाटलं.. वाह् भिडू लय इमोशनल टोन पकडलेला सुरवातील पण आत्ता बरं वाटलं. दुष्काळात कुणीतरी चार एकराचं शेततळं दाखवल्यासारखं वाटलं. साहजिक हाय हिमेश तसाच माणूस होता. हिमेशसारख्या माणसांच्या वाट्याला फक्त दोनच गोष्टी येतात. एकतर सुपर डुपर फॅन नायतर कट्टर विरोधक. तटस्थपणे यांच्याकडे बघणारे अजिबात नसतात.
लोकांना हिमेश लय आवडतो नायतर आज्जीबातच आवडत नाही.
हिमेशचं सगळ बालपण मुंबईच. मुळगाव गुजरातच्या भावनगर जवळच. पण ते शहरात राहणारे पोरं असतात ना, जी वर्षभर आमच्या गावात हे आहे ते आहे करुन शहरातल्या पोरांपोरींनी भुलवत राहतात हिमेश रेशमिया त्याच लायकिचा पोरगा होता. गावाची नाळ कायमचीच जोडलेली असायची. कदाचित त्यामुळेच हिमेशला गावाकडं काय खपतं हे माहित असावं.
हिमेशनं संगीतातलं शिक्षण घेतलं आणि स्वत:च प्रॉडक्शन हाऊस निर्माण केलं. नाव ठेवलं HR प्रॉडक्शन. हे भारी पण होतं आणि पुढच्या काळात हे पोरगं स्वत:च्या प्रेमात वाया जाणार आहे हे दाखवणार देखील होतं. त्यानंतर दूरदर्शन आणि झी टिव्हीसाठी शो करण्यासाठी सुरवात केली. झी टिव्हीसाठी अंदाज, अमरप्रेम सारख्या शोसाठी काम करत असताना त्याला त्याचा गॉडफादर भेटला.
आत्ता त्या माणसांच नाव काय तर, सलमान खान.
सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या साठी त्याला मोठ्ठा ब्रेक मिळाला. त्यावेळी हिमेशचं वय होतं पंचवीस वर्ष. या पिक्चरचं टायटल सॉन्ग आणि तुम पर हम हैं अटके यारा त्यानं केलं. त्यानंतर तो सगळ्यांच्या नजरेत आला.त्यानंतर आला हमराज. इथे त्यांची चर्चा झाली.
पण पण, नेते अजून जनतेचे झाले नव्हते. हिमेश रेशमिया जनतेचे झाले ते तेरे नाम पिक्चरपासून. पिक्चर तर सुसाट चाल्ला. पण गाणी आहा, ओहो.. एकापेक्षा एक ड्रिप्रेशन या गाण्यांमध्ये होतं.
आत्ता साहेब वेगवेगळ्या पुरस्कारांसाठी नॉमिनी होवू लागले. हवा डोक्यात गेली नव्हती पण स्वत:वर फुल्ल कॉन्फिडन्स होता. हिमेशने मग बाजारात स्वत:चा आवाज आणला.
मार्केटमध्ये आलं आशिंक बनाया आशिक बनाया आशिक बनाया आपनें टुडूकटडूक..
ते पुढं येणार टुडूक सहित गाणं सुपरहिट झालं हिमेशचा आवाजा आत्ता घराघराची शान झालां.आशिक बनाया हिट झाला. आवाज हिट झाला. टोपी हिट झाली. पुढच्या अल्बममध्ये हिमेश विदाऊट टोपीचा असणार आहे हि देखील एक क्रेझ होती. हिमेशचं जे काही असेल ते सगळ हिट होत होतं…
अक्सर, 36 चायना टाऊन, टॉम डिक अॅन्ड हॅरी, छुप छुप कें, हेराफेरी२, हमकों दिवाना कर गयें..
लांबच लांब रांग लागली. साहेबांनी तेरा सुरूर सुद्धा काढलच होतं. त्या अधल्या मधल्या काळात हिमेशने जलवा केलां.
आणि हा तोच टाईम होता जेव्हा डोक्यात हवा जाते.
बंडखोरी करायच्या नादात त्यानं आपल्या चेहऱ्याला आपलाच गळा समीकरण आणायचं ठरवलं. हळुहळु लोकांना त्याचा आवाज बोअर वाटू लागला होता. त्याच काळात हे घडू लागलं. २००७ लाच आप का सुरूर आला. पिक्चर गंडला. त्यानंतर तो गंडत गेला. आजही तो गंडतोयच. त्याच्या आत्ताच्या आणि गंडलेल्या काळाबद्दल सांगण्यात काहीच अर्थ नाही…
मध्यंतरी तो मुझें तुम्हारे घर मैं रोटी चाहीए रोटी अस सारेगामात बोंबलताना दिसायचा. चालायचं जय माता दि लेट्स रॉक!
हे ही वाच भिडू.