व्हॅलेंटाईन डे ची वाट फक्त पोर पोरीच नाही, तर बजरंग दलाचे कार्यकर्तेही बघत असतात

१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे अर्थात  प्रेमाचा दिवस. याबद्दल वेगळं काही सांगायला नको. कारण  व्हॅलेंटाईन डेचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपल्यातल्या निम्म्या लोकांची चेहरे गुलाबी झाले असणार. प्रेमीयुगुलं कित्येक दिवसांपासून या दिवसाची वाट बघत असतात. एवढंच नाही तर सिंगल असणारी मंडळी सुद्धा आजचा दिवस शुभ मुहूर्त मानून आपल्या प्रेमाचं प्रपोजल देऊन टाकतात, आता त्यातल्या किती जणांचे फेल होतात आणि किती जणांचे पास हे तर आपण काय सांगू शकत नाही. 

आता या व्हॅलेंटाईन डेला सुरुवात कशी झाली यावरून अनेक स्टोऱ्या फेमस आहेत, पण त्यातल्या त्यात एक फेमस स्टोरी अशी कि, इटलीत व्हॅलेंटाइन नावाचा एक तरुण माळी होता, ज्याचं आपल्या मालकाच्या मुलीवर प्रेम होत. आपल्या प्रेमाचा इजहार करण्यासाठी तो रोज एक गुलाब तोडायचा, की आज तरी त्या मालकाच्या मुलीशी आपण बोलूचं, पण नेहमी फेल व्हायचा. 

अर्थात  सामाजिक मतभेदांमुळे तो कधीच व्यक्त होऊ शकला नाही तो ते रोज तोडत असलेले गुलाब आपल्या पेटीत ठेवायचा. पण आपण आपलं प्रेम व्यक्त करू शकत नाही ही गोष्ट त्याला आतून खायची. शेवटी तो इतका आजारी पडला, कि त्याने डायरेक्ट अंथरून पकडलं. बरेच दिवस तो माळी दिसत नाही म्हणून त्या मालकाची मुलगी त्याला शोधत त्याच्या खोलीत आली, तिथे दाराकडे बघितले तर त्याचा मृतदेह पडलेला होता, पण त्याच्या हातात गुलाबाचे फुल आणि एक पत्र होते. तो दिवस होता चौदा फेब्रुवारीचा. म्हणूनच आजचा दिवस प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन वीक सुरु होताच चॉकलेट, फुल, गिफ्ट आणि सॉफ्ट टॉयच्या मार्केटमध्ये मोठी उलाढाल होते. आता हा सगळा मनाचा खेळ आहे म्हणतात, पण हे पण तितकंच खरं आहे कि यात हार्मोन्सचा सुद्धा मोठा खेळ असतो. म्हणजे फिजिकल स्टडीजनुसार, जेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा एकमेकांना ओळखण्यासाठी २०० मिलीसेकंद घेतात. आणि डोपामाइन आणि नॉरपेनेफ्रिन हे दोन हार्मोन्स प्रेमात पडायला जबाबदार असतात.  

असो..पण जेवढ्या आवडीने आणि तयारीने प्रेम करणारी मंडळी या व्हॅलेंटाईन डेची वाट बघत असतात. तितक्याच तयारीने बजरंग दलाचे कार्यकार्ये सुद्धा या दिवसाची वाट बघत असतात. हा पण त्यामागचे हेतू दोन्ही ग्रुपच वेगवेगळे असतात. म्हणजे जिथे लव्ह बर्ड्स या दिवशी आपल्या प्रेमाचा इजहार करण्याचं गोड स्वप्न बघत असतात, तिथेच बजरंग दल त्यांची ही स्वप्न भंग करण्याच्या.  

एकीकडे व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच बजरंग दल आणखी सक्रिय होते. हातात भगवे वस्त्र आणि काठ्या घेऊन प्रेमाला विरोध करायला ही मंडळी रस्त्यांवर फिरायला लागतात.  म्हणजे बजरंग दलाच्या म्हणण्यानुसार, हे व्हॅलेंटाईन म्हणजे पाश्चात्य देशाची थेरं आहेत, जी आपल्या संस्कृतीच्या उलट आहेत. भारतीय संस्कृती नाही. 

पण हे सुद्धा तितकंच खरं आहे कि,  या बजरंग दलाच्या नावाखाली अनेक नकार मिळालेले आणि प्रेमात फेल झालेले मंडळी भडकून उठतात. जेणेकरून आपल्या प्रेमभंगाचा बदला घेता येईल. 

मग काय व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आपल्या पार्टनरला पार्क, धार्मिक स्थळ आणि हॉटेलात भेटणारी मंडळी या बजरंग दलाचा शिकार बनतात. जिथं भेटतील , ज्या अवस्थेत भेटतील तिथून कॉलर पकडून नाहीतर काठ्या टाकून बाहेर घेतात. यात काही जोडपे फरार व्हायला यशस्वी होतात. पण हाताला लागलेल्या पोरांना हातपाय मोडूपर्यंत मारतात आणि महिलांना उठाबशा काढण्या सारख्या शिक्षा देतात हे टॉर्चर झालं कि, एकतर राखी बांधा नाही तर लग्न करा अशी अट घालतात. 

पण कितीही काही केलं तरी प्रेम करणारी मंडळी दरवर्षी आपला व्हॅलेंटाईन डे साजरी करतातचं. कारण प्रेम करणाऱ्यांना आजारपर्यंत कोण रोखू शकलंय. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.