राहुल गांधीच नाही तर वाजपेयी, अडवाणी, मोदी, पवार या सगळ्यांनीच पावसातल्या सभा गाजवल्यात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा सुरु आहे. दक्षिण भारतात या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केरळ नंतर ही यात्रा कर्नाटक मध्ये पोहचली आहे. रविवारी राहुल गांधी यांनी नंजनगुड येथील प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. यानंतर सायंकाळी त्यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर सभेला संबोधित करत होते.

यादरम्यान मध्येच जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र, राहुल गांधी यांनी आपले भाषण तसेच सुरू ठेवले. भाषणादरम्यान त्यांनी आरएसएस आणि भाजपवर चांगलीच टिका केली.भाषणानंतर त्यांनी पावसात कार्यकर्त्यांची देखील भेट घेतली. राहुल गांधींच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पावसातील सभाचे सर्वाधिक चर्चा झाली ते शरद पवार यांची. २०१९ च्या लोकसभा पोट निवडणुकीत साताऱ्यातील पावसातील सभा प्रचंड गाजली होती. यानंतर निवडणुकीचे वारे फिरले. सगळ्यांच्या आठवणीत राहणारी सभा म्हणून ओळखली जाते. 

आज जरी राहुल गांधी यांची पावसातील सभेची चर्चा होती. तरीही यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी पावसात घेत गाजवल्या आहेत.  

 

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी

दिवस होता १५ ऑगस्ट २००३. स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार होते. मात्र ते भाषणाला उभे राहण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या सगळ्या मंत्र्यांना अधिकाऱ्यांना हा कार्यक्रम कसा पार पडेल याची धाकधूक होती.

अटल बिहारी वाजपेयी यांनी पावसाची तमा न बाळगता भाषणाला सुरुवात केली. वाजपेयी यांनी भर पावसात सलग २४ मिनिटे भाषण केले होते. तसेच या भाषणात त्यांनी पंतप्रधान म्हणून काम करतांना काही कामे झाले आहे अजून काही करायचे बाकी असल्याचे सांगितले होते. भारताला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या ताकतवान बनविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. 

यावेळी तिथे जमलेले सगळे मंत्री, अधिकारी छत्री घेऊन भाषण ऐकत होते. २००३ चे लाल किल्यावरील वाजपेयी यांचे शेवटचे भाषण ठरले. 

लाल कृष्ण अडवाणी 

 युपीए २ सरकार विरोधात देशात वातारण तापत चालले होते. यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणी यांच्या पुढाकारातून जन चेतना यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. 

जन चेतना यात्रेची सभा तामिळनाडू येथील मदुराई येथे होती. मात्र येथील कार्यकर्त्यांची समस्या होती की, त्यांना हिंदी भाषा समजत नव्हती. त्यात अडवाणी हे १ तास उशिरा पोहचल्याने कार्यकतें अगोदरच त्रस्त झाले होते. 

मात्र लालकृष्ण अडवाणी हे भाषणाला उभे राहिले सगळे भाजपचे कार्यकर्ते शांततेत ऐकू लागले. मात्र थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली. आयोजकांना वाटले कार्यकर्ते निघून जातील. मात्र भाजपचे कार्यकर्ते खुर्ची डोक्यावर घेऊन भाषण ऐकत होते.  

 

नरेंद्र मोदी 

 ही गोष्ट नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीची आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा तर्फे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. 

आंध्रप्रदेश मधील विशाखापट्टम येथे भाजाप आणि चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाच्या वतीने प्रचारसभेचे आयोजन २ मे २०१४ रोजी घेण्यात आली. या सभेला नरेंद्र मोदी, व्यंकय्या नायडू, चंद्रबाबू नायडू, अभिनेता पावन कल्याण हजर होते. 

नरेंद्र मोदी हे भाषणाला उभे राहिल्यानंतर लगेच पावसाला सुरुवात झाली. याच परिस्थिती मोदी यांनी भाषण सुरु ठेवले. नरेंद्र मोदी हिंदीत भाषण करत होते तर चंद्रबाबू हे तेलगू मध्ये ट्रान्सलेट करून सांगत होते. 

१० वर्षाच्या कार्य काळात सीमांध्र भागाला काँग्रेसने लुटले असल्याची टिका नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली होती. भर पावसात भाजपचे आणि तेलगू देशमचे कार्यकर्ते भाषण ऐकत होते. 

 

 अरविंद केजरीवाल 

आण्णा हजारे त्यांच्या आंदोलनातून देशाला एक मुरलेले राजकारणी मिळाले. ते म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. १५ ऑगस्ट २०१५ रोजी  स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या छत्तरसाल मैदानात परेडचे आयोजन करण्यात आले होते. 

यासाठी दिल्लीतील शाळेतील हजारो विद्यार्थी एकत्र जमले होते. अरविंद केजरीवाल यांनी सकाळी १०.३० वाजता झेंडा फडकवला. त्यानंतर भाषण करण्यासाठी उभे राहिल्यानंतर काही मिनिटातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. १५ मिनिट सतत पाऊस पडत होता. मात्र केजरीवाल थांबले नाही. 

छत्तरसाल मैदानात हजारो विद्यार्थी आणि अधिकारी जमले होते. पाऊस सुरु असतांना सुद्धा विद्यार्थांनी केजरीवाल यांचे भाषण ऐकले. यानंतर या विद्यार्थांनी भर पावसात त्यांनी तयार केलेले गाणे सादर केले होते.

याबाबत बोलतांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार यांनी सांगितले की,

शरद पवार यांची पावसातील सभा प्रचंड गाजली. त्यानंतर एक प्रकारे पावसातील सभांना ग्लॅमर मिळालं पाहायला मिळते. यापूर्वी देखील राजकीय सभांमध्ये पाऊस झाला आणि नेते त्यात भिजले मात्र याला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही.  त्यामुळे त्या सभा कुठल्या होत्या हे सांगता येणार नाही.  

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.