गरिबांचा अणुबॉम्ब म्हणून कुख्यात, बायोलॉजिकल आणि केमिकल वेपन्सचा विषय गंभीर आहे.
Biggest enemy of man is man himself
माणसानं माणसाचं जेवढं वाटुळं केलं असेल तेवढं कुणीच केलं नसेल. सध्याचं जे रशिया युक्रेन युद्ध चालू आहे त्यात हाच अनुभव येतोय. स्वप्नवत वाटावी अशी शहरं रोज बेचिराख होतायेत. शेकडो मृत्यू झालेत. लाखो लोक विस्थापित होतायेत. मात्र दिवसेंदिवस युद्धाची दाहकता वाढतच चालली आहे. अणुबॉम्बच्या धमक्या दिल्यानंतर आता युद्धात बायोलॉजिकल वेपन्स आणि केमिकल वेपन्सची एंट्री झाली आहे.
रशिया युद्धात कधीही केमिकल वेपन्स वापरू शकतेय असा इशारा नाटोने दिला आहे.,
वेस्टर्न आलीयन्सनी पुतिन आणि त्यांच्या सैन्याने “फाँल्स फ्लॅग” ऑपरेशनची योजना आखल्याचा आरोप केला आहे.
ज्यानुसार रशिया युक्रेनकडे अशी शस्त्रे आहेत असा खोटा दावा करेल आणि मग रशियाला स्वतःचे केमिकल वेपन्स तैनात करण्यासाठी निमित्त मिळेल.
तर दुसऱ्या बाजूला रशियाने युक्रेन अमेरिकेच्या साहाय्याने बायोलॉजिकल वेपण डेव्हलप करत असल्याचा आरोप केला आहे.
गेल्या रविवारी रशियन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक ट्विट पोस्ट केले ज्यामध्ये यूएस आणि युक्रेनिचं सरकार गुप्त “लष्करी-जैविक कार्यक्रम” चालवत असल्याचा आरोप केला होता.
मॉस्कोने दावा केला होता की त्यांच्या सैन्याला हा कार्यक्रम लपवण्यासाठी करण्यात आलेलय घाई घाईतल्या सफाईचे पुरावे सापडले आहेत.
त्यामुळं आता अणुबॉंबनंतर बायोलॉजिकल आणि केमिकल वेपन्सचे ढग युद्धावर जमा झाले आहेत. तर सर्वात आधी ह्या हत्यारांची नक्की काय भानगड आहे ते बघू.
केमिकल वेपन्स म्हणजेच रासायनिक शस्त्रे म्हणजे जाणूनबुजून मृत्यू किंवा हानी पोहोचवण्यासाठी विषारी गुणधर्म असलेली रसायनांचा करण्यात येणारा स्फोट.
या सर्व केमिकलचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामानुसार वर्गीकरण केले जाते.
- नर्व्ह एजंट– लोकांच्या मज्जातंतूंना त्यांच्या स्नायूंना संदेश पाठवणे थांबवतात आणि परिणामी अर्धांगवायू आणि शारीरिक कार्य कमी होते. नर्व्ह एजंट्समध्ये सिरियामध्ये वापरले गेलेले सरीन, नोविचोक, सोमन आणि टॅबून यांचा समावेश होतो.
- ब्लिस्टरिंग एजंट – यात गॅस, एरोसोल किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असलेल्या केमिकलचा समावेश असतो ज्यांच्या संपर्कात आल्यावर त्वचेवर फोड येतात. पहिल्या महायुद्धात वापरलेली सल्फर मस्टर्ड आणि नायट्रोजन मस्टर्ड यांचा समावेश होतो.
- चोकिंग एजंट – या केमिकलमुळे श्वसनक्रिया बंद पडते. याआधी वापरलेला चोकीन्ग एजन्ट होता क्लोरीन.
- ब्लड एजंट – हायड्रोजन क्लोराईड आणि सायनोजेन क्लोराईडसह हि ब्लड एजंट रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात.
या केमिकलचा दाहकता किती असते हे तुम्हीच या फॅक्ट वरून ठरवा की एक मेगाटन अणुबॉम्बमूळ ३०० चौरस किलोमीटर क्षेत्रावरील ९० टक्के असुरक्षित लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर अवघ्या १५ टनांचे केमिकल वेपण ६० चौरस किलोमीटर क्षेत्रातील ५० टक्के लोकांचा जीव घेऊ शकते.
तुम्हला कळलंच असेल कि हत्यारं बनवतना माणूस त्याच्या बुद्धीचा किती नीचांक गाठू शकतो.
बायोलॉजिकल वेपणची पण हीच तरा आहे.
जैविक शस्त्रे किंवा बायोवेपन्स – म्हणजे शत्रू सैन्यला किंवा लोकांना हानी पोहचवण्यासाठी विषाणू, जीवाणू, बुरशी किंवा विष पसरवणे.
प्रामुख्याने वापरले जाणारे बायोवेपन्स म्हणजे
अँथ्रॅक्स- हा एक गंभीर जिवाणूजन्य रोग यापूर्वी बायो टेररिझमचं साधन म्हणून वापरला जात असे. याच्या सुरवातीच्या लक्षणांमध्ये त्वचेवर फोड आणि उलट्या यांचा समावेश होता.
बोटुलिनम टॉक्सिन- एक व्हायरस जे विष तयार करतात जे लोकांच्या नर्व्हस सिस्टिमला ब्लॉक करतं परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो आणि पॅरालाईसीस पण होऊ शकतो.
त्याचबरोबर प्लेगच्या विषाणूचा युद्धात वापर केल्याची अनेक उदाहरणं देखील सापडतात.
बायो फिजिसिस्ट स्टिव्हन ब्लॉक बीओलॉजिकल वेपन्सचा उल्लेख
” पुअर मॅनस् ऍटम बॉम्ब ”
म्हणजेच गरीब माणसाचा अणुबॉम्ब असा करतो कारण अणुबॉम्ब इतकीच हानी करणारी ही वेपण अतिशय कमी किंमतीत डेव्हलप करता येतात. आणि त्यामुळेच दहशतवादी संघटनांकडून अशा शस्त्रांचा वापर होण्याची शक्यता नेहमीच बोलून दाखवली जाते.
मग आता ही शस्त्र बॅन का केली जात नाहीत?
तशी तर बायलॉजिकल आणि केमिकल वेपण अशी दोन्ही प्रकारची शस्त्रे बॅन केलेली आहेत. मात्र संशोधनाच्या नावाखाली जगातल्या सर्व प्रमुख देशांनी याचा साठा करून ठेवल्याचा सांगितलं जातं.
रशियाने याआधी सीरियामध्ये केमिकल वेपन्सचा वापर केल्याचा आरोप पुढे आला होता. त्याचबरोबर चेचेन्या बंडखोरांच्या विरोधात २००२ मध्ये रशियाने रासायनिक हत्यारं वापरली होती. तसेच पुतीन यांनी अनेकदा आपल्या विरोधकांना संपवण्यासाठी नर्व्ह एजंटचा वापर केला आहे. त्यामुळेच आतादेखील पुन्हा रशिया तसंच करेल असं सांगण्यात येतंय.
हे ही वाच भिडू :
- रशियाने खतांच्या निर्यातीवर निर्बंध लावलेत, याने राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडणारेय
- युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठ्यामुळे रशिया युक्रेनच्या जीवावर उठलाय
- पुतीन यांना आजही त्यांच्या स्वप्नातला सोव्हिएत रशिया पुन्हा उभा करायचा आहे.