आयआयटीयन पोरीमुळे आता कंप्यूटरमध्ये देखील संस्कृत भाषा वापरली जाणारे

शाळेत अनेकांचा संस्कृत हा विषय एक तर खूप आवडीचा विषय असायचा तर काहींना अज्जीबात आवडायचा नाही कारण काय तर हि भाषा कायमच अवघड वाटत असायची. आजही शाळा-महाविद्यालयांमध्ये संस्कृतकडे गुण मिळणारी भाषा म्हणून संस्कृत विषय विद्यार्थ्यांकडून घेतला जातो.  शाळा सोडल्यानंतर काय भाषेचा फारसा संबंध आला नाही. पण हा समज फोल ठरू शकतो कारण आता हि भाषा दैनंदिन कामकाजात वापरली जाऊ शकते…हे बोलण्याचं निमित्त म्हणजे अलीकडेच यावर एक शोध लावण्यात येतोय…

संस्कृतची सर्वसामान्यांना ओळख म्हणजे देवांची भाषा. या समजामुळे या भाषेला त्याच कोशात ठेवले गेले. तिचा जास्त वापर करण्यात आला नाही. नेहमीच्या संवादातून आणि लिखाणातून ही भाषा पुसट होत गेली. नेहमी वापरली जाणं हि भाषा जिवंत असण्याचे लक्षण असतं..

संस्कृत भाषा ही सर्वात विकसित व प्राचीन भाषा आहे, असे विज्ञानही म्हणते. संगणकाच्या बायनरी प्रणालीनुसार, ही जगातील एकमेव भाषा आहे जी संगणकासाठी सर्वात उपयुक्त आहे. ही भाषा गणिती देखील आहे. त्यात जे बोलले जाते तेच त्यात लिहिले आहे. त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाने संगणकावर उच्चार लिहिल्यास इतर भाषांप्रमाणे त्यात त्रुटी राहणार नाहीत.

संस्कृत बद्दल अनेक अचंबित करणाऱ्या बातम्या आपल्या कानी येत असतात. अशीच एक बातमी आहे हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील ‘भेरा’ या गावची.

अनू आर्य नावाची या गावातील मुलगी आता आयआयटी मधील विद्यार्थ्यांना संस्कृतचे धडे देणार आहे. अनु आर्यने अमरोहा जिल्ह्यातील छोटीपुरा येथील श्रीमद दयानंद कन्या गुरुकुल महाविद्यालयात सहाव्या वर्गात प्रवेश घेतला होता. येथून बीए केल्यानंतर तिने एमजेपी रोहिलखंड विद्यापीठातून 2018 साली संस्कृतमध्ये एमए केले. २०२० मध्ये त्याच विद्यापीठातून इंग्रजी विषयात तिने एमए पूर्ण केले.

शिवाय तीने विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नेट (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) आणि JRF (ज्युनियर रिसर्च फेलोशिप) संस्कृतमध्ये उत्तीर्ण केले आहे. अनु हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या तिन्ही विषयांत प्रवीण आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पीएचडीची तयारी करण्यासोबतच ती गुरुकुलमध्ये अध्यापनाचे कार्य करत आहे. तिने दोन महिन्यांपूर्वी आयआयटी मुंबईच्या संगणक विषयातील गणितीय कार्यावर संशोधनासाठी सादरीकरण केले होते.

सेल फॉर इंडियन साइंस एंड टेक्नोलाजी इन संस्कृत च्या विषय तज्ञासोबत प्रश्नोत्तरांमध्ये त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर आयआयटीने त्याला संशोधनासाठी हिरवा सिग्नल दिला आहे. तिच्या यशाबद्दल, गुरुकुलच्या मुख्याध्यापिका सुमेधा सांगतात की, अनुची प्रत्येक वर्गातील कामगिरी प्रभावी आहे. आयआयटी मुंबईकडून संशोधनासाठी त्यांना आमंत्रण मिळाल्याचा संपूर्ण गुरुकुलला अभिमान आहे.

संस्कृत समजणारे कंप्यूटर येणार … 

केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरियाल यांनी आयटी मुंबई च्या पदवीदान समारंभात दावा केला होता कि , अमेरिकेची अंतराळ संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने ओळखले आहे की, बोलणारा संगणक प्रत्यक्षात असू शकतो आणि याचे कारण संस्कृत भाषा आहे. 

पोखरियाल पुढे असंही म्हणाले की, संस्कृत ही एकमेव वैज्ञानिक भाषा आहे, ज्यामुळे संस्कृत भाषिक संगणक प्रत्यक्षात येऊ शकतात असा विश्वास नासाने व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले होते कि नासा असे करत आहे, कारण संस्कृत ही एकमेव वैज्ञानिक भाषा आहे जिचे शब्द जसे बोलले जातात तसेच लिहिले जातात…त्यांच्या या दाव्यामुळे आता भविष्यात विज्ञान देखील संस्कृत भाषेत वाचायला आणि शिकायला मिळाले तर ती बाब निश्चितच अभिमानाची गोष्ट ठरेल हे मात्र नक्की. 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.