शेंगावाल्याची उधारी चुकवायला ही पोरं अमेरीकेतून परत आलीयेत

आत्ता सुट्टे नाहीत, नंतर देतो की म्हणत आपल्यापैकी कित्येक जणांनी रस्त्यावरील ठेल्यावाल्यांचे पैसे चुकवले असतील. काहीजणं तर देतो पळून चाल्लो काय देतो की नंतर! अशा राजेशाही थाटात अशी छिल्लर कामं करतात. तरीही शे दोनशे रुपयांसाठी दिवसभर रस्त्याकडेला उभा राहणारी ही चणे, फुटाणे, शिजलेल्या शेंगा विकणारी मंडळी अशांना आपला माल ‘दान’ दिल्याच्या ऍटिट्यूड मध्ये आपला धंदा चालूच ठेवतात. एखाद्याकडं खरंच सुट्टे नसतील तर हे लोकं अशांना आपला माल उधारीवर देऊन धंद्याची गाडी चालू ठेवतातच. त्यातले अनेकजणं ‘उपकाराची’ परत फेडही करतात. आता मात्र अशी एक घटना ही पुढे ही आलेय की पोरं अमेरिकेतून अशी उधारी परत करायला आलेत.

तर किस्सा आहे आंध्रप्रदेश मधला.

तब्बल अकरा वर्षांनंतर उधारी परत करण्यासाठी आलेल्या पोरांची.

या उधारीची कहाणी सुरु झाली 2010मध्ये. एनआरआय मोहन त्यांचा मुलगा नेमानी प्रणव आणि मुलगी सुचिता यांच्यासोबत आंध्र प्रदेशातील यू कोथापल्ली बीचला भेट देण्यासाठी गेले होते. येथेच मोहन यांनी सट्टाया नावाच्या माणसाकडून आपल्या मुलांसाठी शेंगदाणे विकत घेतले होते.

मुलांनी शेंगदाणे खायला सुरुवात केली पण पैसे देण्याची वेळ आली तेव्हा मोहन यांना समजले की ते आपलं पाकीट घरीच विसरले आहेत.

आता त्यांच्याकडे शेंगदाणे विक्रेत्याला द्यायला पैसे नव्हते.कदाचित दुसरा दुकानदार असता तर त्याने पैशांची मागणी केली असती, पण सत्ताया दिलदार निघाले. त्यांनी मोहनकडून पैसे न घेता त्यांना फुकटात शेंगदाणे दिले. मोहन यांनी पण त्यांना लवकरच उदारी फेडण्याचे वचन दिलं. 

अमेरिकेतून आलेल्या मोहन यांनी या दर्यादिलीनं भारावून जाऊन सत्ताया यांचा फोटो काढला.

१०-१५ रुपयांची ही गोष्ट होती. एवढ्या वर्षात मोहन आणि त्याची मुलं हे सगळं विसरायला हवी होती, पण हे लोक इतर फुकट्यांपेक्षा वेगळे निघाले. 2010 मध्ये सुरू झालेल्या या गोष्टीचा जवळपास 11 वर्षांनंतर हॅप्पी एंडिंग झाली जेव्हा मोहनची मुले नेमानी प्रणव आणि सुचिता भारतात परतली.

त्यांना सट्टाया आणि त्यांचा दिलदारपणा आठवला .तसेच त्यांनी घेतलेली उदारीही आठवली. दोन्ही भावंडांनी सत्ताया यांची उधारी फेडायची ठरवली.

पण अडचण अशी होती की 11 वर्षांनंतर सट्टाया यांना कुठं शोधायचं.

मात्र नेमानी आणि त्यांच्या बहिणीने हे आव्हान स्वीकारले आणि सट्टाया यांचा शोध सुरू केला.या मुलांचे वडील मोहन हे देखील शेंगदाणे विक्रेत्याला पैसे परत करण्यास खूप उत्सुक होते, कारण त्याने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. अशा परिस्थितीत नेमानी आणि त्यांच्या बहिणीने सट्टायाचा शोध घेण्यासाठी काकीनाडा शहराचे आमदार चंद्रशेखर रेड्डी यांची मदत घेतली.

मोहन यांच्या विनंतीनंतर आमदार रेड्डी यांनीही लवकरच या मदत करण्यासाठी सहमती दर्शवली आणि सट्टायाच्या शोधाबद्दल फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. त्यांच्या शेअर केलेल्या पोस्टचा परिणाम दिसून आला आणि लवकरच त्यांच्या मूळ गावातील नागुलापल्लीतील काही लोकांनी सट्टायाबद्दल आमदारांना माहिती दिली. पण . पण सट्टाया हे आता हयात नाहीत हे ही कळले. पण तरीही नेमानी आणि सुचिता यांनी त्यांचे वचन पूर्ण केले आणि त्यांच्या कुटुंबाला 25,000 रुपये दिले.

या पोरांच्या ही उधारी परत करण्याचा किस्सा देशभर चर्चेला जातोय.

Leave A Reply

Your email address will not be published.