नेहरूंच्या काँग्रेसला हरवलं अन जगात पहिल्यांदाच डाव्यांचे लोकशाही सरकार स्थापन झाले

भारतात केरळ हे एकमेव असं राज्य आहे, जिथे डावे पक्ष उरलेत.  केरळ हा भारतातला कम्युनिझमचा बालेकिल्ला आहे. पण इथलं कम्युनिझम हिंसाचाराने सत्ता मिळवण्याविषयी बोलणार्‍या कम्युनिझमपेक्षा  वेगळं आहे. त्यांनी राजकारणात सहभागी होऊन भारताची लोकशाही स्वीकारलीये.

केरळात अश्या प्रकारचं कम्युनिझमची स्थापना करण्यात ज्यात नाव टॉपला येत ते म्हणजे केरळचे पहिले मुख्यमंत्री एलामकुलम मणक्कल शंकरन नंबूदरीपाद. लोक त्यांना जास्त ईएमएस नंबूदिरीपाद याच नावाने ओळखतात. तर काहीजण त्यांना फक्त ईएमएस  म्हणतात. जवळपास ७० वर्ष त्यांनी राजकारणात काम केलं.

सामाजिक सुधारणांच्या कार्यासाठी ओळखले जाणारे  नंबूदरीपाद यांचा जन्म १३  जून १९०९  रोजी मलप्पुरमच्या कट्टर ब्राह्मण कुटुंबात झाला. लहानपणी त्यांना कुंजू (छोटू) म्हणून बोलावलं जायच. आईला त्यांना संस्कृतचा अभ्यासक बनवायचा होत,  पण ईएमएसला यात इंट्रेस्ट नव्हता. ते म्हणायचे,  अर्थ समजल्याशिवाय नुसता रट्टा मारण्यात काय अर्थ आहे.

नंबूदिरीपाद यांना आपल्या आसपासच जग लवकरच समजलं होत. समाज सुधारण्यात त्यांचा पहिला प्रयत्न होता नंबुदीरी समाजासाठी.

यासाठी त्यांनी आपले दोन मित्र  वीटी भत्ताथिरिपाद आणि एमबी भत्ताथिरिपाद यांच्यासोबत मिळून ‘उन्नीनंबूथिरी’  नावाने एक मॅगझीन सुरु केलं. ज्यात ते आपले विचार मांडायचे. त्यांच्या समाजात एखाद्या विधवेच दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न नंबूदिरीपाद यांनीच केला होता. ज्यावेळी ते अवघ्या १६ वर्षांचे होते. ज्यामुळे समाजाने  त्यांना बॉयकॉट सुद्धा केलं होत. एका कट्टर ब्राम्हण कुटुंबाचे असूनही त्यांनी  अस्पृश्यतेच्या विरोधात आवाज उठविला.

समाज सुधारणेच्या नादात सोडल शिक्षण 

नंबूदिरीपाद यांनी स्वातंत्र्य चळवळीत सामील होण्यासाठी पदवी अभ्यास सोडला. नागरी अवज्ञा आंदोलनात त्यांनी  एक वर्ष तुरूंगाची हवाही खाल्ली. ब्रिटीश सरकार त्यांना इतकं कंटाळलं होत कि,  एकतर ते  तुरूंगात असायचे नाहीतर अंडरग्राउंड. तुरूंगात असतानाच ते कॉंग्रेसच्या त्या नेत्यांच्या जवळ आले ज्यांचा समाजवादाकडे  कल होता. १९३४ मध्ये नंबूदिरीपाद यांनी कॉंग्रेस सोशलिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या काळी कॉंग्रेसच्या आत अनेक  लहान पक्ष होते आणि कोणालाही यावर आक्षेप नव्हता.

मात्र काही काळानंतर त्यांच कॉंग्रेसवरून मन उडालं आणि नंबूदिरीपाद डाव्या पक्षांकडे वळाले.

केरळमध्ये कम्युनिस्ट चळवळ सुरू करण्यात त्यांचा मोठा हात होता. स्वातंत्र्यानंतर त्यांनी  आपली संपत्ती विकली. यातून जे पैसे आले, ते त्यांनी  केरळात कम्युनिस्ट पार्टी तयार करण्यासाठी दान केले. या पैशाने पक्षाचे वृत्तपत्र ‘देशभीमनी’ पुन्हा सुरू झाले, ज्यावर १९४२ मध्ये ब्रिटीशांनी बंदी घातली होती.

स्वातंत्र्यानंतर भारतात  डाव्या पक्षांवर पुन्हा बंदी घातली गेली. नंबूदिरीपाद  पुन्हा तीन वर्ष अंडरग्राउंड झाले. ज्यावेळी त्यांच्यावर १००० रुपयांच बक्षीस होत. त्या दिवसांत ही रक्कम आजच्या लाखो रुपयांच्या बरोबरीची आहे.

केरळचा जो नकाशा आपण आज पाहतोय, त्यामागे नंबूदिरीपाद यांचा हात होता. त्यांनी ऐक्य केरळ मोहीम सुरु केली. देशातील राज्यांची पुनर्रचना केवळ भाषेच्या जोरावरच झाली पाहिजे, असा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच, त्यांची मागणी होती की, त्रावणकोर, कोचीन आणि ब्रिटिश मलबार हे क्षेत्र एकाच राज्यात राहिले पाहिजे.

पहिल्यांदा डाव्या पक्षाचं सरकार 

१९५७ मध्ये नंबूदिरीपाद  जेव्हा केरळचे पहिले मुख्यमंत्री बनले, तेव्हा त्यांच सरकार जगातलं पहिलं डाव्या पक्षाचं सरकार होत. असे सरकार जे डाव्या विचारांच्या धोरणावर विश्वास ठेवत, पण खुल्या निवडणुका लढवून सत्तेवर आलं. नाहीतर डाव्यांची सरकार तिचेच असतात जिथे एकच पक्ष निवडणूक लढवत.  

दरम्यान,  नेहरू सरकार नंबूदिरीपाद सरकारला एक आव्हान म्हणून पाहत होत, म्हणून १९५९ मध्ये  नेहरू सरकारने केरळचे तत्कालीन राज्यपाल व्ही.व्ही. गिरी यांच्यामार्फत नंबूदिरीपाद यांचे सरकार पाडलं. यासाठी केंद्र सरकारने घटनेच्या कलम ३५६ चा वापर केला गेला. भारतात अशाप्रकारे निवडले गेलेले सरकार पडण्याची ही पहिली घटना होती. असं म्हंटल जात कि, हे सगळं इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून झालं. नेहरूंच्या या निर्णयावर टीका सुद्धा केली गेली. स्वत: त्यांचे जावई फिरोज गांधी या निर्णयाच्या विरोधात होते.

 राजकारणी एखादी गोष्ट बोलताना दहा वेळा विचार करतात. पण नंबूदिरीपाद यांनी आपलं म्हणणं मांडताना कधीच मागचा पुढचा विचार केला नाही. मुस्लिम समुदायाच्या विरोधाची पर्वा न करता शरिया कायद्यात सुधारणेची गरज असल्याचं ते म्हणायचं. त्यांची प्रतिमा एका फायर ब्रिगेड नेत्यासारखी होती. एका लेफ्टिस्ट प्रमाण आपल्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी काम केलं. अखेर १९ मार्च १९९८ ला तिरुअनंतपुरम  येथे त्यांचे निधन झाले. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.