नुसरत जहाँ यांनी स्वतःच लग्न बेकायदेशीर घोषित केलं ते कोणत्या आधारावर?

पश्चिम बंगाल आता पुन्हा चर्चेत आला आहे… यावेळेस चर्चेचं कारण राजकीय नाही तर थोडक्यात “शादी का मामला हैं ”

तृणमूलच्या खासदार नुसरत जहां यांच्या लग्नाबद्दल, अफेअर आणि प्रेग्नेंसी बद्दल ज्या चर्चा चालू आहेत त्यात आपण जास्त न बोललेलं बरं कारण त्यांचा हा वैयक्तिक मुद्दा आहे. परंतु नुसरत आणि निखिल जैन यांच्या लग्नाला कालच दोन वर्ष पूर्ण झाली आणि हे लग्न मोडलं पण त्याला कारण हे कायद्याचं असल्यामुळे आज आपण त्यावर बोलणार आहोत.

खरं तर लग्न मोडलं असं आपण म्हणूच शकत नाही कारण त्यांचं कायदेशीर लग्न झालंच नाही.

स्वतः नुसरत जहां यांनीच तसं जाहीर केलं कि, हा विवाह अवैध आणि बेकायदेशीर होता !

आता तुम्ही म्हणाल दोनच वर्षांपूर्वी नुसरत यांनी वाजत गाजत लग्न केलं, त्यामुळे त्या खासदारकीच्या शपथविधीला देखील उपस्थित राहू शकल्या नव्हत्या, त्याच्या काही दिवसानंतर केसांत भलं मोठं कुंकू भरून त्या खासदारकीच्या शपथविधीला हजर झाल्या आणि जय बांग्ला, जय भारत आणि वंदे मातरम म्हणत आपली शपथ पूर्ण केली होती.

मग हे कसं शक्य आहे?

भारतीय घटनेनुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तींना आपापले धर्म न बदलता ‘स्पेशल मॅरेज ऍक्ट’खाली विवाह करता येतो. स्पेशल मॅरेज ऍक्टखाली विवाह करणारी जोडपी कुठल्याही धार्मिक कायद्याच्या कक्षेखाली येत नाहीत तरीही नुसरत जहाँ यांनी हिंदू आणि त्यानंतर ख्रिच्निन अशा रिती-रिवाजानं लग्न केलं होतं.

मग तरीही त्यांचं लग्न बेकायदेशीर कसं ठरलं ?

तर तुर्की मॅरेज रजिस्ट्रेशन कायद्यानुसार दोन भारतीय नागरिकांचे तुर्कीस्तान येथे झालेले लग्न पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

त्यांनी कारण असं सांगितलं कि, नुसरत जहा आणि निखील जैन हे वेगवेगळ्या धर्मातून असल्यामुळे,  हे दोन वेगवेगळ्या धर्माच्या लोकांचं लग्न होतं. त्यामुळे ते स्पेशल मॅरेज एक्टनुसार नोंद होणं गरजेचं होतं. पण त्याची नंतर नोंदणी झालीच नाही.

तुर्कीच्या कायद्यानुसार हे लग्न नसून ते एक लिव्ह इन रिलेशिनशिप होती.  त्यामुळे घटस्फोट घेण्याचा प्रश्नच नाही.

त्यांचं म्हणणे आहे, त्यांचं नातं एक नॉर्मल लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणूनच ग्राह्य धरलं जावं असं त्या दोघांचं म्हणणं आहे आणि त्या दोघांनाही एकमेकांवर अधिकारही नकोत. थोडक्यात इतर लिव्ह-इन जोडप्यांमध्ये नॉर्मल अधिकार असतील तेच आम्ही ग्राह्य धरू.

कायदा काय म्हणतो ?

तुर्कीस्तानने हा विवाह कायदेशीर नसल्याचे म्हणले आहे तर भारतीय कायद्याचं बोलायचं झालं तर, परदेशात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या लग्नाची भारतात लागलीच नोंद होणे कायद्याने बंधनकारक आहे तरच त्या लग्नाला भारतात कायदेशीर मान्यता मिळते.

पण हि नोंदणी नुसरत आणि निखील केलीच नसल्यामुळे त्यांचा घटस्फोट घेण्याचीही गरज नसल्याचा तर्क कितीपत योग्य आहे हे आपण पाहूयात.

दोघांच्या लग्नाची नोंद भारताच्या कोणत्याही विवाह कायद्यात नाही आणि त्याच आधारावर दोघांचेही असे म्हणणे आहे, आम्ही हे लग्न मानत नाही.

पण काही तज्ञ वकिलांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात, त्यांना विभक्त होण्यासाठी, दोघांपैकी एकास कोर्टात खटला दाखल करावा लागेल.

त्यात त्यांना हे लग्न कोठे झाले हे सांगणे आवश्यक आहे, परंतु भारतात ते नोंदणीकृत होऊ शकले नाही आणि आता या दोघांनाही लग्नाची नोंद देखील करायची नाही. म्हणून हा विवाह शून्य घोषित करा अशी मागणी केली पाहिजे आणि एक – दुसर्‍याने संमती दिली पाहिजे, अशा प्रकारे दोघांचे विभाजन होईल.

नाही तर मग दुसरा मार्ग म्हणजे,

त्यांना विशेष विवाह कायद्यांतर्गत त्यांच्या लग्नाची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया पाळावी लागेल व त्यासाठी एकमेकांची समंती लागेल. मगच ते या विवाहातून मोकळे होतील. 

हे यशदास गुप्ता ज्यांचे नाव नुसरत यांच्यासोबत जोडले आहेत ते भाजपचे नेते आहेत

तर अशा कॉम्प्लिकेटेड लग्नामुळे याचं लग्न चर्चेत आलंय पण सोबतच अजून मुद्दा म्हणजे अभिनेते  यशदास गुप्ता यांच्यासोबत जोडले जाण्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले आहे.

यशदास हे अभिनेते तर आहेतच तसेच त्यांनी २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप कडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्या काळात यश आणि नुसरत एकत्र राजस्थानच्या दौऱ्यावर गेले असल्यामुळे यश दासगुप्ता नुसरतला डेट करत असल्याच्या अनेक बातम्याही आल्या होत्या.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.