शांत सज्जन दिसणाऱ्या नूतनने चक्क संजीव कुमारच्या कानाखाली वाजवली होती…

अभिनेत्री नूतन हि बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त सुंदर आणि सदाबहार अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यात आपल्या अभिनयाने लोकांच्या काळजात रंग भरणारी अभिनेत्री म्हणून नूतनचं नाव घेतलं जातं. दीर्घकाळ तिने बॉलिवूडवर राज्य केलं. पण याच नूतनने एकदा नवऱ्याच्या सांगण्यावरून संजीव कुमारसारख्या नटाच्या कानाखाली वाजवली होती.

४ जून १९३६ रोजी एका मराठी परिवारात नूतनचा जन्म झाला. घरात सगळं फिल्मी वातावरण होतं. वडील कुमारसेन समर्थ हे नावाजलेले दिग्दर्शक होते तर आई शोभना समर्थ या अभिनेत्री होत्या. पुढे घरातूनच अभिनयाचे धडे त्यांना मिळत गेले आणि १९५० ते आपल्या अंतिम काळापर्यंत ७० सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. 

नूतन यांनी त्यावेळचे टॉप ऍक्टर राज कपूरपासून ते अशोक कुमार, किशोर कुमार, मनोज कुमार, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, ,शम्मी कपूर, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमिताभ बच्चन अशा सगळ्या हिरोंसोबत काम केलं होतं. फिल्मी बॅकग्राउंड असूनही नूतन यांनी हिरोसोबत लग्न केलं नाही तर इंडियन नेव्हीचे लेफ्टिनंट कमांडर रजनीश बहल यांच्यासोबत १९५९ साली लग्न केलं.

लग्न झाल्यानंतर मात्र अचानकपणे त्याकाळचे प्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार यांच्या सोबत अफेअर चालू असल्याच्या गोष्टी बॉलिवूडमध्ये पसरायला सुरवात झाली. १९६८ साली नूतन या संजीव कुमारसोबत देवी नावाचा सिनेमा करत होते.

ज्यावेळी या चर्चा वेगाने बॉलिवूडमध्ये पसरू लागल्या तेव्हा नूतनचे पती रजनीश याना हे प्रकरण असह्य होऊ लागलं. जेव्हा रजनीश बहल यांना हे डोक्याच्या वर चाललंय असं जेव्हा वाटू लागलं तेव्हा त्यांनी नूतनला स्वतःला खरं काय आहे असं विचारलं.

आपण खरे आहोत हे कसं पटवून द्याल तर रजनीशने नूतन यांना संजीव कपूरच्या कानाखाली वाजवायला सांगितलं होतं. संजीव कुमारमुळे नवीनच झालेलं लग्न मोडू शकतं असं वाटत होतं म्हणून नूतन यांनी कुठलीही रिस्क न घेता त्यांनी संजीव कुमारच्या कानफटात हाणायची असं ठरवलं. 

सिनेमाच्या सेटवर गेल्यावर नूतन यांनी संजीव कुमारला बाहेर चाललेल्या अफेअरच्या गप्पांबद्दल विचारलं आणि थेट संजीव कुमारच्या कानफटात वाजवली. जस नूतन यांनी संजीव कुमारच्या कानाखाली वाजवली तसा सगळा सेट धास्तावला, संजीव कुमार तर चकितच झाले आणि नूतन तिथून निघून गेल्या.

नूतन यांनी नंतर एका इंटरव्हिव्हमध्ये सांगितलं कि संजीव कुमारच्या कानाखाली मारल्यानंतर मला फार वाईट वाटलं होतं पण नंतर जेव्हा मला कळलं कि आमच्या दोघांच्या अफवा या संजीव कुमारचं पसरवत आहे तेव्हा मात्र मला कानाखाली वाजवल्याचा जराही पश्चाताप वाटला नाही. 

असं एखाद्या हिरोईनने लीड हिरोच्या कानफटात मारणे हि मोठी गोष्ट तेव्हा घडली होती. नवऱ्याच्या सांगण्यावरून आणि विवाह बंधन तुटू नये म्हणून नूतन यांनी हिंमत केली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.