पोरींच्या लाडक्या Nykaa ने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करताच धमाका केलाय.

या बायका काय करू शकतात ? यांना काय कळतं बिझनेस कसा करतात ते, ना यांना व्यवहार कळतो ना शेअर मार्केट कळतं..अशा मिथकांना छेद देत एक यशस्वी कंपनी कशी उभारू शकतो यांची एक  कहाणी लिहिली आहे फाल्गुनी नायर या महिलेने…ती कहाणी म्हणजे आपला महिला वर्ग जिथून विश्वासाने ब्युटी प्रोडक्ट्स ऑर्डर करत असतात तोच ‘नायका’ Nykaa हा ब्रॅण्ड.

ज्या वयात लोक रिटायर होऊन पुढे आयुष्य कसं आरामात घालवायचं याचा प्लॅन करत असतात, त्याच  वयात फाल्गुनी नायर यांनी बँकरची नोकरी सोडून कॉस्मेटिक व्यवसाय सुरू केला. आणि मग काय  अवघ्या ९ वर्षात हि कंपनी ट्रिलियनियर बनली. फाल्गुनी नायर नायका या ब्युटी आणि वेलनेस कंपनीच्या संस्थापक आहेत. त्यांच्या सौंदर्य उत्पादनांना महिलांनी डोक्यावर घेतलं, ज्यामुळे तिच्या कंपनीने फक्त एका तिमाहीत $२०० दशलक्ष किमतीच्या वस्तू विकल्या.

एकाच आठवड्यापूर्वी, Nykaa चा IPO मार्केट मध्ये आला, त्यानंतर आता नायर यांची गणना अब्जाधीश व्यावसायिक महिलांमध्ये केली जात आहे.

पण आत्ताची खास गोष्ट म्हणजे या कंपनीच्या आयपीओने पदार्णपणातच धमाका केला आहे.

यामागे कारण म्हणजे, फाल्गुनी नायरने सौंदर्य उद्योगाला एक बाजारपेठ म्हणून पाहिले. आज NYKAA ची वेबसाइट, फिजिकल स्टोअर, सौंदर्य, पर्सनल केयर, फॅशन, अॅक्सेसरीजचा ब्रँड आहे. याव्यतिरिक्त, मध्यंतरी NYKAA ला त्याच्या खराब आणि असंवेदनशील वर्क कल्चरसाठी टीकेचा सामना करावा लागला होता. २०२० मध्ये या कंपनीत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी नाव न सांगता कामाच्या जागी  छळ होत असल्याच्या घटना आणि अनुभव शेअर केले होते.

एव्हढंच नाही तर आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची फसवणूक आणि त्यांची कॉपी केल्याबद्दल NYKAA ला टीकेचाही सामना करावा लागला होता.

इंटरनेट IPO च्या गर्दीत दहा वर्षांपेक्षा कमी काळात सार्वजनिक होणारी Nykaa ही भारतातील एकमेव युनिकॉर्न आहे ज्याचं नेतृत्व एक महिला करतेय.

NYKAA चा IPO ऐतिहासिक आहे.

याआधी नायर जगभरातील कंपन्यांना प्रसिद्धी देण्यासाठी मदत करायच्या. आता त्या २८ ऑक्टोबर रोजी  IPO द्वारे $7 बिलियन पेक्षा जास्त मुल्यांकन करून $700 दशलक्ष जमा करण्याचा विचार करत आहेत.

सुरुवातीच्या शेअरची किंमत १०८५- ११२५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.
इतर अनेक स्टार्ट-अप्सच्या विपरीत, नायर आणि त्यांच्या कुटुंबाची मूळ कंपनी, जी मोठा हिस्सा कायम राहणारी भारतातील फायदेशीर युनिकॉर्नपैकी एक आहे. Nykaa हे भारतातील काही नवीन फायदेशीर विक्रेत्यांपैकी एक आहे. फाल्गुनी नायर या एक गुंतवणूक बँकर आहेत.

NYKAA चा इतिहास अनेक महिला उद्योजकांना प्रेरणा देईल असा आहे.

Nykaa ने गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल वाढून २,४४१ कोटी रुपये झाला होता. यादरम्यान कंपनीला ६१.९ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, मॉर्गन स्टॅनले, बोफा सिक्युरिटीज, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स, जेएम फायनान्शियल आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज या आयपीओसाठी मर्चंट बँकर आहेत.

ब्युटी आणि फॅशन रिटेलर Nykaa ची मूळ कंपनी FSN E-commerce Ventures चा Rs ५,३५२  कोटींचा IPO २८ ऑक्टोबर रोजी उघडत आहे. १ नोव्हेंबरपर्यंत सदस्यत्व घेता येईल. Zomato आणि Sona Comstar नंतरचा हा या वर्षातील तिसरा सर्वात मोठा IPO आहे. या IPO मध्ये, ६३० कोटी रुपयांचे ताजे इक्विटी शेअर्स जारी केले जातील तर प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक ४,७२३ कोटी रुपयांचे ४.३११ कोटी शेअर्स विकतील.

बहुतेक ब्रोकरेजने गुंतवणूकदारांना ते खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. पण मारवाडी शेअर्स अँड फायनान्सने गुंतवणूकदारांना सावधपणे खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणतायेत की, कंपनी लाइफस्टाइल ग्राहक तंत्रज्ञानातील अग्रगण्य प्लॅटफॉर्मपैकी एक आहे यात शंका नाही परंतु तिचे मूल्यांकन मागील आर्थिक परिस्थितीवर आधारित आहे.

महिलांसाठी नायर या एक वाक्य वापरत असतात, त्यांचं म्हणण आहे याच वाक्याने त्यांना स्वतःची कंपनी सुरू करण्याची प्रेरणा मिळाली होती.

 ‘आप अपनी कहानी में बहुत महत्वपूर्ण हैं और एक परिवार के केन्द्र में होने की वजह से आपको कोई पछतावा नहीं होना चाहिए’

वयाच्या ४९ व्या वर्षी, फाल्गुनी नायर यांनी एप्रिल २०१२ मध्ये NYKAA या कंपनीची स्थापना केली. आता ती भारतातल्या टॉप ई-कॉमर्स साइट्सपैकी एक आहे.  येथे सौंदर्यप्रसाधनांची एक नवीन श्रेणी म्हणजेच सौंदर्य उत्पादने आणली गेली आहेत. २०१२ मध्ये ही पूर्णपणे वेगळा आणि नवीन विचार होता, Flipkart आणि Amazon सारख्या ब्रँडने त्यांची छाप पाडली होती परंतु सौंदर्याशी संबंधित कोणतेही  मोबाइल ॲप किंवा वेबसाइट नव्हती.

कंपनीचा दावा आहे की त्यांच्याकडे पाच दशलक्षाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत, तसेच ७० स्टोअर्स आणि १५०० हून अधिक ब्रँड आहेत. कंपनीकडे सुमारे १ लाख ३० हजार उत्पादने उपलब्ध आहेत. २०१८ मध्ये, Nykaa ने महिलां व्यतिरिक्त मेल ग्रूमिंगवरही लक्ष केंद्रित केले आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

.

Leave A Reply

Your email address will not be published.